अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकाचे धाडसी अभियान; संग्रामपूर येथे पुरातून नऊ जणांचे प्राण वाचवण्यात यश अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर गावाजवळील बेंमडा नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती. नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा शोध व बचाव पथकाने अत्यंत धाडसी आणि शर्थीचे बचावकार्य राबवत नऊ जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळविले. या धाडसी कामगिरीबद्दल बचाव पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेची माहिती 30 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली. बेंमडा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे संग्रामपूर गावातील काही नागरिक अडकून पडल्याची माहिती मिळताच माननीय जिल्हाधिकारी श्री. आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार तातडीने जिल्हा शोध व बचाव पथक रवाना करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मध्यरात्री घटनास्थळी पोहोचून तात्काळ बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचाव पथकाने परिस्थितीचा आढावा घेतला असता पुराच्या पाण्याने वेढलेल्या घरांच्या छतावर काही नागरिक जीव मुठीत धरून मदतीची वाट पाहत असल्याचे दिसून आले. अंधार, वेगवान प्रवाह आणि पाण्याची वाढती पातळी यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले होते. मात्र कोणतीही भीती न बाळगता पथकाने धाडसाने बोटीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत त्यांना धीर दिला. सर्वप्रथम वयोवृद्ध आणि लहान मुलांना प्राधान्य देत एकामागून एक नागरिकांना सुरक्षितपणे बोटीत बसवून पुराच्या पाण्याबाहेर आणण्यात आले. रात्रीच्या अंधारामुळे बोट चालविण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. नदीचा वेगवान प्रवाह आणि मर्यादित दृश्यमानता यामुळे प्रत्येक क्षणी धोका निर्माण होत असतानाही बचाव पथकाने संयम, कौशल्य आणि धैर्याचे दर्शन घडवत यशस्वीरीत्या संपूर्ण मोहीम पूर्ण केली. सुरक्षित स्थळी आणलेल्या सर्व नागरिकांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले. या मोहिमेत हनुमंत उके (वय 34), रवी मेश्राम (38), सुभाष भोयर (40), सतीश मारभते (28), आशिष ओके (18), गौरव मारबले (22), ओम गिरी (18), अमोल भोयर (29) आणि अनिकेत केवट (25) या नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. बचावकार्य सुरू असताना घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. जिल्हा शोध व बचाव पथकाच्या कार्याला पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशस्वी मोहिमेत विशाल निमकर, कौस्तुभ वैद्य, पी. एस. गायकवाड, गणेश कायदेकर, सुरज ठाकूर, दीपक भोईटे, मनीष उताणे आणि गोकुळ मुंडे या जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत जीवाची पर्वा न करता नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी कार्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली असून अमरावती जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकाचे धाडसी अभियान; संग्रामपूर येथे पुरातून नऊ जणांचे प्राण वाचवण्यात यश अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर गावाजवळील बेंमडा नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती. नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा शोध व बचाव पथकाने अत्यंत धाडसी आणि शर्थीचे बचावकार्य राबवत नऊ जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळविले. या धाडसी कामगिरीबद्दल बचाव पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेची माहिती 30 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली. बेंमडा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे संग्रामपूर गावातील काही नागरिक अडकून पडल्याची माहिती मिळताच माननीय जिल्हाधिकारी श्री. आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार तातडीने जिल्हा शोध व बचाव पथक रवाना करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मध्यरात्री घटनास्थळी पोहोचून तात्काळ बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचाव पथकाने परिस्थितीचा आढावा घेतला असता पुराच्या पाण्याने वेढलेल्या घरांच्या छतावर काही नागरिक जीव मुठीत धरून मदतीची वाट पाहत असल्याचे दिसून आले. अंधार, वेगवान प्रवाह आणि पाण्याची वाढती पातळी यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले होते. मात्र कोणतीही भीती न बाळगता पथकाने धाडसाने बोटीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत त्यांना धीर दिला.
सर्वप्रथम वयोवृद्ध आणि लहान मुलांना प्राधान्य देत एकामागून एक नागरिकांना सुरक्षितपणे बोटीत बसवून पुराच्या पाण्याबाहेर आणण्यात आले. रात्रीच्या अंधारामुळे बोट चालविण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. नदीचा वेगवान प्रवाह आणि मर्यादित दृश्यमानता यामुळे प्रत्येक क्षणी धोका निर्माण होत असतानाही बचाव पथकाने संयम, कौशल्य आणि धैर्याचे दर्शन घडवत यशस्वीरीत्या संपूर्ण मोहीम पूर्ण केली. सुरक्षित स्थळी आणलेल्या सर्व नागरिकांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले. या मोहिमेत हनुमंत उके (वय 34), रवी मेश्राम (38), सुभाष भोयर (40), सतीश मारभते (28), आशिष ओके (18), गौरव मारबले (22), ओम गिरी (18), अमोल भोयर (29) आणि अनिकेत केवट (25) या नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. बचावकार्य सुरू असताना घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. जिल्हा शोध व बचाव पथकाच्या कार्याला पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशस्वी मोहिमेत विशाल निमकर, कौस्तुभ वैद्य, पी. एस. गायकवाड, गणेश कायदेकर, सुरज ठाकूर, दीपक भोईटे, मनीष उताणे आणि गोकुळ मुंडे या जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत जीवाची पर्वा न करता नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी कार्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली असून अमरावती जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. #Amravati #aashishyerekar1
- राजापेठ येथील पुलावर घडलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक,आमदार प्रविण पोटे यांनी केली पाहणी1
- दहेगाव (मुस्तफा)सह सात* *गावांतील ९ हजार नागरिकांचा* *आक्रोश; "प्राथमिक आरोग्य केंद्र* *मंजूर करा, अन्यथा* *संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन*!"1
- प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा अकोट तालुका प्रतिनिधी..... अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथील प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुले मुली विठु मावली च्या गजरात वारकरी च्या गणवेशात टाळ मृदुंगात रमली विशेषता पालकांनी या सोहळ्या करीता चिमुकल्यांना छान प्रकारे तयारी करून उत्साह व्यक्त केला. या सर्व मुलांचा उत्साह महिला व पुरुष पालक यांनी पण घेतला. सर्व सहभागी मुलांना 15 ऑगष्ट 26 रोजी विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे या प्रसंगी शिक्षक वृंद सौ पुजा म्हसाये कोमल धांडे धांडे मॅडम वैशाली धांडे अक्षय निबाळकर शिवनाथ डोंगरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमा करीता प्रज्ञेश इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या सौ स्वातीताई राऊत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावरा मंचनपुर देऊळगाव रंभापुर आसेगांव बाजार येथील पालकांनी सहकार्य केले.1
- इर्विन चौकात झाडाची फांदी अंगावर पडून ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी; नुकसानभरपाईची मागणी1
- पाटणबोरीत पावसाचा कहर! सर्व प्रमुख रस्ते बंद, पुलांवरून पाणी; वाहतूक पूर्णपणे ठप्प | Yavatmal Rain यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पैनगंगा आणि खुनी नदी दुथडी भरून वाहत असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि पूराच्या पाण्यातून प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. इंडिया न्यूज R7 वर पाहा यवतमाळ, अकोला, अमरावती आणि विदर्भातील ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्या. 📍 स्थान: पाटणबोरी, यवतमाळ, महाराष्ट्र 🎥 प्रतिनिधी: संदीप सुरपाम1