logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करा पालकमंत्री अतुल सावे! कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने घेतला आढावा नांदेड, दि. 18 एप्रिल :- जिल्ह्यात अलीकडे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक दक्षता घ्यावी, तसेच शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नांदेड शहरात महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवसांत घडलेल्या पाच खुनांच्या घटनांचा उल्लेख करत पालकमंत्री श्री. सावे यांनी ही बाब चिंताजनक असल्याचे नमूद केले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहर व जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर विशेष लक्ष ठेवावे, एमपीडीए अंतर्गत कारवाई वाढवावी, तसेच अचानक धाडी टाकून गुन्हेगारीला आळा घालावा, असेही त्यांनी सांगितले. अवैध वाळू उत्खनन, गुटखा, मटका व अंमली पदार्थांवर कठोर कारवाई करावी तसेच कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी स्थानिक गुप्तवार्ता वाढविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलीस विभागाच्या अडचणी शासन स्तरावर सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत, सीसीटीव्ही प्रकल्प, पदभरती, पोलीस वसाहत व पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्तावांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी उपाययोजना राबवून नागरिकांचा विश्वास दृढ करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी जिल्ह्यात मागील दीड वर्षातील गुन्हेगारीत झालेल्या घट व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. पुढील काळातही जिल्ह्यात शांतता राखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 20 ते 24 एप्रिल 2026 दरम्यान पालक व विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

on 18 April
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer Nanded, Maharashtra•
on 18 April
99ffd5c5-281b-46a3-9190-ebc3297319e9

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.
    1
    मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर :  शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार
डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे.
या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा   शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    1
    महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    14 hrs ago
  • Post by Mushtaq Shaikh
    1
    Post by Mushtaq Shaikh
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले शेतकरी सक्षम तर देश सक्षम! अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा! #SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress
    1
    शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! 
नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला 
शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले 
शेतकरी सक्षम तर देश सक्षम! 
अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा!
#SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    1
    आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.