logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दगड खदाणी प्रकल्पाला कान्ह़ोलीबारा जनतेचा प्रचंड विरोध. हिंगणा : हिंगणा तालुक्यातील मौजा सिंगारदीप (रिठी) परिसरात प्रस्तावित सहा दगड खदाणी समूह प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पर्यावरण विषयक सार्वजनिक जाहीर सुनावणी कान्होलीबारा चौकी रस्त्यावरील राज सेलिब्रेशन सभागृहात प्रचंड नागरिकांच्या विरोधात संपन्न झाली.ही सुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अनुप खांडे, प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे व उप प्रादेशिक अधिकारी सुशीलकुमार राठोड उपस्थित होते. हा प्रकल्प विविध खासगी प्रस्तावकांकडून सादर करण्यात आला असून त्यासाठी पर्यावरणीय मंजुरी प्रक्रियेचा भाग म्हणून नागरिकांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याने ही सुनावणी आयोजित करण्यात आली होती. सुनावणी शुक्रवार दिनांक (१३ फेब्रुवारी २०२६) रोजी सुरू झाली.तेंव्हा कान्होलीबारा परिसरात काही वर्षापासून ज्या खदानी सुरू आहेत.त्यापासून परिसरातील विद्यार्थी, तरूण, शेतकरी, शेतमजूर, महिला , म्हातारी व रूग्णांना प्रचंड त्रास होत आहे. परिसरात भरधाव वेगाने वाहणारे ट्रक, ट्रकमधून रस्त्यावर सांडणारी गिट्टी,गिट्टीमुळे होणारे अपघात, ओव्हरलोड ट्रकमुळे वारंवार रस्ते खराब होतात.व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात.पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून अपघात होतात. श्वसनाचे विकार, दूषित पाणी व शेतातील पिंकांवर बसलेल्या धुळीमुळे उत्पन्नावर होणारा परिणाम.या व इतर त्रासाला आधीच जनता कंटाळून गेलेली आहे. जनसुनावनीमध्ये उपस्थित ग्रामपंचायत सदस्य राहुल सोमनकर,नागो गव्हाळे, सारिका जुनघरे, सिमा कुकडे, मनिषा कुकडकर,भुषण आंबुलकर,युगेश डहाके,साहिल दुधबडे,संजय वास्कर,कृष्णा कुनघटकर , अखिलेश पांडे,रवि गव्हाळे, नितीन आदमने इत्यादी अनेकांनी प्रकल्पाला विरोध केला. (मौजा सिंगार‌दिप (रिठी) येथे आधीच सुरु असलेल्या खदानीतील प्रदूषणामुळे कान्होलीबारा गावातील व परिसरातील नागरीक त्रस्त आहे. लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहे. याचा दुष्परिणाम शेतातील पीकांचे नुकसान, जलस्त्रोतांची खोल गेलेली पात‌ळी .जलस्त्रोतामध्ये होत असलेल्या प्रदूषणामुळे मच्छिमार बांधवांचा उपजीवीकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाकडून काटेकोरपणे "मसुदा पर्यावरणीय प्रभाव मुल्यांकनाचे कार्यकारी सारांश" याचे खदान मालकांकडून पालन करून घ्यावे नंतरच पुढील विचार करावा .हे न झाल्यास आम्ही तीव्रपणे सांविधानिक मार्गाने जनहीतासाठी व पर्यावरण रक्षणासाठी जनआंदोलन करु. निशांत बोटरे, उपसरपंच, कान्होलीबारा. आधीपासून सुरू असलेल्या ज्या खदानी आहे .त्यांनी शासनाने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी केली नाही. आजच्या सुनावणी मध्ये जनतेचा जो काही रोष होता .याचे सर्वस्वी जिम्मेदार प्रशासन आहे .कारण खदानी सुरू झल्या आणि शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हवेचे प्रदूषण,शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान ,ओवरलोड वाहतुकीमुळे रस्त्यावर पडलेल्या चुरीमुळे अपघाताचे प्रमाणात वाढ, पाण्याची पातळी खालावली व मोठ्या प्रमाणात जंगल तोड, याच कारणामुळे होणाऱ्या नवीन खदानीचा विरोध करण्यात आला. ओमप्रकाश काकडे कान्होलीबारा व आजुबाजूच्या गावातील लोकांना सुद्धा वर्तमान खदानी मालकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे लोकांच्या घराला तडे जात आहे. रस्त्यावर पडत असलेल्या गिट्टीमुळे लोकांचे अपघात होत आहे त्यामुळे गावातील लोकांचा या सहा खदानीला विरोध आहे. राहुल आदमने आपल्या जन्मभूमि व कर्मभूमि मध्ये गिट्टीखदान मुळे प्रदूषण आणि धोका निर्माण होणार आहे. कारण गिट्टी, चूर आणि निघणारा धूर त्यामुळे फुफ्फुसाचे रोग लहान मुलान पासून तर वृद्धा पर्यंत आहे. कान्होलीबारा तलाव हे जुन्या गिट्टीखदान पासून 500 मीटर वर आहे. त्यामुळे भिंतीला तडे जात आहे.

