logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राज्य पंच शिबिरातून घडणार खो-खोच्या नव्या युगाची पायाभरणी! २२-२३ ऑगस्टला कराडमध्ये राज्य पंच शिबिर राज्य पंच शिबिरातून घडणार खो-खोच्या नव्या युगाची पायाभरणी! २२-२३ ऑगस्टला कराडमध्ये राज्य पंच शिबिर उपस्थित राहणाऱ्या पंचांनाच राज्य स्पर्धांसाठी मिळणार नियुक्ती • महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे आवाहन मुंबई, ता. ३१ : महाराष्ट्रातील खो-खोचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि राज्यातील पंचगिरी अधिक सक्षम, शिस्तबद्ध व आधुनिक करण्याच्या दिशेने महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने पाऊल उचलले आहे. २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी कराड येथे होणारे राज्य खो-खो पंच शिबीर हे केवळ प्रशिक्षण शिबीर नसून, आगामी राज्य स्पर्धांमध्ये पंच म्हणून संधी मिळविण्याचे प्रवेशद्वार ठरणार आहे. विशेष म्हणजे, या शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहणाऱ्या पंचांनाच आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धांसाठी नियुक्ती दिली जाणार असल्याने राज्यभरातील पंचांमध्ये या शिबिराबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पंचगिरीत गुणवत्ता आणि शिस्तीवर भर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी ही माहिती देताना सांगितले की, राज्यातील पंचांना नियमांतील अद्ययावत बदल, निर्णयक्षमतेतील अचूकता आणि स्पर्धांतील व्यावसायिकता यांचा अनुभव देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. द ॲमेच्युर खो-खो असोसिएशन, सांगली आणि रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य आणि राष्ट्रीय पात्र पंचांना सुवर्णसंधी या शिबिरासाठी सर्व जिल्हा खो-खो संघटनांअंतर्गत कार्यरत असलेले तसेच राज्य किंवा राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व पंच पात्र असणार आहेत. पंचगिरीची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आणि राज्यभर एकसमान निर्णयप्रक्रिया विकसित करण्याच्या उद्देशाने या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पात्र पंचांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी अनिवार्य; मुदत १५ ऑगस्टपर्यंत शिबिरात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून, नोंदणी केलेल्या पंचांनाच प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. शिबिराचे वेळापत्रक • स्थळ : रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड • दिनांक : २२ व २३ ऑगस्ट २०२६ • उपस्थितीची वेळ : २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७.०० वाजता संपर्कासाठी शिबिराबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक पंचांनी डॉ. प्रशांत इनामदार (९७६२८९७३७३ / ७७०९१७३७६७) किंवा प्रा. सचिन चव्हाण (९९२३२१५००७) यांच्याशी संपर्क साधावा, असे असोसिएशनतर्फे कळविण्यात आले आहे.

8 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
8 hrs ago
e1d7fffe-4361-4a2a-ac81-e6ed3563b09a

More news from Jalna and nearby areas
  • ⚡ Bharat 24taas News च्या बातमीची ऊर्जा राज्यमंत्र्यांनी घेतली दखल..! कमलकीशोर जोगदंडे भोकरदन | प्रतिनिधी भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढून दुरुस्ती करणारे महावितरणचे लाईनमन दिपक देवरे यांचा व्हिडिओ Bharat 24taas News चे Digital Media news Editor कमलकिशोर जोगदंडे यांनी सर्वप्रथम प्रसिद्ध केला होता. या वृत्ताची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी स्वतः लाईनमन दिपक देवरे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच भर पावसात काम करताना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेतली गेल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. Bharat 24taas News ने सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या या बातमीमुळे या घटनेला राज्यस्तरावरही विशेष महत्त्व प्राप्त झाले. Bharat 24taas News
    1
    ⚡ Bharat 24taas News च्या बातमीची ऊर्जा राज्यमंत्र्यांनी घेतली दखल..!
कमलकीशोर जोगदंडे 
भोकरदन | प्रतिनिधी
भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढून दुरुस्ती करणारे महावितरणचे लाईनमन दिपक देवरे यांचा व्हिडिओ Bharat 24taas News चे Digital Media news Editor कमलकिशोर जोगदंडे यांनी  सर्वप्रथम प्रसिद्ध केला होता.
या वृत्ताची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी स्वतः लाईनमन दिपक देवरे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच भर पावसात काम करताना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेतली गेल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. Bharat 24taas News ने सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या या बातमीमुळे या घटनेला राज्यस्तरावरही विशेष महत्त्व प्राप्त झाले.
Bharat 24taas News
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    6 hrs ago
  • Muslim colony Khadka ward kramank 3
    1
    Muslim colony Khadka ward kramank 3
    user_Juber Khan Karim Khan
    Juber Khan Karim Khan
    Bhusawal, Jalgaon•
    9 hrs ago
  • लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत.... धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस! धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.
    1
    लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत....
धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस!
धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ek hi barish mein new Eid ka gharon ke pass Tak gussa Pani yah ek Hi din ki barish mein Khadka Gram Panchayat ke new Eid ka colony ke HAL
    1
    ek hi barish mein new Eid ka gharon ke pass Tak gussa Pani
yah ek Hi din ki barish mein Khadka Gram Panchayat ke new Eid ka colony ke HAL
    user_Sheikh Rauf Sheikh Yusuf
    Sheikh Rauf Sheikh Yusuf
    भुसावळ, जळगाव, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Accident First Aid: भूलकर भी घायल को पानी न पिलाएं, जानें सही तरीका
    1
    Accident First Aid: भूलकर भी घायल को पानी न पिलाएं, जानें सही तरीका
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    News Anchor Jalgaon, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.