logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धरणगावात क्रूझरचे चाक निखळल्याने भीषण अपघात; हळदीचा रंग उतरण्यापूर्वीच नववधूसह तिघे ठार २९ एप्रिल २०२६ । विवाह सोहळा आटोपून माहेरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड गावानजीक महामार्गावर आज बुधवारी सकाळी धावत्या क्रूझर गाडीचे चाक निखळल्याने झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत पूजा रवी वागडकर (२२), दत्तू तुळशीराम भागवत (४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रेम भारत वाकडकर (२४), नितेश सुरेश काठोडे (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोडकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७) आणि अंश नितेश काठोडे (१४) असं गंभीर जखमी झालेल्यांची नाव आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडालीमिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वापी येथे पूजा वागडकर या तरुणीचा विवाह सोहळा पार पडला होता. लग्नानंतर पूजा प्रथमच आपल्या सासरच्या मंडळींसह आणि नातेवाईकांसह माहेरी अकोल्याकडे क्रूझर गाडीने (एमएच ३० एझेड ४७१०) परतत होती.मात्र आज बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास धरणगावातील वराड गावाजवळ गाडी वेगात असताना अचानक गाडीचे एक चाक निखळले. यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, गाडीचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात नववधू पूजासह तिघांचा मृत्यू झाला. तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या गाडीतून जखमींना बाहेर काढत तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

16 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
16 hrs ago
a260f2af-98f4-476c-84a6-0304b2079849

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Vikash Thakare
    1
    Post by Vikash Thakare
    user_Vikash Thakare
    Vikash Thakare
    पारोळा, जळगाव, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • 😯😯😯😯
    1
    😯😯😯😯
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    1
    SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • हनुमान मंदिर पाठी मागे कचरा आहे एकड़ कोनी ही लक्ष्य देत नाही तसे मुतारी वास हि येतो की आजरी लक्ष्य णे आहे
    2
    हनुमान मंदिर पाठी मागे कचरा आहे एकड़ कोनी ही लक्ष्य देत नाही तसे 
मुतारी वास हि येतो की आजरी लक्ष्य णे आहे
    user_Ghanshyam Rajendra chavan
    Ghanshyam Rajendra chavan
    सिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .
    1
    खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर 
खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट  होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली.
घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .
    user_अरबाज शेख. सावरगावकर
    अरबाज शेख. सावरगावकर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    7 hrs ago
  • Post by Gautam Hiwrale
    1
    Post by Gautam Hiwrale
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जामनेर
    1
    जामनेर
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.