logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाढत्या तापमानामुळे घाबरून न जाता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी; जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आवाहन लातूर, दि. २९ : सध्या वातावरणातील बदलांमुळे पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. मार्च महिन्यापासूनच राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चढलेला पाहायला मिळत आहे. आगामी काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. उष्णतेची लाट म्हणजे काय? हवामान खात्याच्या निकषानुसार, एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवस तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास त्या भागात 'उष्णतेची लाट' आली असे संबोधले जाते. उन्हाळ्याच्या काळात 'सन बर्न', 'हिट क्रॅम्प्स' (स्नायूंना गोळे येणे), 'हिट एक्झोर्शन' (प्रचंड थकवा) आणि 'हिट स्ट्रोक' (उष्माघात) यांसारखे आजार उद्भवू शकतात. उष्माघाताचा सर्वाधिक धोका कोणाला? उन्हात कष्टाची कामे करणारे मजूर व शेतकरी. वृद्ध व्यक्ती आणि लहान मुले. गरोदर महिला व स्थूल व्यक्ती. मधुमेह, हृदयविकार असलेले रुग्ण किंवा अपुरी झोप घेणारे लोक. कारखान्यात बॉयलरजवळ काम करणारे कामगार. उष्माघाताची लक्षणे किरकोळ लक्षणे: प्रचंड थकवा जाणवणे, ताप येणे, शरीरावर पुरळ उमटणे, चक्कर येणे किंवा हाता-पायांच्या स्नायूंना गोळे येणे. गंभीर लक्षणे: त्वचा गरम व कोरडी पडणे, तीव्र डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, नाडीचे ठोके वेगवान होणे, मानसिक बेचैनी किंवा बेशुद्धावस्था येणे. प्रतिबंधात्मक उपाय काय करावे? : पुरेसे पाणी प्या आणि प्रवासात नेहमी पाणी सोबत ठेवा. पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे सैल सुती कपडे वापरा. उन्हात जाताना छत्री, टोपी, चष्मा आणि पादत्राणांचा वापर करा. घर थंड ठेवण्यासाठी वाळ्याचे पडदे, पंखा किंवा कुलरची मदत घ्या. लिंबू सरबत किंवा ओआरएस (ORS) यांसारख्या पेयांचे सेवन करा. काय करू नये?: शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळा. लहान मुलांना पार्क केलेल्या बंद वाहनात ठेवू नका. मद्यपान, चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. अधिक प्रथिनांचे किंवा शिळे अन्न खाऊ नका. तातडीचे उपचार घ्या एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास झाल्यास, त्या रुग्णाला तातडीने सावलीत किंवा हवेशीर खोलीत हलवावे. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात किंवा थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास वेळ न घालवता जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे. आरोग्य विभागामार्फत सज्जता उष्णतेच्या लाटेचा इशारा लक्षात घेता, जिल्ह्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. १ मार्चपासूनच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय दवाखान्यांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये २ खाटा राखीव असून औषधसाठा, पंखे, कुलर आणि थंड पाण्याची सोय उपलब्ध आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी देऊन जनजागृती केली जात आहे, तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास घाबरून न जाता तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

22 hrs ago
user_बाळकृष्ण प्रकाश कदम
बाळकृष्ण प्रकाश कदम
Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
22 hrs ago
7c757883-a639-4069-ab36-9fbc2a4fd81d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    1
    *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    1
    अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. �
Hindustan Times
ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत.
येथे महिलांना:
🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा
💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी
📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा
👉 मुख्य उद्देश:
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे.
📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ
सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे:
ओळख (Identity) + विकास केंद्र
समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन
✔️ थोडक्यात
अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते
वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात
पण मुख्य हेतू एकच —
👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.
    1
    लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी.
निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. 
लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे
ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि
लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.
बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे
व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या
विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    23 min ago
  • साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    1
    साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • फ्रूट अक्कलकोट तालुक्यातील जेऊर फळांचे कीटक, रोग आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करताना दर्जाही टिकवून ठेवणाऱ्या फ्रूट कव्हर तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जेऊर येथील शेतकरी राजा चौगुले यांनी आपल्या केशर आंबा बागेत केला आहे. प्रत्येक आंब्याला कागदी फ्रूट कव्हर लावल्याने त्यांच्या १२०० झाडांच्या सेंद्रिय बागेची विशेष चर्चा होत आहे. राजा चौगुले आणि रुक्मिणी चौगुले या दाम्पत्याने ऊस शेतीऐवजी दोन एकर क्षेत्रावर घनदाट पद्धतीने केशर आंब्याची लागवड केली. कोकणातून रोपे आणून आधुनिक पद्धतीने उभारलेली ही बाग आता पूर्ण बहरात आली आहे. या बागेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे झाडावरील प्रत्येक फळाला दोन पदरी कागदी फ्रूट कव्हर लावण्यात आले आहे. त्यामुळे फळांवर डाग पडत नाहीत, नैसर्गिक कव्हरमुळे फळांवर डाग पडत नाहीत आणि फळांचा नैसर्गिक, उठावदार रंग विकसित होतो. फळे कव्हरमध्ये सुरक्षित असल्याने बाहेरील कीटकनाशकांची फवारणी कमी करावी लागते. त्यामुळे फळे विषमुक्त तयार होतात. घनदाट लागवडीमुळे उत्पादन थोडे कमी होते; मात्र वादळात कोणतेही नुकसान होत नाही.
    1
    फ्रूट 
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर फळांचे कीटक, रोग आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करताना दर्जाही टिकवून ठेवणाऱ्या फ्रूट कव्हर तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जेऊर येथील शेतकरी राजा चौगुले यांनी आपल्या केशर आंबा बागेत केला आहे. प्रत्येक आंब्याला कागदी फ्रूट कव्हर लावल्याने त्यांच्या १२०० झाडांच्या सेंद्रिय बागेची विशेष चर्चा होत आहे.
राजा चौगुले आणि रुक्मिणी चौगुले या दाम्पत्याने ऊस शेतीऐवजी दोन एकर क्षेत्रावर घनदाट पद्धतीने केशर आंब्याची लागवड केली. कोकणातून रोपे आणून आधुनिक पद्धतीने उभारलेली ही बाग आता पूर्ण बहरात आली आहे.
या बागेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे झाडावरील प्रत्येक फळाला दोन पदरी कागदी फ्रूट कव्हर लावण्यात आले आहे. त्यामुळे फळांवर डाग पडत नाहीत, नैसर्गिक कव्हरमुळे फळांवर डाग पडत नाहीत आणि फळांचा नैसर्गिक, उठावदार रंग विकसित होतो. फळे कव्हरमध्ये सुरक्षित असल्याने बाहेरील कीटकनाशकांची फवारणी कमी करावी लागते. त्यामुळे फळे विषमुक्त तयार होतात. घनदाट लागवडीमुळे उत्पादन थोडे कमी होते; मात्र वादळात कोणतेही नुकसान होत नाही.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
    1
    लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Latur, Maharashtra•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.