शौचालय तयार... पण फीत कापायला 'भाग्यविधाता' कोण? भोकरदनकरांचा संतप्त सवाल!" शौचालय तयार... पण फीत कापायला 'भाग्यविधाता' कोण? भोकरदनकरांचा संतप्त सवाल!" महिनोनमहिने सार्वजनिक शौचालय वापराविना; विकासापेक्षा श्रेयवादाला प्राधान्य दिले जात असल्याची नागरिकांत चर्चा. भोकरदन | प्रतिनिधी विश्वास धसाळ भोकरदन बसस्थानक परिसरात लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले सार्वजनिक शौचालय गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णतः तयार असूनही अद्याप नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे "शौचालयाचा शुभारंभ नेमका कोणाच्या हस्ते होणार?" हा प्रश्न आता शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्य नागरिकांना स्वच्छ व सुसज्ज सुविधा मिळावी, या उद्देशाने उभारण्यात आलेले हे शौचालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. विकासकाम पूर्ण झाल्यानंतर ते तातडीने जनतेच्या सेवेत द्यावे, अशी अपेक्षा असताना उद्घाटनाच्या राजकारणामुळे काम रखडले आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात अनेक विकासकामांच्या उद्घाटनावरून राजकीय श्रेयवाद पाहायला मिळतो. कोणाचा फोटो, कोणाचा फलक आणि कोणाच्या हस्ते फीत कापली जाणार, यालाच जास्त महत्त्व दिले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र या सर्वांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या सोयीचा मुद्दा मागे पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, "जनतेच्या पैशातून उभारलेली सुविधा जनतेसाठीच असते. मग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ती बंद का ठेवली जाते? लोकांच्या गरजा महत्त्वाच्या की राजकीय श्रेय?" याबाबत संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करून शौचालय तात्काळ नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा "विकास कामांचा वापर जनतेसाठी की फक्त उद्घाटनाच्या राजकारणासाठी?" हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #@

- भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे... Bharat 24Taas News1
- भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून1
- मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!1
- जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात 30 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर, कोठारी नगर आणि महेश नगर परिसराला पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.1
- जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand1
- जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले1
- एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- माटरगाव बेलुरा नदीवर असलेला पुल गेला वाहुन मुसळधार पावसामुळे माटरगाव–बेलुरा मार्ग बंद; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दूध व्यावसायिकांचे हाल1