भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील राधाकृष्ण रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी प्रशिक्षण वर्ग मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गात जिल्हा पदाधिकारी, महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, विविध मोर्चा व आघाडीचे अध्यक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार माधवी नाईक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आला. शनिवार, दि. ३० मे रोजी झालेल्या विविध सत्रांमध्ये केशव उपाध्ये यांनी ‘कार्यविस्तार’, मीनल भोसले यांनी ‘विचार परिवार’, समीर गुरव यांनी ‘सोशल मीडिया’, मकरंद देशपांडे यांनी ‘कार्यपद्धती’, भारत अहमदापुरे यांनी ‘देशापुढील आव्हाने आणि आमचा प्रयत्न’, रघुनाथ कुलकर्णी यांनी ‘वैचारिक अधिष्ठान’ तर पुनीत जोशी यांनी ‘कार्यकर्ता विकास’ या विषयांवर मार्गदर्शन केले. रविवार, दि. ३१ मे रोजी सकाळच्या सत्रात खासदार धनंजय महाडिक यांनी ‘मोदी सरकारचे गरीब कल्याणकारी उपक्रम’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण केले. पुढील सत्रात योगेश बाचल यांनी ‘बूथ व्यवस्थापन’ तर प्रमोद जठार यांनी ‘पक्षाचा इतिहास आणि विकास’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून राष्ट्रहित, संस्कार आणि विचारांवर आधारित एक मोठी चळवळ असल्याचे सांगितले. भगवंताचे अधिष्ठान, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ भाव असल्यास यश निश्चित मिळते आणि समाधान, आनंद आपोआप प्राप्त होते, असे ते म्हणाले. समाधान म्हणजे केवळ पद किंवा सत्तेत आनंद मानणे नसून जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करणे, समाजासाठी काम करणे आणि संघटनेने दिलेले कार्य सर्वोत्तम पद्धतीने पूर्ण करणे हीच समाधानाची खरी व्याख्या आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी प्रत्येक क्षणी समाजहित आणि राष्ट्रहित यालाच प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. मंत्री पाटील यांनी व्यक्तीपेक्षा संघटनेला मोठे मानत सामूहिक भावनेने कार्य करणे, संघटनेच्या शिस्तीचे पालन करणे, परस्पर समन्वय राखणे आणि एकमेकांवरील विश्वास यामुळेच पक्ष अधिक मजबूत होतो, यावर भर दिला. भारतीय जनता पक्षाची विचारधारा 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वावर आधारित असल्याने प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष आणि विचारांशी घट्ट बांधले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पद, प्रतिष्ठा किंवा वैयक्तिक स्वार्थापेक्षा पक्षाचा विचार आणि संघटनेचे हित मोठे मानले पाहिजे, यावर त्यांनी जोर दिला. तसेच, आजच्या राजकारणातील पक्षांतराच्या प्रवृत्तीपासून दूर राहून विचारांवर, नेतृत्वावर आणि संघटनेवर पूर्ण विश्वास ठेवून निष्ठेने कार्य करणे हीच प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख असली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. नाम. चंद्रकांतदादा पाटील यांनी संघटन, विचारनिष्ठा, समर्पण आणि भगवंतावरील श्रद्धा यांच्या बळावर समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचे आवाहन केले. यासोबतच, त्यांनी देशभर सुरू असलेल्या एसआयआर (SIR) प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आपल्या प्रभागात व बूथ स्तरावर सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. दोन दिवस चाललेल्या या निवासी प्रशिक्षण वर्गात विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण सत्रांमुळे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. समारोपप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी नाम. चंद्रकांतदादा पाटील, धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे, अमल महाडिक, शौमिका महाडिक, राहुल आवाडे, मकरंद देशपांडे, संजय बाबा घाटगे, समरजित घाटगे, पृथ्वीराज पाटील, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, राहुल चिकोडे, अंबरीश घाटगे, तानाजी पाटील, एन डी वाईंगडे, कुमार कांबळे, काकासाहेब सावडकर, सलीम महात, सानिका आवाडे, विजय भोजे, भूषण पाटील, प्रशांत शहापूरे, पी जी शिंदे, के एस चौगले, मारुती परीतकर, उदय धातूंडे, अनिल डाळ्या, माधुरी नकाते, मेघराणी जाधव, सुशिला पाटील, रेखा नांगरे पाटील, पुष्पा पाटील, गायत्री राऊत, विश्वजित पवार, प्रशांत बुगले आणि रवीश पाटील कौलवकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी विजय आगरवाल, दीपक शिरगावकर, सतीश पंडित, शहाजी भोसले, शिवाजी बुवा, भिकाजी जाधव, अमर साठे, विराज चिखलीकर, अनिल कामत यांनी विशेष परिश्रम घेतले.

- कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 'थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर अभियान' या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे.1
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर ऍडव्होकेट बंडू काशीद यांनी जोरदार टीका केली आहे. काशीद यांनी म्हटले आहे की, जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली, तेव्हा लक्ष्मण हाके यांनी शेतातील ढेकळात उपोषण करणार असल्याचे सांगितले आणि आमचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर, ऍडव्होकेट बंडू काशीद यांनी हाके यांना आव्हान दिले आहे की, त्यांनी एक दिवस ढेकळात उपोषण करून दाखवावे.1
- Post by होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन1
- सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीतील विविध राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेतलेला निर्णय पूर्णपणे मान्य असल्याचे म्हटले. सरनाईक यांनी नमूद केले की, नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ते सर्वजण रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्याकडे पाहत होते, परंतु महायुतीचा धर्म पाळण्यासाठी काही वेळा मागे-पुढे करावे लागते. याशिवाय, आगामी विधान परिषदेच्या सर्व जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेल्या जागांच्या मागणीवर बोलताना सरनाईक म्हणाले की, राजकारणात देवाणघेवाण आणि राजकीय समीकरणे बदलत असतात. महायुतीमध्ये आपल्या हक्काच्या जागा मागणे ही मोठी गोष्ट नाही. त्यांच्या आग्रही मागणीनुसार, मागील वेळेस लढवलेल्या पाच जागा कायम राहाव्यात आणि अतिरिक्त दोन जागा मिळाव्यात, अशी त्यांची इच्छा होती. जरी आता समीकरणे बदलली असली तरी, भविष्यात शिवसेनेच्या वाट्याला काही चांगल्या गोष्टी नक्कीच मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी, सरनाईक यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. स्वतःला मोठे नेते म्हणवून घेणाऱ्या लोकांनी संवेदनशील विषयांवर बोलताना तोंडाला कुलूप लावणे गरजेचे आहे, असे सरनाईक म्हणाले. प्रसाद लाड यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पक्षात कोणतीही नाराजी नसून, महायुतीचे ऐक्य टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. तसेच, जागावाटपावरून भविष्यात शिवसेनेला योग्य वाटा मिळेल, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.4
- गुजरातमध्ये एका रस्त्याच्या मधोमध एक होर्डिंग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.1
- भोर तालुक्यातील नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्रुटी आणि निकृष्ट कामकाजाबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार शंकर मांडेकर यांनी दि.31 रोजी आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी इमारतीतील विविध त्रुटी, अपूर्ण कामे तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारींची पाहणी केली. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून, आमदार मांडेकर यांनी आढळलेल्या सर्व त्रुटींची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत, यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.1
- विधीज्ञ तथा मराठा आंदोलक ॲड. योगेश केदार यांनी अंतरवली सराटी येथून सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी सरकारला मराठा समाजाचे हसे करणे तात्काळ थांबवण्याची मागणी केली. ॲड. केदार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना थेट आव्हान दिले असून, आचारसंहिता सुरू असताना नवीन धोरणात्मक निर्णय घेता येतो का, असा प्रश्न विचारला आहे. ॲड. केदार यांनी विखे पाटलांनी यावर स्पष्टीकरण द्यावे असे म्हटले. ॲड. केदार यांचे हे वक्तव्य जरांगे पाटील यांनी अभ्यासकांना अंतरवलीत येण्याचे केलेल्या आवाहनाला उत्तर म्हणून आले आहे.1
- इचलकरंजीतील बहुचर्चित आयपीएल सट्टा रॅकेट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे. अॅड. रियाज बाणदार आणि अॅड. सचिन माने यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला, ज्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या आयपीएल सट्टा प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मिळाल्याचे श्रेय अॅड. रियाज बाणदार आणि अॅड. सचिन माने यांच्या दमदार युक्तिवादाला दिले जात आहे.1