पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे 'जनगणना २०२७' अंतर्गत सुरू असलेल्या 'घरसूचीकरण व घरगणना' प्रक्रियेसाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही प्रक्रिया वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाची मागणी केली आहे. महापालिका क्षेत्रात १६ मेपासून प्रगणकांमार्फत ही प्रक्रिया सुरू असून, ती १४ जून २०२६ पर्यंत चालणार आहे. या जनगणनेमध्ये १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला स्व-गणना ओळख क्रमांक (SE ID) प्रगणकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, कारण याशिवाय संबंधित घराची जनगणना प्रक्रिया अंतिम पूर्ण होऊ शकत नाही. ज्या नागरिकांनी अद्याप स्व-गणना केलेली नाही, त्यांची माहिती प्रगणकांकडून प्रत्यक्ष भेटीद्वारे नोंदवली जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले की, जनगणना कायदा, १९४८ अंतर्गत राबविण्यात येणारी ही राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची प्रक्रिया असून, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांच्या प्रभावी नियोजनासाठी अचूक व विश्वासार्ह माहिती संकलन करणे महत्त्वाचे आहे. यामुळे, नागरिकांनी अधिकृत प्रगणकांना सकारात्मक प्रतिसाद देत विचारण्यात येणारी माहिती वेळेत व अचूकपणे उपलब्ध करून 'जनगणना २०२७' प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

- पुण्यातील विकाश नगर देहूरोड विभागाच्या भीमा शंकर कॉलनी परिसरात महानगरपालिकेचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.4
- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.1
- घडलेली घटना ही एक प्रकारे हत्याच आहे असे ठामपणे सांगण्यात आले आहे. या घटनेच्या पाठीमागे जे कोणीही असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे.1
- वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तोतया पोलिसाने मनी लाँड्रिंगच्या नावाखाली एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या घटनेत फसवणूकदाराने पीडित व्यक्तीकडून तब्बल १२.२८ लाख रुपये हडपले आहेत.1
- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूच्या सेवनामुळे २० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, प्रशासन अखेर जागे झाल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत, वाकड परिसरातील एका घरातून सुरू असलेल्या दारूच्या गुत्त्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. घरातूनच हा अवैध दारूचा व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विषारी दारू प्रकरणाच्या गंभीरतेनंतर, पोलिसांकडून आता शहरभरातील अशाच इतर अवैध दारू अड्ड्यांवरही व्यापक कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.1
- जलसंपदा विभागाने आपली १४ कार्यालये नाशिक अहिल्यानगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मराठवाड्यातून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. प्रदीप चव्हाण यांनी या निर्णयावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, हा मराठवाड्याला वाळवंट करण्याचा डाव आहे.1
- पुणे शहरात शिवसेनेने अवैध दारूच्या अड्ड्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या कारवाईदरम्यान शेकडो लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली.1
- विजयपूरमध्ये एक थरारक आणि निर्घृण सामूहिक हत्याकांड घडले आहे. या घटनेत एकूण ६ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, हल्लेखोरांनी गोळीबार करत आणि कोयत्याने गळे चिरून हे क्रूर कृत्य केले.1