Shuru
Apke Nagar Ki App…
भुसावळ–न्हावी रस्त्याच्या रुंदीकरणात परवानगीशिवाय वृक्षतोड; २० हजारांचा दंड वसूल ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; १३ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा
विशेष तपास न्युज
भुसावळ–न्हावी रस्त्याच्या रुंदीकरणात परवानगीशिवाय वृक्षतोड; २० हजारांचा दंड वसूल ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; १३ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Kishor subhash jadhav1
- पिंपरी चिंचवड : - जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचं भयाण वास्तव समोर आलंय. इथून वाहणारी मुळा नदी अक्षरशः गायब झालीये की काय? अशी परिस्थिती जलपर्णी मुळं निर्माण झालीये. त्यामुळं इथले आयटी अभियंते आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आहे. ब्लु रिच सोसायटीत राहणाऱ्या पंधरा हजार रहिवाश्यांच्या नशिबी असं दूषित पाणी आल्यानं त्या सर्वांची चिंता वाढलीये. या मुळा नदीची ही टॉप व्ह्यू दृश्य इथलं भयाण वास्तव स्पष्टपणे दाखवते. पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन मात्र केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केलाय.... : प्रसाद देसाई - चिंताग्रस्त आयटी अभियंता : स्थानिक महिला : विक्रम साखरे - माजी सरपंच, हिंजवडी #हिंजवडी #मुळानदी #जलपर्णी #पिंपरीचिंचवड #पर्यावरणसंकट #दूषितपाणी #आयटीअभियंते #आरोग्यधोका #नदीप्रदूषण #PMRDA #स्थानिकप्रश्न #हिंजवडीसमस्या #पाणीप्रदूषण #पर्यावरण #Hinjewadi #MulaRiver #WaterHyacinth #PCMC #WaterPollution #EnvironmentalCrisis #ITEmployees #HealthRisk #RiverPollution #PMRDA #LocalIssues #PuneNews #Pollution #UrbanIssues1
- मुंजोबा वस्ती येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिसरात डासांचे प्रमाण वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- विक्रम शिंदे /भोर दि.२ भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांनी भर पावसात केली नुकसान ग्रस्त शेतीची पहाणी केली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे या पार्श्वभूमीवर आज दि.२ कृषीमंत्री भरणे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.1
- शिरुर, { डेली न्यूज पोस्ट टीम 24} भैरवनाथाचा नावाने चांगभल , च्या जयघोषात भैरवनाथाच्या बगाड यात्रेस रामलिंग येथून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली . तर्डोबाची वाडी येथील बगाड यात्रा दरवर्षा आड होत असते . रामलिंग जुने शिरुर येथील भैरवनाथ मंदिरा पासून बगाड यात्रा मिरवणूकीस सुरुवात झाली. यावेळी पंचायत समिती सभापती स्वाती घावटे, कमिशनर इन्स्पेक्टर जनरल अमित घावटे, रामलिंगच्या सरपंच शिल्पा गायकवाड, माजी सरपंच अरुण घावटे, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, माजी सरपंच विठ्ठल घावटे, सोमनाथ घावटे, माजी नगरसेवक प्रवीण दसगुडे, रामलिंग देवस्थानचे ट्रस्टी पोपटराव दसगुडे, प्रा. डॉ. राजेराम घावटे, डॉ. विक्रम घावटे, डॉ. राहुल घावटे, दीपक घावटे , अनिल घावटे, माजी पंचायत समिती सदस्य दादापाटील घावटे, बाबाजी वर्पे, किरण घावटे ,व बगाडाचे मानकरी उपस्थित होते . रामलिंग मंदिर येथील भैरवनाथ मंदिरातील भैरवनाथ हा थोरला भैरवनाथ तर तर्डोबाची वाडी येथील भैरवनाथ मंदिरातील भैरवनाथ हा धाकटा भैरवनाथ समजला जातो. तर्डोबावाडीच्या भैरवनाथाचा लग्न सोहळया साठी बगाडदवारे व-हाड घेवून रामलिंग येथील थोरला भैरवनाथ जातो व वाडीच्या भैरवनाथ व जोगेश्वरी देवीच्या लग्नसोहळा पार पाडतो. बगाड कडानीच्या डोंगरा ( शहा डोंगर ) जवळ आल्यानंतर पालखी गावातून येते व सायंकाळी भैरवनाथाचा विवाह पार पाडला जातो . काल सायंकाळी देवाच्या हळदीचा कार्यक्रम ही पार पडला . बगाड प्रस्थानाचा वेळी वाद्यांच्या गजर करण्यात आला . रामलिंग मंदिर ,मारुती मंदिरा कडून बगाडाने पाषाणमळा कडे प्रस्थान केले.ठिकठिकाणी बगाडाचे स्वागत करण्यात आले व भंडा- याची उधळण करण्यात आली .पाषाणवाडी जवळील दत्त मंदिर येथे बगाड हे विसावासाठी थांबले होते . याठिकाणी तर्डोबाचीवाडी ग्रामस्थांच्या कडे बगाड सुपूर्त करण्यात आले .माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक नितीन पाचर्णे, बाजार समितीचे माजी सदस्य संतोष मोरे, बबनराव कर्डीले , संभाजी कर्डीले, नगरसेवक अमित कर्डीले, माजी उपसरपंच गणेश खोले, आदी सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . बाबूराव नगर , बाफना मळा ,गंगानगर या मार्गाने बगाड मार्गस्थ झाले. .कडानीच्या डोंगरावरुन बगाड तर्डोबावाडीच्या कडे बगाड खाली उतरतानाचा सोहळ्या अत्यंत नयनमनोहर असतो. हा सोहळा पाहण्यासाठी कडानीच्या डोंगर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . डोंगरावरुन बगाड उतरताना नाथ साहेबांच्या नावाने चांगभलच्या जयघोषाने आसमंत दुमदूमून गेला .कडानीच्या डोंगरावर बगाडाच्या आढा फिरविण्यात आला .दरम्यान काही काळ पाऊसाचे थेंब पडल्याने गारवा निर्माण झाला होता. बगाडा बरोबर आलेल्या व- हाडी मंड्ळीचे स्वागत तर्डोबावाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. बगाड यात्रेनिमित्त भैरवनाथ मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली असून उद्या गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी दंडवत व शेरणीचा कार्यक्रम आहे .पुर्वी हे बगाड पाठीला गळ लावून ओढले जायचे जिथे बगाडाचा आढा फिरविला जातो. त्याठिकाणी पाठीचा गळ सुटला व त्या व्यक्तीचा अपघात झाला त्यामुळे या यात्रेवर ब्रिटीशानी बंदी घातली होती त्यानंतर लोकांनी ही बंदी मागे घ्यावी अशी मागणी केली . बगाड गळाने न आणता बैलाने आणण्याचे कबूल केल्यावर वर्षा आड बगाडास परवानगी देण्यात आल्याचे पंचक्रोशीतील बुजुर्ग सांगतात . फोटो ओळी तर्डोबाचीवाडी येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त बगाड काढण्यात येते बगाड यात्रेत सहभागी झालेले भाविक1
- Post by Kishor subhash jadhav1