logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कविठा ग्रामपंचायतीत वादाचे हिंसक रूप.... जबरी चोरी व मारहाणीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल,परिसरात खळबळ..... कविठा ग्रामपंचायतीत वादाचे हिंसक रूप.... जबरी चोरी व मारहाणीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल,परिसरात खळबळ..... अचलपूर : तालुक्यातील कविठा ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार निवारणासाठी गेलेल्या महिलांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ, मारहाण, धक्काबुक्की आणि सोन्याचे दागिने हिसकावल्याच्या आरोपांमुळे वातावरण चांगलेच तापले असून परतवाडा पोलिसांनी या प्रकरणात जबरी चोरी, मारहाण व इतर गंभीर कलमांखाली दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या तक्रार निवारणाच्या वेळी झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. २८ जुलै २०२६ रोजी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली, धारदार वस्तूने जखमी केले तसेच गळ्यातील अंदाजे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने तोडून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर दुसऱ्या बाजूनेही प्रतितक्रार दाखल करण्यात आली. त्यामध्ये देखील मारहाण, दुखापत, सोन्याची पोत आणि मोबाईल हिसकावल्याचे आरोप करण्यात आले आहेत. दोन्ही पक्षांच्या तक्रारींवरून परतवाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. ग्रामपंचायत कार्यालय हे नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र मानले जाते. मात्र, त्याच ठिकाणी वाद हिंसक स्वरूप धारण करून जबरी चोरीसारखे गंभीर आरोप पुढे आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील सत्य तपासातून समोर येणार असले तरी सार्वजनिक कार्यालयातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

5 hrs ago
user_Pravin Zolekar Jounarlist...
Pravin Zolekar Jounarlist...
Local News Reporter अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. #Amravati #aashishyerekar
    1
    जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
#Amravati #aashishyerekar
    user_Purn Borse
    Purn Borse
    TV News Anchor अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • राजापेठ येथील पुलावर घडलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक,आमदार प्रविण पोटे यांनी केली पाहणी
    1
    राजापेठ येथील पुलावर घडलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक,आमदार प्रविण पोटे यांनी केली पाहणी
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • दहेगाव (मुस्तफा)सह सात* *गावांतील ९ हजार नागरिकांचा* *आक्रोश; "प्राथमिक आरोग्य केंद्र* *मंजूर करा, अन्यथा* *संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन*!"
    1
    दहेगाव (मुस्तफा)सह सात* *गावांतील ९ हजार नागरिकांचा* *आक्रोश; "प्राथमिक आरोग्य केंद्र* *मंजूर करा, अन्यथा* *संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन*!"
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा अकोट तालुका प्रतिनिधी..... अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथील प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुले मुली विठु मावली च्या गजरात वारकरी च्या गणवेशात टाळ मृदुंगात रमली विशेषता पालकांनी या सोहळ्या करीता चिमुकल्यांना छान प्रकारे तयारी करून उत्साह व्यक्त केला. या सर्व मुलांचा उत्साह महिला व पुरुष पालक यांनी पण घेतला. सर्व सहभागी मुलांना 15 ऑगष्ट 26 रोजी विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे या प्रसंगी शिक्षक वृंद सौ पुजा म्हसाये कोमल धांडे धांडे मॅडम वैशाली धांडे अक्षय निबाळकर शिवनाथ डोंगरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमा करीता प्रज्ञेश इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या सौ स्वातीताई राऊत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावरा मंचनपुर देऊळगाव रंभापुर आसेगांव बाजार येथील पालकांनी सहकार्य केले.
    1
    प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा 
प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा 
अकोट तालुका प्रतिनिधी.....
अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथील प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुले मुली विठु मावली च्या गजरात वारकरी च्या गणवेशात टाळ मृदुंगात रमली विशेषता पालकांनी या सोहळ्या करीता चिमुकल्यांना छान प्रकारे तयारी करून उत्साह व्यक्त केला. या सर्व मुलांचा उत्साह महिला व पुरुष पालक यांनी पण घेतला. सर्व सहभागी मुलांना 15 ऑगष्ट 26 रोजी विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे या प्रसंगी शिक्षक वृंद सौ पुजा म्हसाये कोमल धांडे धांडे मॅडम वैशाली धांडे अक्षय निबाळकर शिवनाथ डोंगरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमा करीता प्रज्ञेश इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या सौ स्वातीताई राऊत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावरा मंचनपुर देऊळगाव रंभापुर आसेगांव बाजार येथील पालकांनी सहकार्य केले.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • इर्विन चौकात झाडाची फांदी अंगावर पडून ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी; नुकसानभरपाईची मागणी
    1
    इर्विन चौकात झाडाची फांदी अंगावर पडून ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी; नुकसानभरपाईची मागणी
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • पाटणबोरीत पावसाचा कहर! सर्व प्रमुख रस्ते बंद, पुलांवरून पाणी; वाहतूक पूर्णपणे ठप्प | Yavatmal Rain यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पैनगंगा आणि खुनी नदी दुथडी भरून वाहत असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि पूराच्या पाण्यातून प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. इंडिया न्यूज R7 वर पाहा यवतमाळ, अकोला, अमरावती आणि विदर्भातील ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्या. 📍 स्थान: पाटणबोरी, यवतमाळ, महाराष्ट्र 🎥 प्रतिनिधी: संदीप सुरपाम
    1
    पाटणबोरीत पावसाचा कहर! सर्व प्रमुख रस्ते बंद, पुलांवरून पाणी; वाहतूक पूर्णपणे ठप्प | Yavatmal Rain
यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पैनगंगा आणि खुनी नदी दुथडी भरून वाहत असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि पूराच्या पाण्यातून प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे.
इंडिया न्यूज R7 वर पाहा यवतमाळ, अकोला, अमरावती आणि विदर्भातील ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्या.
📍 स्थान: पाटणबोरी, यवतमाळ, महाराष्ट्र
🎥 प्रतिनिधी: संदीप सुरपाम
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.