6 hrs ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
Nagpur (Rural), Maharashtra•
6 hrs ago
78241a70-9610-427f-bf48-8b87b31541e4

दगड खदाणी प्रकल्पाला कान्ह़ोलीबारा जनतेचा प्रचंड विरोध. हिंगणा : हिंगणा तालुक्यातील मौजा सिंगारदीप (रिठी) परिसरात प्रस्तावित सहा दगड खदाणी समूह प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पर्यावरण विषयक सार्वजनिक जाहीर सुनावणी कान्होलीबारा चौकी रस्त्यावरील राज सेलिब्रेशन सभागृहात प्रचंड नागरिकांच्या विरोधात संपन्न झाली.ही सुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अनुप खांडे, प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे व उप प्रादेशिक अधिकारी सुशीलकुमार राठोड उपस्थित होते. हा प्रकल्प विविध खासगी प्रस्तावकांकडून सादर करण्यात आला असून त्यासाठी पर्यावरणीय मंजुरी प्रक्रियेचा भाग म्हणून नागरिकांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याने ही सुनावणी आयोजित करण्यात आली होती. सुनावणी शुक्रवार दिनांक (१३ फेब्रुवारी २०२६) रोजी सुरू झाली.तेंव्हा कान्होलीबारा परिसरात काही वर्षापासून ज्या खदानी सुरू आहेत.त्यापासून परिसरातील विद्यार्थी, तरूण, शेतकरी, शेतमजूर, महिला , म्हातारी व रूग्णांना प्रचंड त्रास होत आहे. परिसरात भरधाव वेगाने वाहणारे ट्रक, ट्रकमधून रस्त्यावर सांडणारी गिट्टी,गिट्टीमुळे होणारे अपघात, ओव्हरलोड ट्रकमुळे वारंवार रस्ते खराब होतात.व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात.पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून अपघात होतात. श्वसनाचे विकार, दूषित पाणी व शेतातील पिंकांवर बसलेल्या धुळीमुळे उत्पन्नावर होणारा परिणाम.या व इतर त्रासाला आधीच जनता कंटाळून गेलेली आहे. जनसुनावनीमध्ये उपस्थित ग्रामपंचायत सदस्य राहुल सोमनकर,नागो गव्हाळे, सारिका जुनघरे, सिमा कुकडे, मनिषा कुकडकर,भुषण आंबुलकर,युगेश डहाके,साहिल दुधबडे,संजय वास्कर,कृष्णा कुनघटकर , अखिलेश पांडे,रवि गव्हाळे, नितीन आदमने इत्यादी अनेकांनी प्रकल्पाला विरोध केला. (मौजा सिंगार‌दिप (रिठी) येथे आधीच सुरु असलेल्या खदानीतील प्रदूषणामुळे कान्होलीबारा गावातील व परिसरातील नागरीक त्रस्त आहे. लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहे. याचा दुष्परिणाम शेतातील पीकांचे नुकसान, जलस्त्रोतांची खोल गेलेली पात‌ळी .जलस्त्रोतामध्ये होत असलेल्या प्रदूषणामुळे मच्छिमार बांधवांचा उपजीवीकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाकडून काटेकोरपणे "मसुदा पर्यावरणीय प्रभाव मुल्यांकनाचे कार्यकारी सारांश" याचे खदान मालकांकडून पालन करून घ्यावे नंतरच पुढील विचार करावा .हे न झाल्यास आम्ही तीव्रपणे सांविधानिक मार्गाने जनहीतासाठी व पर्यावरण रक्षणासाठी जनआंदोलन करु. निशांत बोटरे, उपसरपंच, कान्होलीबारा. आधीपासून सुरू असलेल्या ज्या खदानी आहे .त्यांनी शासनाने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी केली नाही. आजच्या सुनावणी मध्ये जनतेचा जो काही रोष होता .याचे सर्वस्वी जिम्मेदार प्रशासन आहे .कारण खदानी सुरू झल्या आणि शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हवेचे प्रदूषण,शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान ,ओवरलोड वाहतुकीमुळे रस्त्यावर पडलेल्या चुरीमुळे अपघाताचे प्रमाणात वाढ, पाण्याची पातळी खालावली व मोठ्या प्रमाणात जंगल तोड, याच कारणामुळे होणाऱ्या नवीन खदानीचा विरोध करण्यात आला. ओमप्रकाश काकडे कान्होलीबारा व आजुबाजूच्या गावातील लोकांना सुद्धा वर्तमान खदानी मालकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे लोकांच्या घराला तडे जात आहे. रस्त्यावर पडत असलेल्या गिट्टीमुळे लोकांचे अपघात होत आहे त्यामुळे गावातील लोकांचा या सहा खदानीला विरोध आहे. राहुल आदमने आपल्या जन्मभूमि व कर्मभूमि मध्ये गिट्टीखदान मुळे प्रदूषण आणि धोका निर्माण होणार आहे. कारण गिट्टी, चूर आणि निघणारा धूर त्यामुळे फुफ्फुसाचे रोग लहान मुलान पासून तर वृद्धा पर्यंत आहे. कान्होलीबारा तलाव हे जुन्या गिट्टीखदान पासून 500 मीटर वर आहे. त्यामुळे भिंतीला तडे जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज वृत्तसेवा नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by The Indian Matrimony
