कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पहिली "जागतिक शांतता" आवाहन रॅली संपन्न पिंपरी(प्रतिनिधी) दि.८ मार्च २०२६:– आखाती देशातील युद्ध थांबवावे व जगात शांतता नांदावी या करीता संत तुकाराम नगर येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली "जागतिक शांतता" आवाहन रॅली संपन्न झाली.त्यांनी संत तुकाराम महाराज हॉल येथे श्रमिकांना संबोधित केले.या रॅलीमध्ये शेकडो श्रमिक व पिंपरी चिंचवड वाशीय सहभागी झाले होते. रॅली वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संत तुकाराम महाराज पुतळ्याचे दर्शन घेऊन रॅलीला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पंचशील बौद्ध विहारांमध्ये भगवान गौतम बुद्धांना वंदन करून पुढे श्री गणेश मंदिरात दर्शन घेतले.सर्व जाती धर्माच्या स्थळांना भेट देऊन जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने संत तुकाराम महाराज हॉल येथे रॅली ची सांगता झाली. यावेळी भाजपाचे शहर पदाधिकारी मंगेश धाडगे, मुन्ना बाविस्कर, दिनेश पाटील, दिपक पाटील, नंदू कदम, अमोल घोरपडे, शंकरराव शितोळे, ओंकार जोखारे, राहुल शितोळे, लता पाटील, अंकुश वाघमारे ,स्वानंद राजपाठक, ईश्वर गायकवाड, शंकरराव गावडे, सतीश एरंडे यांनी रॅलीचे आयोजन केले होते. जागतीक शांतता रॅलीला संबोधित करताना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, अमेरिकेने इजराइलच्या साह्याने इराणवर जो आघात केला त्यामुळे इराणचे प्रमुख नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. हवाई तळाची जागा ज्या देशाने युद्धासाठी उपलब्ध करून दिली त्या आखातातील सर्वच देशांना याचे परिणाम भोगावे लागले आहेत. भारतालाही याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवले आहेत कारण अमेरिका, यूएई,दुबई सहित सर्वच आखाती देशात लाखो भारतीय नागरिक अडकले आहेत. अडकलेल्या भारतीय नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सुखरूप आणण्यासाठी आवाहन केल्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार इराणन सहित इतर देशांनी युद्ध थांबवून विमानाने भारतीय सुखरूप देशात पोहोचले. याचे सर्व श्रेय भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. भारत सरकारने अवलंबलेल्या परराष्ट्र धोरणाचा चांगला परिणाम युद्धाच्या काळात दिसून येत आहे. कारण जगात युद्ध चालू असताना भारत स्थिर असून नागरिक शांतपणे झोप घेत आणि दैनदिन कार्य करत आहेत. युद्ध वाढल्यास याचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागतील. बाजारातील सर्वच जीवन आवश्यक वस्तू महागतील याचा परिणाम भारतीयांना भोगावा लागेल.युद्धामध्ये निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात आहे. जगावर आर्थिक संकट निर्माण झाले असून त्यामुळे युद्ध थांबावे व जगात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने भाजप प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडी तसेच शेकडो श्रमिकांच्या वतीने जगातील पहिली भव्य शांतता आवाहन रॅली काढण्यात आली. या रॅलीचा आदर्श घेऊन जगातील सर्वच देश जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करतील. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा. आठ दिवसात युद्ध थांबेल अशी आशा करून "युद्ध नको शांतता हवी" यासाठी जगातील पहिली जागतिक शांतता रॅली पिंपरी चिंचवड शहरात काढण्यात आली. परराष्ट्र धोरण योग्य राबवल्या मुळे व शांतता प्रस्थापित केल्या मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारचा अभिनंदन ठराव करण्यात आल्याचे मत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केले.

- जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.1
- -अजित पवारां नंतर माझा प्रवास सोप्पं नव्हता,मात्र महिला शक्ती माझ्यामागे थांबली,हीच ताकद मला ऊर्जा देते -आजच्या काळात महिला एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत,अनेक ठिकाणी नेतृत्व करत आहे -आजपर्यंत सिम्बॉयसेस मधून 5 हजार पेक्षा अधिक मुलं-मुली यांनी शिक्षण घेत पुढे गेल्या आहेत -सिम्बॉयसेस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात आला पाहिजे, जेणेकरून तेथील महिलांना फायदा होईल -महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा,तुम्ही सक्षम झाल्या की आपला देश सक्षम म्हणून ओळखला जाईल1
- बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- "मजुर मुलाचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या आरोपीतांना वैजापूर पोलीसांनी शर्तीचे प्रयत्न करुन चोवीस तासाच्या आत केली अटक."1
- Post by Loknyay News1
- आळंदि पुणे : - पुण्याच्या आळंदीतील एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेला टाळे ठोकण्यात आलंय. अल्पवयीन मुलींवर कथित अत्याचार आणि बालसंरक्षण नियमांचे अनेक उल्लंघन आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. आळंदी नगर परिषद आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. माऊली महाराज जाहुरकर यांची जाहुरकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 43 मुलं आणि 4 मुली अशा 47 विद्यार्थ्यांना सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी हलवण्यात आले आहे. ही संस्था मुलांना भजन, कीर्तन तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांसारख्या वाद्यांचे प्रशिक्षण देत होती. या संस्थेच्या शाखा आळंदी आणि नांदेड येथे असून ती एका कीर्तनकाराकडून चालवली जात होती. संस्थेचा खर्च प्रामुख्याने देणग्यांवर चालत होता. आळंदी हे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रवचन, कीर्तन, भजन आणि संगीत वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील माऊली महाराज जहुरकर या संस्थेच्या प्राथमिक चौकशीत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बालकल्याण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही तपास केला जात आहे. एकीकडे हा तपास सुरु असताना या संस्थेला टाळे ठोकण्यात आले. यामुळं वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे... : माधव खांडेकर - मुख्य अधिकारी, आळंदी नगरपरिषद #आळंदी #पुणे #वारकरीसंप्रदाय #वारकरीशिक्षणसंस्था #बालसंरक्षण #अल्पवयीनमुली #आळंदीनगरपरिषद #महिलावबालकल्याण #पोलिसतपास #महाराष्ट्रबातम्या #Alandi #Pune #MaharashtraNews #ChildProtection #MinorGirls #WarkariSampraday #SpiritualInstitute #PoliceInvestigation #WomenAndChildWelfare #BreakingNews1
- Post by R A News1