logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अश्विनी टीचर्स क्लासेस, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.30) पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. हा उपक्रम रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओ ग्राफर असोसिएशनशी संलग्न होता. या समारंभात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम यांनी सांगितले की, आजची पिढी आत्मविश्वास असलेली आहे, परंतु केवळ पदव्या घेऊन बेकार राहिल्यास आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य निर्माण करून स्वतःला सक्षम करण्याचे, व्यवहार, वास्तव आणि शिक्षणाची सांगड घालण्याचे आवाहन केले. राहुल कदम यांनी, प्रचंड टक्केवारी मिळवून स्वतःला सिद्ध करण्याची ताकद निर्माण करा आणि एकतरी छंद जोपासण्याबरोबरच वाचनाची आवड निर्माण करा, कारण तुमचा छंद एक दिवस तुम्हाला मोठे करेल, असा विश्वास व्यक्त केला. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाची परंपरा सामाजिक बांधिलकी जपत टिकवून ठेवल्याबद्दल कौतुक केले. त्यांनी युवकांना उद्याचे भविष्य संबोधून दर्जेदार समाज घडवण्यासाठी शिक्षणासोबत व्यक्तिमत्व विकासावर भर देण्याचे आवाहन केले. अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी दहावी आणि बारावीमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, तसेच उच्च शिक्षण घेत असताना आकर्षणांच्या पलिकडे जाऊन स्वतःला घडवण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात अलिबाग तालुक्यातील शाळांमधून दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा, अश्विनी टीचर क्लासेसमधील बारावीच्या परीक्षेत विशेष यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि फोटोग्राफर्स असोसिएशनच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राहुल कदम, चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह रायगड फोटोग्राफर्स अँन्ड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, सहसचिव अमोल नाईक, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश म्हात्रे, कार्याध्यक्ष सुदेश माळी, सहकार्याध्यक्ष सुबोध घरत, सल्लागार सुरेश खडपे, जितू शिगवण, अश्विनी टिचर्स क्लासेसच्या संचालिका अश्विनी मेहता, आदी मान्यवर, गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार यांनी केले, तर विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य अमर मढवी, विजय पाटील, निलेश दुदम, विराज घरत, निलेश बुरांबे, जयेंद्र वाघमारे, सुमित मालोदे यांनी मेहनत घेतली.

1 hr ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
9d4bd1c3-8fb5-467a-b7a8-87ea256e457a

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कामठी शहरात स्वच्छता अभियानाचे दावे फोल ठरताना दिसत आहेत. आमच्या विशेष अहवालानुसार, बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे, अनधिकृत अतिक्रमणे वाढली आहेत आणि मोकाट कुत्र्यांचा व डुकरांचा उपद्रव वाढला आहे. २०० कोटी रुपयांचे बजेट उपलब्ध असूनही, शहरातील व्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. यामुळे नगर परिषदेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित जबाबदार व्यक्तींवर नगर परिषद कारवाई करणार का, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.
    1
    कामठी शहरात स्वच्छता अभियानाचे दावे फोल ठरताना दिसत आहेत. आमच्या विशेष अहवालानुसार, बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे, अनधिकृत अतिक्रमणे वाढली आहेत आणि मोकाट कुत्र्यांचा व डुकरांचा उपद्रव वाढला आहे. २०० कोटी रुपयांचे बजेट उपलब्ध असूनही, शहरातील व्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.

यामुळे नगर परिषदेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित जबाबदार व्यक्तींवर नगर परिषद कारवाई करणार का, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    1 day ago
  • उन्हाळ्यात रक्तातील साखर का वाढते यामागील खरे सत्य जाणून घेण्यासोबतच, डॉ. मेहर अब्बास प्रत्येक आरोग्य समस्येवर योग्य आणि सुरक्षित उपाय देत आहेत. आजच आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण निरोगी जीवनाची सुरुवात योग्य सल्ल्याने होते. डॉ. मेहर अब्बास हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे आजार आणि फुफ्फुसाच्या (दमा आणि टीबी) समस्यांवर समाधान प्रदान करतात. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    उन्हाळ्यात रक्तातील साखर का वाढते यामागील खरे सत्य जाणून घेण्यासोबतच, डॉ. मेहर अब्बास प्रत्येक आरोग्य समस्येवर योग्य आणि सुरक्षित उपाय देत आहेत. आजच आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण निरोगी जीवनाची सुरुवात योग्य सल्ल्याने होते.

डॉ. मेहर अब्बास हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे आजार आणि फुफ्फुसाच्या (दमा आणि टीबी) समस्यांवर समाधान प्रदान करतात. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    26 min ago
  • ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात 50 MLD अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि विविध विकास कामांना गती देण्यासाठी विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, क्षेत्रातील प्रमुख जनसमस्या, मूलभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. अश्रफ शानू पठाण यांनी मुंब्रा-कौसा येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक मागण्या प्रमुखतेने मांडल्या.
    1
    ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात 50 MLD अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि विविध विकास कामांना गती देण्यासाठी विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान, क्षेत्रातील प्रमुख जनसमस्या, मूलभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. अश्रफ शानू पठाण यांनी मुंब्रा-कौसा येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक मागण्या प्रमुखतेने मांडल्या.
    user_Times of reporting news
    Times of reporting news
    वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नांदेड येथे काँग्रेसने इंधन प्रश्नावर सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान 'राडा' देखील झाल्याचे वृत्त आहे.
    1
    नांदेड येथे काँग्रेसने इंधन प्रश्नावर सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान 'राडा' देखील झाल्याचे वृत्त आहे.
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    Video Creator वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सध्या 'कार्य त्यौहार' च्या नावाखाली सुरू असलेल्या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, यातून काही सकारात्मक बदल घडून येतील का, अशी विचारणा करण्यात आली आहे.
    1
    सध्या 'कार्य त्यौहार' च्या नावाखाली सुरू असलेल्या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, यातून काही सकारात्मक बदल घडून येतील का, अशी विचारणा करण्यात आली आहे.
    user_Satish Tiwari
    Satish Tiwari
    Artist वर्धा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मुंब्रा-कळव्याच्या आमदारांनी क्षेत्राच्या विकास, जनसुविधा आणि जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून जनतेला भावनिक आवाहन केले. त्यांनी नागरिकांना क्षेत्रातील विकासकामांना सहकार्य करण्याचे, सामाजिक सलोखा राखण्याचे आणि जनसमस्यांच्या निराकरणासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आमदारांनी जनतेला विश्वास दिला की, ते जनतेच्या हिताचे रक्षण आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहतील.
    1
    मुंब्रा-कळव्याच्या आमदारांनी क्षेत्राच्या विकास, जनसुविधा आणि जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून जनतेला भावनिक आवाहन केले. त्यांनी नागरिकांना क्षेत्रातील विकासकामांना सहकार्य करण्याचे, सामाजिक सलोखा राखण्याचे आणि जनसमस्यांच्या निराकरणासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आमदारांनी जनतेला विश्वास दिला की, ते जनतेच्या हिताचे रक्षण आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहतील.
    user_Times of reporting news
    Times of reporting news
    वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • चारबाग येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर छत कोसळल्याची घटना घडली, ज्यात दोन व्यक्ती गंभीरपणे अडकले. या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बचावकार्यात उशीर का झाला, याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत.
    1
    चारबाग येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर छत कोसळल्याची घटना घडली, ज्यात दोन व्यक्ती गंभीरपणे अडकले. या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बचावकार्यात उशीर का झाला, याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत.
    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.