    1
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    6 hrs ago
  • कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | #KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    1
    कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | 
#KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • कुही तालुक्यात स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे उद्घाटन सेंद्रिय शेतीतून शाश्वत शेतीकडे वाटचालीचे आवाहन ता. प्रतिनिधी कुही :- कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नागपूर अंतर्गत केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत दीपस्तंभ ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, उमरेड-भिवापूर-कुही यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे (बीआरसी लॅब) उद्घाटन आज सकाळी ११ वाजता किन्ही (ता. कुही) येथील संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांच्या शेतावर उत्साहात पार पडले. बीआरसी लॅबचे उद्घाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सेंद्रिय शेतीकडून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वनिर्मित निविष्ठा संसाधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध होतील, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया करून अधिक मूल्यवर्धन करावे, असे त्यांनी सुचविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव राऊत, उपाध्यक्ष मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, बेला होते. त्यांनी शाश्वत शेतीमुळे शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो, असे सांगत जैविक संसाधन केंद्राच्या माध्यमातून कमी दरात निविष्ठा उपलब्ध होण्याचा फायदा अधोरेखित केला. विभागीय कृषी सहसंचालक नागपूर उमेश घाटगे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांमध्ये बदल करून फळबाग लागवडीकडे वळावे, त्यामुळे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन केले. कृषिविद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, कृषी महाविद्यालय नागपूर यांनी ‘१० ड्रम थेअरी’ संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रकल्प संचालक आत्मा नागपूर डॉ. अर्चना कडू यांनी बीआरसी लॅबचे महत्त्व स्पष्ट करत सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी व संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांचा सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले, उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील, दीपस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष भाऊराव तलमले व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी कुही राजेश जारोंडे यांनी केले. कार्यक्रमाला उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    कुही तालुक्यात स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे उद्घाटन
सेंद्रिय शेतीतून शाश्वत शेतीकडे वाटचालीचे आवाहन
ता. प्रतिनिधी कुही :- 
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नागपूर अंतर्गत केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत दीपस्तंभ ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, उमरेड-भिवापूर-कुही यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे (बीआरसी लॅब) उद्घाटन आज सकाळी ११ वाजता किन्ही (ता. कुही) येथील संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांच्या शेतावर उत्साहात पार पडले.
बीआरसी लॅबचे उद्घाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सेंद्रिय शेतीकडून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वनिर्मित निविष्ठा संसाधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध होतील, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया करून अधिक मूल्यवर्धन करावे, असे त्यांनी सुचविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव राऊत, उपाध्यक्ष मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, बेला होते. त्यांनी शाश्वत शेतीमुळे शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो, असे सांगत जैविक संसाधन केंद्राच्या माध्यमातून कमी दरात निविष्ठा उपलब्ध होण्याचा फायदा अधोरेखित केला.
विभागीय कृषी सहसंचालक नागपूर उमेश घाटगे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांमध्ये बदल करून फळबाग लागवडीकडे वळावे, त्यामुळे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन केले. कृषिविद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, कृषी महाविद्यालय नागपूर यांनी ‘१० ड्रम थेअरी’ संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात प्रकल्प संचालक आत्मा नागपूर डॉ. अर्चना कडू यांनी बीआरसी लॅबचे महत्त्व स्पष्ट करत सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्रगतशील शेतकरी व संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांचा सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले, उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील, दीपस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष भाऊराव तलमले व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी कुही राजेश जारोंडे यांनी केले.
कार्यक्रमाला उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏 #drmeherabbas #hearthealth #routinehearttest #HeartHealthAwareness #heartattack DrMeher Abbas TopFans @highlight
    1
    Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏
#drmeherabbas
#hearthealth 
#routinehearttest 
#HeartHealthAwareness 
#heartattack 
DrMeher Abbas 
TopFans 
@highlight
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    7 hrs ago
  • जिला पंचायत अध्यक्ष ने गरीब व्यक्ति को इलाज के लिए दी सहायता अमेठी पूरे मोतीराम मजरे करौदी गांव निवासी एक गरीब ग्रामीण को कूल्हे के इलाज के लिए जिला पंचायत अध्यक्ष ने मदद किया है बुधवार को पूरे मोती रामनिवासी शुभम पाल जिला पंचायत अध्यक्ष राजेश अग्रहरि के पास अपने भाई के कूल्हे के इलाज के लिए आर्थिक मदद मांगने गया उसने बताया कि उसके भाई के कूल्हे की हड्डी टूट गई है जिसे बदलने के लिए पैसे की आवश्यकता है उसके पास पैसा नहीं है जिला पंचायत अध्यक्ष राजेश ने पीड़ित व्यक्ति को 25हजार की आर्थिक मदद देकर कहा और जो आवश्यकता होगी उसे भी पूरा किया जाएगा वीरेंद्र यादव हरिकेश श्रीवास्तव आदि लोग थे
    1
    जिला पंचायत अध्यक्ष ने गरीब व्यक्ति को इलाज के लिए दी सहायता 
अमेठी 
पूरे मोतीराम मजरे करौदी गांव निवासी एक गरीब ग्रामीण को कूल्हे के इलाज के लिए जिला पंचायत अध्यक्ष ने मदद किया है 
