मॉलिक्युलर बायोलॉजीतील साधने व तंत्रे' विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा -विद्यापीठ पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागाचे आयोजन 'मॉलिक्युलर बायोलॉजीतील साधने व तंत्रे' विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा -विद्यापीठ पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागाचे आयोजन नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात 'मॉलिक्युलर बायोलॉजीतील साधने व तंत्रे' या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा २३ व २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यशाळेत पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी तसेच संशोधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संशोधन क्षेत्रात महत्त्वाच्या ठरणाऱ्या मॉलिक्युलर बायोलॉजीतील विविध साधने व तंत्रांची सखोल माहिती देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.कार्यशाळेची सुरुवात प्राणीशास्त्र विभाग प्रमुख तथा कार्यक्रम संयोजक डॉ. (सौ.) व्ही. टी. धुर्वे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले रुसा समन्वयक डॉ. रुपेश बडेरे यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी विविध वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी तंत्रांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना व संशोधकांना नवनवीन तंत्रज्ञानाबाबत सतत जिज्ञासू राहण्याचे आवाहन केले. या दोन दिवसीय कार्यशाळेत हायमीडिया लॅबोरेटरीज येथील अनुभवी प्रात्यक्षिककार डॉ. सुनील कोकणे व डॉ. संजीव कुमार सिंह यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी रँडम ॲम्पिफिकेशन ऑफ पाॅलिमोर्फिक डीएनए (आरएडीपी) आणि रिस्ट्रिक्शन फ्राॅगमेंट लेंथ पोलिमरायझेशन (आरएफएलपी) यासारख्या महत्त्वाच्या तंत्रांबद्दल सविस्तर माहिती देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली. तसेच प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. उर्मिला जीवनतारे आणि डॉ. आशिककुमार नागवंशी यांनी सिकलसेल अॅनिमिया चाचणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले, तर कु. धारिता जोशी आणि कु. पल्लवी मोहुरले यांनी अपोप्टोसिस चाचणीचे प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यशाळेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग व प्रात्यक्षिकांद्वारे मौल्यवान व्यावहारिक अनुभव मिळाला. डॉ. कोकणे यांनी प्रत्येक तंत्राच्या सैद्धांतिक बाबींचे स्पष्टीकरण दिल्यानंतर त्याचे टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रयोग प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता आला. कार्यशाळेचा एक भाग म्हणून सहभागी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील रुसा केंद्राला भेट देण्याची संधी मिळाली. येथे अत्याधुनिक प्रयोगशाळा उपकरणे आणि संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले. तज्ज्ञांनी या उपकरणांचे कार्य, उपयोग आणि आधुनिक संशोधनातील त्यांचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आभार डॉ. आशिककुमार नागवंशी यांनी मानले.

- मीना ढवळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर सादर केलेली एकांकिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केली एकांकिका. नागपुर: आज 10 मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने मीना ढवळे यांनी केलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केलेली एकांकिका.1
- कुही-मौजा चिखली गोन्हा गावासाठी सुमारे 42 लक्ष रुपये नवीन स्मशान भूमी बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. आनंदराव राऊत साहेब यांना भेटून त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आकाश भोयर यांनी आभार मानले. स्मशान भूमीच्या बांधकामासाठी आदरणीय राऊत साहेब यांनि मोलाचे सहकार्य केले व त्या संदर्भात VIDC कडे पाठपुरावा केला.1
- देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया। #indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- वर्ध्याच्या रामनगरात महिलेचे मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद हिंगणघाटः वर्धा वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गिरीपेठ परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अत्यंत चलाखीने पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून परिसरात आले होते. काही अंतरावर दुचाकी थांबवून मागे बसलेला चोरटा खाली उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. पाहता क्षणी त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तिथेच उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघांनीही धूम ठोकली. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात बाईकस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.1
- देवळी (जि. वर्धा) : परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याच्या कारणावरून एका पत्रकारावर व त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देवळी येथे घडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्रकार शंकर अंबादास केवदे (रा. देवळी, जि. वर्धा) यांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीबाबत बातमी प्रसारित केली होती. तसेच या संदर्भात संबंधित पोलिसांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. सदर बाबीची माहिती संबंधित व्यक्तींना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शंकर केवदे यांना घरातून बोलावून घेतले व त्यांनीच ती रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली. त्यानंतर “तू आमच्या विरोधात तक्रार का करतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर एकत्रितपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून घटनेदरम्यान आरोपींकडे शस्त्र असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे : रामदास डायरे विशाल पारिसे (देवळी)श्रावण डाहे (रा. निंबोली) सदर सर्व व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून परिसरात त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ भारतीय दंड संहिता कलम 115 व 352 अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे समजते. मात्र घटनेचे स्वरूप गंभीर असताना अधिक कठोर व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकार शंकर केवदे यांच्या पत्नीचा मेडिकल रिपोर्ट (MLC) देण्यात न आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. — शंकर अंबादास केवदे पत्रकार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन रा. देवळी, जि. वर्धा मोबाईल : 70584167432
- 8मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटना साकोली च्या वतीने जागतिक महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त साकोली पोलिस स्टेशन हाल येथे कार्यक्रम पार पडले त्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.इद्रायणी ताई कापगते महिला समुपदेशीका व सामाजिक कार्यकर्त्या प्रमुख पाहुणे= मा.ॲडव्होकेट बघेले मॅडम फौजदारी न्यायालय साकोली मा माहेश्वरी ताई नेवारे माजी जि .प. सदस्या एकोडी प्रभाग मा.इनवाते मॅडम पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली बोरकर सर पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन साकोली स्वाती शहारे मॅडम तालुका समुह संघटक उपजिल्हा रुग्णालयात साकोली चौधरी मॅडम उपजिल्हा रुग्णालय कनिष्ठ अभियंता साकोली पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्नी. देवराम चांदेवार व उपाध्यक्ष सौ स्मिता खेडीकर हे होते कार्यक्रमाचे संचालन सौ.जयशिला बारसागडे पोलिस पाटील वटेश्वर स्वागत गीत सौ तिलोत्तमा कठाने ,सौ सुनंदा फंदे सौ वंदना मानापुरे ,सौ जयश्री रामटेके पोलिस पाटील प्रास्ताविक सौ दिक्षा उके पो. पाटील परसटोला आभार सौ ममता डडेमल पोलिस पाटील गडकुंभली कार्यक्रमाची सांगता चहा नाश्ता व राष्ट्रगीताने झाली4
- विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यातील शासकीय नोकर भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शुल्क कमी करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. शासकीय नोकर भरती प्रक्रियेत वाढलेल्या शुल्काच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क किमान ५० टक्के कमी करण्याची गरज व्यक्त केली. तसेच समाजातील सर्व घटकांतील गरीब विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रवेशासाठी समान संधी मिळावी यासाठी शुल्क सवलत आणि इतर आर्थिक सहाय्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. परीक्षा केंद्रांपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ३०० ते ३५० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने बस व रेल्वे प्रवासात सवलत देण्याचा विचार करावा, अशी मागणीही आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासाठी ‘एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ उपक्रम राबवण्याची सूचना करत CSR निधीचा वापर गरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी करावा, असे त्यांनी सांगितले. राज्यातील सव्वा दोन लाख रिक्त पदांची भरती प्रक्रिया लांबणीवर पडणे आणि किचकट प्रक्रिया याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षांचे पाच वर्षांचे पूर्वनियोजित वेळापत्रक तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली असून यावर मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इतर राज्ये व केंद्र सरकारच्या परीक्षा प्रक्रियेचा अभ्यास करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.1