logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते कंकालेश्वर मंदिर येथील विकास कामांचे भुमिपुजन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते कंकालेश्वर मंदिर येथील विकास कामांचे भुमिपुजन बीड, दि. 31 (जिमाका) :- राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे भुमिपुजन करण्यात आले. तसेच त्यांनी भगवान कंकालेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन विधीवत पूजा-अर्चा केली आणि जिल्ह्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, माजी आमदार संजय दौड, विश्वनाथ माणुसमारे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मंदिर परिसरात आगमन होताच त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत मंदिराच्या विकासकामांची पाहणी केली व कोनशिलेचे अनावरण केले. कंकालेश्वर मंदिराच्या विधीवत पूजेप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी बीड जिल्ह्याच्या विकासाबाबत आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. या प्रसंगी परिसरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड येथील 12 व्या शतकात बांधण्यात आलेल्या कंकालेश्वर मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाची दुरूस्ती व संवर्धल याचे काम पुरातत्व खात्याच्या वतीने करण्यास सुरूवात झाली आहे. या कामासाठी स्व. अजितदादा पवार यांनी 9 कोटी 14 लाखांहून अधिकचा पुरातत्व विभागीय निधी आणि जिल्हा नियोजन निधी अंतर्गत 11 कोटी 21 लाखांहून अधिकचा निधी मंजूरी दिलेली आहे. या मंदिराचे क्षेत्रफळ 12 एकर आहे. येथील अतिक्रमणे हटविण्यासह दुरूस्ती व इतर सुविधांचा विकास करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. -*-*-*-*-

1 day ago
user_बालाजी जगतकर
बालाजी जगतकर
Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
1 day ago

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते कंकालेश्वर मंदिर येथील विकास कामांचे भुमिपुजन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते कंकालेश्वर मंदिर येथील विकास कामांचे भुमिपुजन बीड, दि. 31 (जिमाका) :- राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे भुमिपुजन करण्यात आले. तसेच त्यांनी भगवान कंकालेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन विधीवत पूजा-अर्चा केली आणि जिल्ह्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, माजी आमदार संजय दौड, विश्वनाथ माणुसमारे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मंदिर परिसरात आगमन होताच त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत मंदिराच्या विकासकामांची पाहणी केली व कोनशिलेचे अनावरण केले. कंकालेश्वर मंदिराच्या विधीवत पूजेप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी बीड जिल्ह्याच्या विकासाबाबत आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. या प्रसंगी परिसरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड येथील 12 व्या शतकात बांधण्यात आलेल्या कंकालेश्वर मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाची दुरूस्ती व संवर्धल याचे काम पुरातत्व खात्याच्या वतीने करण्यास सुरूवात झाली आहे. या कामासाठी स्व. अजितदादा पवार यांनी 9 कोटी 14 लाखांहून अधिकचा पुरातत्व विभागीय निधी आणि जिल्हा नियोजन निधी अंतर्गत 11 कोटी 21 लाखांहून अधिकचा निधी मंजूरी दिलेली आहे. या मंदिराचे क्षेत्रफळ 12 एकर आहे. येथील अतिक्रमणे हटविण्यासह दुरूस्ती व इतर सुविधांचा विकास करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. -*-*-*-*-

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.
    1
    हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर)
३१ जुलै :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर)
३१ जुलै :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे.
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०१ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०२ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०३ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०४ ऑगस्ट :
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण)
रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता.
दृश्यमानता कमी होण्याची शक्यता.
कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान.
असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान.
स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना.
विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे:
नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता.
सर्वसाधारण सूचना
जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात:
प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी.
प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे.
पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे.
धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे.
मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात:
मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे.
झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये.
विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत.
हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम
बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे.
भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे.
नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे.
सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे.
भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे.
वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे.
कृषी सल्ला
उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा.
खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी.
मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी.
भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे
    1
    ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे
    user_दत्ता. सखाराम. बळी
    दत्ता. सखाराम. बळी
    गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    28 min ago
  • मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    1
    मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार!
परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    7 min ago
  • महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले
    1
    महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही महापालिका आयुक्त व महापौर तलेन्च कलेक्टर यसा निवेदन देवून ही वस्तीतील कामे मात्र आश्वासनावर काल झालेल्या पावसामुळे अत्यत वाईट अ ईट अशी अवस्था येथील रहिवाशाची झाली असुन नागरिक त्रसा आहे. म्हणून यावेळेस नागरिकाना प्रश्न पडला आहे कि आमच्या समस्या कोळा सोडू शकतो
    2
    भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही 
भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही महापालिका आयुक्त व महापौर तलेन्च कलेक्टर यसा निवेदन देवून ही वस्तीतील कामे मात्र आश्वासनावर काल झालेल्या पावसामुळे अत्यत वाईट अ ईट अशी अवस्था येथील रहिवाशाची झाली असुन नागरिक त्रसा आहे. म्हणून यावेळेस नागरिकाना प्रश्न पडला आहे कि आमच्या समस्या कोळा सोडू शकतो
    user_Eshwar Panchal
    Eshwar Panchal
    Painter जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 day ago
  • उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोलीस चौकी अथवा पोलीस दूरक्षेत्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात उपळी येथील सौ. रूपाली कचरे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयाचा तसेच महाराष्ट्र पोलीस नियमावली, १९९९ मधील तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस चौकी अथवा दूरक्षेत्राची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, उपळी परिसरात गेल्या पाच वर्षांत ३१ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला असून, महिला, विद्यार्थिनी व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपळी येथे तात्काळ पोलीस चौकी सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तसेच परिसरात २४ तास पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत आणि पोलीस चौकी सुरू करण्यास झालेल्या विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनानंतर उपळी परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याबाबत शासन व गृह विभाग कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन

उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन
वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोलीस चौकी अथवा पोलीस दूरक्षेत्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात उपळी येथील सौ. रूपाली कचरे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयाचा तसेच महाराष्ट्र पोलीस नियमावली, १९९९ मधील तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस चौकी अथवा दूरक्षेत्राची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, उपळी परिसरात गेल्या पाच वर्षांत ३१ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला असून, महिला, विद्यार्थिनी व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपळी येथे तात्काळ पोलीस चौकी सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच परिसरात २४ तास पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत आणि पोलीस चौकी सुरू करण्यास झालेल्या विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनानंतर उपळी परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याबाबत शासन व गृह विभाग कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील धामणा धरणाच्या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून या वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाची उंची वाढवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
    1
    भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास!



भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास!
भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील धामणा धरणाच्या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून या वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाची उंची वाढवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.