बुधवार को पूरे मोती रामनिवासी शुभम पाल जिला पंचायत अध्यक्ष राजेश अग्रहरि के पास अपने भाई के कूल्हे के इलाज के लिए आर्थिक मदद मांगने गया उसने बताया कि उसके भाई के कूल्हे की हड्डी टूट गई है जिसे बदलने के लिए पैसे की आवश्यकता है उसके पास पैसा नहीं है जिला पंचायत अध्यक्ष राजेश ने पीड़ित व्यक्ति को 25हजार की आर्थिक मदद देकर कहा और जो आवश्यकता होगी उसे भी पूरा किया जाएगा वीरेंद्र यादव हरिकेश श्रीवास्तव आदि लोग थे
    user_Madusoodan
    Madusoodan
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • काळ पुढे सरकत जातो. जबाबदाऱ्या वाढत जातात. जीवनाच्या व्यापात दिवस निघून जातात. पण मनाच्या एका कोपऱ्यात मैत्री मात्र शांतपणे थांबून राहते' फक्त पुन्हा एकदा हाक येण्याची वाट पाहत… आणि अशीच एक हाक आली.. चला.. अंकुर व्हॅली येथे . 'दे धमाल… बेमिसाल… गेट टुगेदर!' साठी. जवळजवळ चार दशकांनंतर कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय चे माजी विद्यार्थी ‘आनंद मेळावा’ या नावाखाली पुन्हा एकत्र आले. ही भेट केवळ पुनर्भेट नव्हती; ती विस्मरणात गेलेल्या आठवणींची पुनःप्रत्ययाची पर्वणी होती. ती काळाच्या पडद्याआड हरवलेल्या क्षणांची पुनर्भेट होती. अहमदनगरपासून काही अंतरावर, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भाळवणी येथील 'अंकुर व्हॅली'मध्ये जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आगमनाच्या क्षणीच गुलाबपुष्प देऊन झालेले स्वागत मनाला स्पर्शून गेले. त्या सुगंधी क्षणांनी मेळाव्याच्या आनंदाला पहिल्याच भेटीत सुंदर सुरुवात दिली. धुळीत हरवलेली पायवाट आज पुन्हा हसत भेटली; वय वाढलं, काळ बदलला, पण मैत्री तशीच राहिली. रुपेरी केसांची छटा अलगद डोकावत होती, मेकअप मागचं वय हलकेच स्मित करत होतं; पण मन मात्र पुन्हा कॉलेजच्या दिवसांत रमलं होतं. एकेक आठवण उलगडत गेली, हास्याच्या लहरींमध्ये भूतकाळ वर्तमानात येऊन विसावला. या सुंदर मेळाव्यामागे ग्रुप ॲडमिन संजय भैलुमे यांची शोधक वृत्ती, जिद्द आणि आपुलकी होती. एकेक मित्र शोधत त्यांनी तब्बल १३५ माजी विद्यार्थ्यांना एकाच स्नेहसूत्रात गुंफले आहे. त्यातील आम्ही 33 सदस्य आज इथे जमलो होतो. त्यांना साथ देणारे सुरेश साळुंके, आप्पासाहेब होले , दत्ता नेवसे, सुनील चाफे, रंगनाथ सुपेकर, रावसाहेब साळवे, , सुरेंद्र चव्हाण, शोभा महामुनी,शकुंतला जेवरे यांचे आणि उपस्थित सर्वांचेच..परिश्रम या यशामागे मोलाचे ठरले. प्रसंग क्षणभर आठवणी जीवनभर जपून ठेवण्यासाठी आशा गिरमे,अनिता व्यवहारे यांनी सर्वांचे हसरे चेहरे बोलके डोळे आपल्या मोबाईलमध्ये एका क्लिक ने जपून ठेवले.. दादा पाटील महाविद्यालयातून ज्ञानरूपी शिक्षणाची शिदोरी घेऊन आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालो. गुरुजनांचे संस्कार, आई-वडिलांची पुण्याई आणि स्वतःच्या कष्टांची जोड देत प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिक वाटचाल केली. शिक्षण, नोकरी, संसार या त्रिसूत्रीत आयुष्य गुंतलं होतं; स्वतःसाठी वेळ कमी पडत गेला,पण मैत्री मात्र मनात जपली गेली. “तेव्हाचा मी आणि आजचा मी” असं मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने संघर्ष, कर्तृत्व आणि समाधानाचा प्रवास उलगडला. