logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अकोले (इंदापूर) येथे ग्रामदैवत श्री अंकलेश्वर देवाच्या यात्रेचा उद्यापासून शंखनाद; दोन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल !... इंदापूर तालुक्यातील अकोले येथील ग्रामदैवत श्री अंकलेश्वर देवाच्या वार्षिक यात्रेला चैत्र वद्य प्रतिपदा, शुक्रवार दि. ३ एप्रिलपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवासाठी गावाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. ​​यात्रेच्या पहिल्या दिवशी, शुक्रवारी सकाळी ६ वाजता श्री अंकलेश्वर देवाचा विधीवत अभिषेक आणि महापूजा संपन्न होईल. त्यानंतर यात्रेला अधिकृत सुरुवात होईल. दुपारी ४ वाजता गावातून 'निशाण काठ्यांची' सुविद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता ढोल-ताशांच्या गजरात देवाचा भव्य 'छबिना' व 'कावड मिरवणूक' निघणार असून, यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात येईल. मिरवणुकीनंतर ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना 'शेरणी' वाटप करण्यात येईल. ​यात्रेनिमित्त आलेल्या रसिकांसाठी शुक्रवारी रात्री १० वाजता 'मंगला बनसोडे' यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी याच तमाशाचा 'हजेरीचा' कार्यक्रम संपन्न होईल. ​​यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी दुपारी २ ते ४ या वेळेत जुन्या परंपरेतील 'कलगीवाले व तुरेवाले' यांचा खडाजंगी 'भेदीक सामना' रंगणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता कुस्ती शौकिनांसाठी 'भव्य कुस्त्यांचा आखाडा' भरवण्यात येणार असून, यात पंचक्रोशीतील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. ​यात्रेचा समारोप शनिवारी रात्री १० वाजता '३६ नखरेवाली' या भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाने होईल. यात्रेनिमित्त अंकलेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंदिर परिसर उजळून निघाला आहे. या यात्रेसाठी अकोले परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. मंगला बनसोडे यांचा तमाशा, कुस्त्यांचा आखाडा आणि ३६ नखरेवाली ऑर्केस्ट्रा ठरणार मुख्य आकर्षण..

2 hrs ago
user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
d8666ef3-e2fc-4e17-b332-e2cde94f3cde

अकोले (इंदापूर) येथे ग्रामदैवत श्री अंकलेश्वर देवाच्या यात्रेचा उद्यापासून शंखनाद; दोन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल !... इंदापूर तालुक्यातील अकोले येथील ग्रामदैवत श्री अंकलेश्वर देवाच्या वार्षिक यात्रेला चैत्र वद्य प्रतिपदा, शुक्रवार दि. ३ एप्रिलपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवासाठी गावाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. ​​यात्रेच्या पहिल्या दिवशी, शुक्रवारी सकाळी ६ वाजता श्री अंकलेश्वर देवाचा विधीवत अभिषेक आणि महापूजा संपन्न होईल. त्यानंतर यात्रेला अधिकृत सुरुवात होईल. दुपारी ४ वाजता गावातून 'निशाण काठ्यांची' सुविद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता ढोल-ताशांच्या गजरात देवाचा भव्य 'छबिना' व 'कावड मिरवणूक' निघणार असून, यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात येईल. मिरवणुकीनंतर ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना 'शेरणी' वाटप करण्यात येईल. ​यात्रेनिमित्त आलेल्या रसिकांसाठी शुक्रवारी रात्री १० वाजता 'मंगला बनसोडे' यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी याच तमाशाचा 'हजेरीचा' कार्यक्रम संपन्न होईल. ​​यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी दुपारी २ ते ४ या वेळेत जुन्या परंपरेतील 'कलगीवाले व तुरेवाले' यांचा खडाजंगी 'भेदीक सामना' रंगणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता कुस्ती शौकिनांसाठी 'भव्य कुस्त्यांचा आखाडा' भरवण्यात येणार असून, यात पंचक्रोशीतील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. ​यात्रेचा समारोप शनिवारी रात्री १० वाजता '३६ नखरेवाली' या भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाने होईल. यात्रेनिमित्त अंकलेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंदिर परिसर उजळून निघाला आहे. या यात्रेसाठी अकोले परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. मंगला बनसोडे यांचा तमाशा, कुस्त्यांचा आखाडा आणि ३६ नखरेवाली ऑर्केस्ट्रा ठरणार मुख्य आकर्षण..

