logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्पाला गती; १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढील टप्पा पूर्ण करण्याचे निर्देश बीड | प्रतिनिधी मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या बहुप्रतिक्षित नगर–बीड–परळी या २५६ किमीच्या रेल्वे प्रकल्पाचा आढावा आज बीड येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. आगामी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत (१७ सप्टेंबर २०२६) प्रकल्पाचा पुढील टप्पा पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. ​आढावा बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, "हा प्रकल्प मराठवाड्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच जमीन अधिग्रहण व स्थानिक पातळीवरील अडथळे दूर करून कामाचा वेग वाढवावा." ​लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती ​या बैठकीस खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संदीप क्षिरसागर, विजयसिंह पंडीत, विक्रम काळे यांच्यासह पालक सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत उपस्थित होते. प्रशासकीय यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. ​बीड जिल्ह्याचा कायापालट होणार ​नगर–बीड–परळी मार्ग पूर्ण झाल्यानंतर बीड जिल्हा प्रथमच राज्याच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी थेट जोडला जाईल. यामुळे केवळ प्रवाशांची वाहतूक सुलभ होणार नाही, तर कृषी मालवाहतूक, उद्योग, व्यापार, पर्यटन आणि शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

20 hrs ago
user_लाईव्ह अशोका टाईम्स
लाईव्ह अशोका टाईम्स
केज, बीड, महाराष्ट्र•
20 hrs ago
42ea4945-b7c5-46c4-b119-c592f481fe78

नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्पाला गती; १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढील टप्पा पूर्ण करण्याचे निर्देश बीड | प्रतिनिधी मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या बहुप्रतिक्षित नगर–बीड–परळी या २५६ किमीच्या रेल्वे प्रकल्पाचा आढावा आज बीड येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. आगामी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत (१७ सप्टेंबर २०२६) प्रकल्पाचा पुढील टप्पा पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. ​आढावा बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, "हा प्रकल्प मराठवाड्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच जमीन अधिग्रहण व स्थानिक पातळीवरील अडथळे दूर करून कामाचा वेग वाढवावा." ​लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती ​या बैठकीस खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संदीप क्षिरसागर, विजयसिंह पंडीत, विक्रम काळे यांच्यासह पालक सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत उपस्थित होते. प्रशासकीय यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. ​बीड जिल्ह्याचा कायापालट होणार ​नगर–बीड–परळी मार्ग पूर्ण झाल्यानंतर बीड जिल्हा प्रथमच राज्याच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी थेट जोडला जाईल. यामुळे केवळ प्रवाशांची वाहतूक सुलभ होणार नाही, तर कृषी मालवाहतूक, उद्योग, व्यापार, पर्यटन आणि शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.
    1
    हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर)
३१ जुलै :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर)
३१ जुलै :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे.
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०१ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०२ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०३ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०४ ऑगस्ट :
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण)
रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता.
दृश्यमानता कमी होण्याची शक्यता.
कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान.
असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान.
स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना.
विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे:
नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता.
सर्वसाधारण सूचना
जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात:
प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी.
प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे.
पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे.
धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे.
मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात:
मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे.
झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये.
विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत.
हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम
बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे.
भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे.
नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे.
सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे.
भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे.
वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे.
कृषी सल्ला
उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा.
खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी.
मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी.
भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *बद्रीनाथ में चोरी करने वाले के पास मिला सोना-चांदी:* आज खत्म हो रही रिमांड; PA ने घर में छिपाई थी चांदी की मूर्ति-विदेशी करेंसी बद्रीनाथ धाम के बहुचर्चित चढ़ावा चोरी मामले में मुख्य आरोपी प्रमोद नौटियाल की 4 दिनों की पुलिस कस्टडी रिमांड आज (31 जुलाई 2026) समाप्त हो रही है। चमोली पुलिस की विशेष जांच टीम (SIT) ने रिमांड के दौरान आरोपी के बद्रीनाथ और देहरादून स्थित ठिकानों पर ताबड़तोड़ छापेमारी कर भारी मात्रा में चोरी का सामान और संपत्तियों के दस्तावेज बरामद किए हैं।छापेमारी में बरामद हुआ 'खजाना'बद्री-केदार मंदिर समिति (BKTC) के अध्यक्ष के पूर्व निजी सहायक (PA) प्रमोद नौटियाल के पास से मिली सामग्रियां इस प्रकार हैं:मूर्तियां और धार्मिक वस्तुएं: बद्रीनाथ स्थित नीलकंठ वीवीआईपी गेस्ट हाउस के सरकारी आवास से भगवान नारायण की एक चांदी की मूर्ति, चांदी का नाग और मंदिर का पवित्र शालिग्राम पत्थर बरामद हुआ है।विदेशी और भारतीय करेंसी: तलाशी में 500-500 रुपये के नोटों की गड्डियों के साथ 150 नोट नेपाली करेंसी (विदेशी मुद्रा) और चांदी के सिक्के मिले हैं। ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा
    1
    *बद्रीनाथ में चोरी करने वाले के पास मिला सोना-चांदी:* आज खत्म हो रही रिमांड; PA ने घर में छिपाई थी चांदी की मूर्ति-विदेशी करेंसी बद्रीनाथ धाम के बहुचर्चित चढ़ावा चोरी मामले में मुख्य आरोपी प्रमोद नौटियाल की 4 दिनों की पुलिस कस्टडी रिमांड आज (31 जुलाई 2026) समाप्त हो रही है। चमोली पुलिस की विशेष जांच टीम (SIT) ने रिमांड के दौरान आरोपी के बद्रीनाथ और देहरादून स्थित ठिकानों पर ताबड़तोड़ छापेमारी कर भारी मात्रा में चोरी का सामान और संपत्तियों के दस्तावेज बरामद किए हैं।छापेमारी में बरामद हुआ 'खजाना'बद्री-केदार मंदिर समिति (BKTC) के अध्यक्ष के पूर्व निजी सहायक (PA) प्रमोद नौटियाल के पास से मिली सामग्रियां इस प्रकार हैं:मूर्तियां और धार्मिक वस्तुएं: बद्रीनाथ स्थित नीलकंठ वीवीआईपी गेस्ट हाउस के सरकारी आवास से भगवान नारायण की एक चांदी की मूर्ति, चांदी का नाग और मंदिर का पवित्र शालिग्राम पत्थर बरामद हुआ है।विदेशी और भारतीय करेंसी: तलाशी में 500-500 रुपये के नोटों की गड्डियों के साथ 150 नोट नेपाली करेंसी (विदेशी मुद्रा) और चांदी के सिक्के मिले हैं।
ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा
    user_आशीष मिश्रा
    आशीष मिश्रा
    Local News Reporter Beed, Maharashtra•
    17 hrs ago
  • उपसंचालकांचा आदेश असतानाही शिक्षकांची नियुक्ती नाही? सामाजिक संघटनांचे निवेदन व मागणी नेकनूर येथील डी.एड महाविद्यालय येथे शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याचे निवेदन सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आले
    1
    उपसंचालकांचा आदेश असतानाही शिक्षकांची नियुक्ती नाही? सामाजिक संघटनांचे निवेदन व मागणी
नेकनूर येथील डी.एड महाविद्यालय येथे शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याचे निवेदन सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आले
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    2
    भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • अमरापुर येथील सुवर्ण बिंदू अर्बन निधी लिमिटेड पतसंस्था बंद खाते दारांना घातला कोटीचा गंडा पतसंस्था बंद करून संचालक फरार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल
    1
    अमरापुर येथील सुवर्ण बिंदू अर्बन निधी लिमिटेड पतसंस्था बंद 
खाते दारांना घातला कोटीचा गंडा पतसंस्था बंद करून  संचालक फरार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल
    user_Devidas Devadhe
    Devidas Devadhe
    पाथर्डी, अहमदनगर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोलीस चौकी अथवा पोलीस दूरक्षेत्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात उपळी येथील सौ. रूपाली कचरे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयाचा तसेच महाराष्ट्र पोलीस नियमावली, १९९९ मधील तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस चौकी अथवा दूरक्षेत्राची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, उपळी परिसरात गेल्या पाच वर्षांत ३१ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला असून, महिला, विद्यार्थिनी व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपळी येथे तात्काळ पोलीस चौकी सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तसेच परिसरात २४ तास पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत आणि पोलीस चौकी सुरू करण्यास झालेल्या विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनानंतर उपळी परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याबाबत शासन व गृह विभाग कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन

उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन
वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोलीस चौकी अथवा पोलीस दूरक्षेत्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात उपळी येथील सौ. रूपाली कचरे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयाचा तसेच महाराष्ट्र पोलीस नियमावली, १९९९ मधील तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस चौकी अथवा दूरक्षेत्राची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, उपळी परिसरात गेल्या पाच वर्षांत ३१ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला असून, महिला, विद्यार्थिनी व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपळी येथे तात्काळ पोलीस चौकी सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच परिसरात २४ तास पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत आणि पोलीस चौकी सुरू करण्यास झालेल्या विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनानंतर उपळी परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याबाबत शासन व गृह विभाग कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
    1
    चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती.
चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026.
लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. 
या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे.
शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.