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत साठीकडे झुकलेलं वय.. पण मन मात्र अजूनही तरुण! हसताना नकळत डोळ्यांच्या कडेला ओल आली; आठवणी बोलक्या झाल्या; आज पुन्हा एकदा आपण ‘आपले’ झालो. या आनंद मेळाव्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे मित्र–मैत्रिणींसोबत त्यांच्या पती-पत्नींचाही सहभाग. गप्पा, गाणी, नृत्य, मिश्किल टोमणे आणि मनमोकळं हास्य या साऱ्यांनी वातावरण भारावून गेलं. मैत्री जेव्हा कुटुंबांपर्यंत पोहोचते, तेव्हा नात्यांना नवं बळ मिळतं. हसण्यातून हसू वाढतं, आणि आयुष्य अधिक हलकं होतं. या प्रसंगी कर्जतवरून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांना "प्रफुल्लित मने" हे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी पुस्तक भेट दिले. ही भेट म्हणजे केवळ पुस्तक नव्हते; तर विचारांची, प्रेरणेची आणि सकारात्मकतेची शिदोरी होती. निरोपाच्या क्षणी आप्पासाहेब होले यांनी एक छोटीशी ऑफिशियल बॅग देऊन आदरपूर्वक निरोप दिला. त्या क्षणातही आपुलकीची ऊब होती. 'अंकुर व्हॅलीचे निसर्गरम्य वातावरण, आपुलकीचे आदरातिथ्य, सुग्रास भोजन आणि उत्तम व्यवस्था' या सर्वांनी आनंद द्विगुणित केला. हा मेळावा म्हणजे केवळ भेट नव्हती; तो काळाशी केलेला संवाद होता. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही; ती फक्त नव्याने उमलत राहते. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही.. ती फक्त नव्याने उमलत राहते… असे आनंद मेळावे पुन्हा पुन्हा घडत राहोत… मैत्रीचा हा स्नेहसोहळा असाच दरवेळी फुलत राहो. हा अनुभव, हा आनंद पुन्हा पुन्हा मिळत राहो आणि लवकरच पुन्हा भेटण्याचा सुंदर योग यावा… हीच मनापासून इच्छा...!
    2
    काळ पुढे सरकत जातो.
जबाबदाऱ्या वाढत जातात.
जीवनाच्या व्यापात दिवस निघून जातात.
पण मनाच्या एका कोपऱ्यात
मैत्री मात्र शांतपणे थांबून राहते'
फक्त पुन्हा एकदा हाक येण्याची वाट पाहत…
आणि अशीच एक हाक आली..
चला.. अंकुर व्हॅली येथे .
'दे धमाल… बेमिसाल… गेट टुगेदर!' साठी. 
जवळजवळ चार दशकांनंतर
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय चे माजी विद्यार्थी
‘आनंद मेळावा’ या नावाखाली पुन्हा एकत्र आले.
ही भेट केवळ पुनर्भेट नव्हती;
ती विस्मरणात गेलेल्या आठवणींची पुनःप्रत्ययाची पर्वणी होती.
ती काळाच्या पडद्याआड हरवलेल्या क्षणांची पुनर्भेट होती.
अहमदनगरपासून काही अंतरावर,
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भाळवणी येथील 'अंकुर व्हॅली'मध्ये
जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो,
तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद
ओसंडून वाहत होता.
आगमनाच्या क्षणीच
गुलाबपुष्प देऊन झालेले स्वागत
मनाला स्पर्शून गेले.
त्या सुगंधी क्षणांनी
मेळाव्याच्या आनंदाला पहिल्याच भेटीत सुंदर सुरुवात दिली.
धुळीत हरवलेली पायवाट
आज पुन्हा हसत भेटली;
वय वाढलं, काळ बदलला,
पण मैत्री तशीच राहिली.
रुपेरी केसांची छटा अलगद डोकावत होती,
मेकअप मागचं वय हलकेच स्मित करत होतं;
पण मन मात्र पुन्हा कॉलेजच्या दिवसांत रमलं होतं.
एकेक आठवण उलगडत गेली,
हास्याच्या लहरींमध्ये भूतकाळ वर्तमानात येऊन विसावला.
या सुंदर मेळाव्यामागे
ग्रुप ॲडमिन संजय भैलुमे यांची शोधक वृत्ती, जिद्द आणि आपुलकी होती.
