जे. एस. एम. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न जे. एस. एम. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न प्रतिनिधी अलिबाग बिनधास्त न्यूज मिडीया अलिबाग/रायगड: (दि १६) जे. एस. एम. व अॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा बुधवार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील हे उपस्थित होते. तर उपाध्यक्षा मा. डॉ. साक्षी पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर जे. एस. एम. कॉलेजच्या प्राचार्य मा. डॉ. सोनाली पाटील, अॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मा. डॉ. नीलम हजारे आदि मान्यवर उपस्थित होते. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने या कार्यक्रमास प्रारंभ झाला. अॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य अॅड. डॉ. नीलम हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी सर्व यशस्वी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात जे. एस. एम. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांनी पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा व अविस्मरणीय क्षण असून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा स्वत:च्या व समाजाच्या उत्कर्षासाठी विनियोग करावा असे आवाहन करत त्यांनी भावी आयुष्यात विशेष कर्तृत्व करून दाखवावे असे प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अॅड. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यासंबधीची उद्घोषणा केली. यावेळी जे. एस. एम. महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधून पदवी प्राप्त केलेल्या २०७ विद्यार्थ्याना तर विधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या ८० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील, उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, प्र. प्राचार्य अॅड. नीलम हजारे व विविध विषयांचे विभागप्रमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली . यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारण्याचा संस्मरणीय अनुभव प्राप्त झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमास महाविद्यालायातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पदवी प्रमाणपत्र वितरण समितीचे प्रमुख प्रा. डॉ. प्रेम आचार्य व प्राध्यापक सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास अनुपस्थित राहिलेल्या शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ च्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध असून संबंधित विद्यार्थ्यांनी दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत ती घेऊन जावीत असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

- शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती नागपूर: शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला. प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला1
- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1
- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.1
- मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri1
- "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Pitam Parjapati1
- नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा1