विद्युत वितरण कंपनीच्या बोगस कामाची पोलखोल; एकाच पावसात लोखंडी पोल कोसळले विद्युत वितरण कंपनीच्या बोगस कामाची पोलखोल; एकाच पावसात लोखंडी पोल कोसळले.. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागांतर्गत खाजगी कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या कामांमधील बोगसगिरी अवकाळी पावसात उघड झाली आहे. बुधवारी (दि. १) रात्री झालेल्या पावसामुळे विविध ठिकाणी उभारलेले लोखंडी विद्युत पोल कोसळल्याने निकृष्ट दर्जाच्या कामांचा पर्दाफाश झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तालुक्यातील गेवराई, मादळमोही, तलवडा, चकलांबा, उमापूर, पाडळसिंगी, पाचेगाव आदी ग्रामीण भागात ३३ केव्ही केंद्रांतून विद्युत लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम खाजगी कंत्राटदारांकडून करण्यात येत असून, पोल केवळ खड्डे खणून मातीत उभे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक ठिकाणी पोलचे मजबुतीकरण (मफिंग) न करता उभारणी करण्यात आल्याने ते वादळी वारे व पावसात कोसळत आहेत. याशिवाय, दोन पोलमधील अंतर वाढवून साहित्याची बचत केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे तारा लोंबकळणे, लाईन असंतुलित होणे आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होणे अशा समस्या निर्माण होत आहेत. काही ठिकाणी तारा शेतात किंवा रस्त्यावर पडण्याच्या घटनाही घडल्या असून, यामुळे जीवितहानीचा धोका वाढला आहे. ग्रामस्थांनी यापूर्वीही या कामांबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. संगनमताने नियमबाह्य पद्धतीने कामे करून कोट्यवधी रुपयांची बिले उचलण्यात आल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून गेवराई तालुक्यातील सर्व कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

- पक्षविरोधी कारवाई; काँग्रेसकडून जालन्यात 7 नगरसेवक निलंबित स्वीकृत सदस्य निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा ठपका; पक्षाची कडक कारवाई1
- समृद्धी महा मार्गावर भीषण अपघातात जालना 6 मजूर महिलांचा मृत्यू, जालन्यातील कडवंची शिवारात घडली घटना1
- राजनगाव येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने एक जनास बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे1
- सिल्लोड : पालोद येथील माणिकराव पालोदकर महाविद्यालयातील प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न, आजी-माजी शिक्षक विद्यार्थी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Jansagar 9 Marathi1
- जालना - समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ७ महिला मजूर ठार, ४ गंभीर जखमी !उभ्या असलेल्या पिकअपला ट्रॅकची धडक.. समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात बुधवारी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने ७ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गवत काढण्याच्या कामासाठी आलेल्या महिला मजुरांना घेण्यासाठी पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला थांबले होते. याचवेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअपचा पूर्ण चक्काचूर झाला असून मृत महिलांचे मृतदेह रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले होते. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला दिसत होता, तसेच महिलांचे जेवणाचे डबे, चपला व इतर साहित्य विखुरलेले आढळले. मृत महिलांची नावे पुढीलप्रमाणे : १) अल्काबाई दादाराव आदमाने (निधोना) २) लक्ष्मीबाई संतोष मदन (केळीगव्हाण) ३) मिना परमेश्वर आदमाने (निधोना) ४) कांचनबाई प्रकाश आदमाने (निधोना) ५) ताराबाई गहेनाजी चौधरी (केळीगव्हाण) ६) कडुबाई रामदास मदन (केळीगव्हाण) ७) सुमनबाई कचरू आदमाने (निधोना) मृत महिला या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण व परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमी महिलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.1
- जालन्यात पहाटेच धडक कारवाई; तीन कंटेनरमधून सव्वा कोटींचं मांस जप्त!.. या तीनही कंटेनरमध्ये सुमारे 120 टन मांस असल्याचे समोर आले..1
- भोकरदन मधील जळगाव सपकाळ,आडगाव शिवारात जोरदार गारपीठिमुळे रब्बी पिकांचे नुकसान1