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • थोपटेवाडी गावात काही भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या कामामुळे फूटल्याने आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाल्याने संतप्त नागरिक व महिला भगिनींनी पंचायत समिती बारामती या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व तात्काळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास बारामती पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यासंदर्भातील निवेदन तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आणि नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला भेट देऊन फुटलेल्या पाईपलाईन ठिकाणी मुख्य रस्त्यावरती भर उन्हात उभे राहून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दिल्या.
    1
    थोपटेवाडी गावात काही भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या कामामुळे फूटल्याने आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाल्याने संतप्त नागरिक व महिला भगिनींनी पंचायत समिती बारामती या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व तात्काळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास बारामती पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यासंदर्भातील निवेदन तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आणि नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला भेट देऊन फुटलेल्या पाईपलाईन ठिकाणी मुख्य रस्त्यावरती भर उन्हात उभे राहून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दिल्या.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • रमाबाई जयंती व महिला दिन मोठ्या उत्साहाने सजरा...
    1
    रमाबाई जयंती व महिला दिन मोठ्या उत्साहाने  सजरा...
    user_Digital media.
    Digital media.
    Financial Analyst माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by ईलियास नजीर शेख
    1
    Post by ईलियास नजीर शेख
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}: येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साई गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छता समितीचे सभापती एजाज बागवान, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे, नियोजन व विकास गृहनिर्माण समिती सभापती स्वाती साठे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेविका संगीता मल्लाव, रिंकू जगताप, स्वीटी शिंदे, नगरसेवक सागर नरवडे, निलेश पवार, अमोल चव्हाण आदींसह संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा, विश्वस्त सुवालाल पोखरणा, पूजा पोखरणा, आदित्य पोखरणा, आदिती पोखरणा, नोटरी देवराम धुमाळ, प्रा. अलका बेलोटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, महेश कटारिया, वृषाली मुसळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जात असल्याचे कौतुक नगराध्यक्षा पाचर्णे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे प्रास्ताविकात अध्यक्ष विकास पोखरणा यांनी सांगितले. इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी वाढल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कलाविष्कारांनी उपस्थितांची मनं जिंकली. रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाट्य, विठ्ठल-रुक्मिणी आणि पंढरीच्या वारीवरील सादरीकरण, तसेच हिंदी व मराठी गीतांचे गायन आणि चित्रपट गीतांवरील नृत्यांनी रंगत आणली. शाळेच्या बँड पथकाने ड्रमसह वादन सादर करत कार्यक्रमाला वेगळी उंची दिली. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेच्या शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी केले. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.
    4
    शिरूर { डेली न्यूज  पोस्ट 24}: येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साई गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छता समितीचे सभापती एजाज बागवान, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे, नियोजन व विकास गृहनिर्माण समिती सभापती स्वाती साठे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेविका संगीता मल्लाव, रिंकू जगताप, स्वीटी शिंदे, नगरसेवक सागर नरवडे, निलेश पवार, अमोल चव्हाण आदींसह संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा, विश्वस्त सुवालाल पोखरणा, पूजा पोखरणा, आदित्य पोखरणा, आदिती पोखरणा, नोटरी देवराम धुमाळ, प्रा. अलका बेलोटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, महेश कटारिया, वृषाली मुसळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जात असल्याचे कौतुक नगराध्यक्षा पाचर्णे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे प्रास्ताविकात अध्यक्ष विकास पोखरणा यांनी सांगितले. इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कलाविष्कारांनी उपस्थितांची मनं जिंकली. रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाट्य, विठ्ठल-रुक्मिणी आणि पंढरीच्या वारीवरील सादरीकरण, तसेच हिंदी व मराठी गीतांचे गायन आणि चित्रपट गीतांवरील नृत्यांनी रंगत आणली. शाळेच्या बँड पथकाने ड्रमसह वादन सादर करत कार्यक्रमाला वेगळी उंची दिली.
कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेच्या शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी केले. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ----- (प्रतिनिधी):- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ०१ एप्रिल बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी केले. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर, कदम, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. __-__ एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित :- डॉ.क्रांती देशपांडे, डॉ.सुनिता बारकुल एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणते ही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी केले. __-__ या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
    1
    -----
(प्रतिनिधी):- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ०१ एप्रिल बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी केले. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर, कदम, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
__-__
एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित :- डॉ.क्रांती देशपांडे, डॉ.सुनिता बारकुल
एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणते ही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी केले.
__-__
या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून गेले असून नागरीक जखमी झाल्याची घटना घडली आहे.गारपिटीसह वारा आणि पाऊस आल्याने नागरिकांचे घराचे नुकसान झाले असून शेतातील पिकांमध्ये पाणी साठल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
    1
    भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून गेले असून  नागरीक जखमी झाल्याची घटना घडली आहे.गारपिटीसह वारा आणि पाऊस आल्याने नागरिकांचे घराचे  नुकसान झाले असून शेतातील पिकांमध्ये पाणी साठल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?
    1
    बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.