वादळी पावसात वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान वादळी पावसात वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान पारध (भोकरदन तालुका प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध रामनगर (चौरीवाडी) येथे काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसात एक दुर्दैवी घटना घडली.अचानक आकाशात जोरदार वीज कडाडत असताना गट नंबर २०८ मधील शेतात बांधलेल्या बैलावर वीज कोसळली. या भीषण घटनेत बैलाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तुषार फकीरा भुते रा.पारध हे युवा शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असून बैल हा त्याच्या शेतीकामाचा मुख्य आधार होता. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे अंदाजे ५० हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी चेतन राजपूत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्यात बैलाचा मृत्यू वीज पडल्यामुळे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने अशा प्रकरणांमध्ये तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी,अशी मागणी परिसरातील स्थानिक शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.

- जळगाव शहरात अवकाळी पाऊसला सुरवात लोकांची तारांबळ आणि धावपळ1
- पैठण तालुक्यात गारांचा पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पैठण तालुक्यात आज अवकाळी गारांचा जोरदार पाऊस झाला. रांजणगाव, दांडगा परिसरात अचानक वातावरण बदलून आकाशात काळे ढग दाटले आणि काही वेळातच गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारांच्या तडाख्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विशेषतः भाजीपाला आणि फळबागांना फटका बसला आहे. वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.1
- जळगाव: आज ३० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासह प्रामुख्याने धरणगाव आणि जळगाव तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकडो शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान आज झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसह केळी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्र्यांची तत्परता शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (गुघे साहेब) आणि स्थानिक पातळीवरील सर्व तहसीलदारांना फोनवरून संपर्क साधून, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून पंचनाम्यांना सुरुवात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, उद्यापासूनच बाधित क्षेत्रातील पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. "एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे," अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवाहन जळगाव व धरणगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊन शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.2
- Post by गणेश मौर्य1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Shaha News Marathi1
- सिडकोत रिक्षा चालकांचा आक्रमक पवित्रा; प्रवाशांना अडवणाऱ्यांवर कडक कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरात रिक्षा चालकांनी गॅस टंचाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला असून, या पार्श्वभूमीवर सिडको चौक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. संपादरम्यान काही रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेत प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, काही चालकांनी सिटी बस तसेच सुरू असलेल्या रिक्षा अडवून प्रवाशांना प्रवास करण्यास मज्जाव केला. काही ठिकाणी प्रवाशांना जबरदस्तीने वाहनांतून खाली उतरवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घटनेची माहिती मिळताच सिडको वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत प्रवाशांना त्रास देणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्यात आली. काहींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.1