एकेक मित्र शोधत त्यांनी तब्बल १३५ माजी विद्यार्थ्यांना
एकाच स्नेहसूत्रात गुंफले आहे. त्यातील आम्ही 33 सदस्य आज इथे जमलो होतो. 
त्यांना साथ देणारे
सुरेश साळुंके, आप्पासाहेब होले , दत्ता नेवसे,
सुनील चाफे, रंगनाथ सुपेकर, रावसाहेब साळवे,
, सुरेंद्र चव्हाण, शोभा महामुनी,शकुंतला जेवरे 
यांचे   आणि उपस्थित सर्वांचेच..परिश्रम या यशामागे मोलाचे ठरले.
प्रसंग क्षणभर आठवणी जीवनभर जपून ठेवण्यासाठी आशा गिरमे,अनिता व्यवहारे यांनी सर्वांचे हसरे चेहरे बोलके डोळे आपल्या मोबाईलमध्ये एका क्लिक ने जपून ठेवले..
दादा पाटील महाविद्यालयातून
ज्ञानरूपी शिक्षणाची शिदोरी घेऊन
आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालो.
गुरुजनांचे संस्कार,
आई-वडिलांची पुण्याई
आणि स्वतःच्या कष्टांची जोड देत
प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिक वाटचाल केली.
शिक्षण, नोकरी, संसार
या त्रिसूत्रीत आयुष्य गुंतलं होतं;
स्वतःसाठी वेळ कमी पडत गेला,पण मैत्री मात्र मनात जपली गेली.
“तेव्हाचा मी आणि आजचा मी”
असं मनोगत व्यक्त करताना
प्रत्येकाने संघर्ष, कर्तृत्व आणि समाधानाचा प्रवास उलगडला.
संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत
साठीकडे झुकलेलं वय..
पण मन मात्र अजूनही तरुण!
हसताना नकळत डोळ्यांच्या कडेला ओल आली;
आठवणी बोलक्या झाल्या;
आज पुन्हा एकदा
आपण ‘आपले’ झालो.
या आनंद मेळाव्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे
मित्र–मैत्रिणींसोबत त्यांच्या पती-पत्नींचाही सहभाग.
गप्पा, गाणी, नृत्य, मिश्किल टोमणे
आणि मनमोकळं हास्य
या साऱ्यांनी वातावरण भारावून गेलं.
मैत्री जेव्हा कुटुंबांपर्यंत पोहोचते,
तेव्हा नात्यांना नवं बळ मिळतं.
हसण्यातून हसू वाढतं,
आणि आयुष्य अधिक हलकं होतं.
या प्रसंगी कर्जतवरून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी
उपस्थित सर्वांना "प्रफुल्लित मने" हे
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी पुस्तक भेट दिले.
ही भेट म्हणजे केवळ पुस्तक नव्हते;
तर विचारांची, प्रेरणेची आणि सकारात्मकतेची शिदोरी होती.
निरोपाच्या क्षणी
आप्पासाहेब होले यांनी
एक छोटीशी ऑफिशियल बॅग देऊन
आदरपूर्वक निरोप दिला.
त्या क्षणातही आपुलकीची ऊब होती.
'अंकुर व्हॅलीचे निसर्गरम्य वातावरण,
आपुलकीचे आदरातिथ्य,
सुग्रास भोजन आणि उत्तम व्यवस्था'
या सर्वांनी आनंद द्विगुणित केला.
हा मेळावा म्हणजे केवळ भेट नव्हती;
तो काळाशी केलेला संवाद होता.
मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे.
ती जुनी होत नाही; ती फक्त नव्याने उमलत राहते.
मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे.
ती जुनी होत नाही..
ती फक्त नव्याने उमलत राहते…
असे आनंद मेळावे पुन्हा पुन्हा घडत राहोत…
मैत्रीचा हा स्नेहसोहळा असाच दरवेळी फुलत राहो.
हा अनुभव, हा आनंद पुन्हा पुन्हा मिळत राहो
आणि लवकरच पुन्हा भेटण्याचा सुंदर योग यावा… हीच मनापासून इच्छा...!
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.