खताच्या टंचाइला पर्याय म्हणून कृषी अवषेशाचा वापर शेतकऱ्यांनी करावा: रवींद्र मनोहरे *भव्य कृषी मेळावा संपन्नः* खताच्या टंचाइला पर्याय म्हणून कृषी अवषेशाचा वापर शेतकऱ्यांनी करावा: रवींद्र मनोहरे नागपूर : सिरकॉट, अमरावती रोड, नागपूर येथे 27 मार्च रोजी "स्पेशल प्रोजेक्ट ऑन कॉटन" अंतर्गत भव्य किसान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास कृषी क्षेत्रातील विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अरविंद वाघमारे, डायरेक्टर (DOCD), नागपूर व कृषी मंत्रालय, यांची उपस्थिती होती. याशिवाय रवींद्र मनोहरे (DSAO), नागपूर, डॉ.के.पांडीयन (वरिष्ठ शास्त्रज्ञ, GTC, CIRCOT, नागपूर), डॉ. मुख्तार शेख (वरिष्ठ शास्त्रज्ञ,, GTC, CIRCOT, नागपूर), डॉ. समीर वड्याळकर (अंकुर सीड्स, नागपूर), गोविंद वैराळे (प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, CITI CDRA, महाराष्ट्र) व संजय सत्यकार (डायरेक्टर, जीविका कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात गोविंद वैराळे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करत एचडीपीएस (High Density Planting System) कापूस तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन व उत्पन्न कसे मिळू शकते, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. समीर वड्याळकर यांनी दर्जेदार बियाण्यांची निवड, रोपांची संख्या व अंतर, खत व्यवस्थापन, कीडनाशक फवारणी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा योग्य वापर यावर मार्गदर्शन केले. तर डॉ. मुख्तार शेख यांनी कापूस जिनिंगचे महत्त्व, कापसातील आर्द्रता (मॉइश्चर), दर्जा व कंटॅमिनेशन याबाबत माहिती देत मॉइश्चर मीटरच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले. प्रगतिशील शेतकरी संजय सत्येकार यांनी एचडीपीएस तंत्रज्ञानाचा स्वतःचा अनुभव शेअर करत 2025-26 हंगामात प्रति एकर 22 किंटल उत्पादन घेतल्याचे सांगितले. ही पद्धत पारंपरिक शेतीतही फायदेशीर ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले. डॉ. के.पांडीयन, यांनी कमी होत चाललेल्या शेती क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर अधिक उत्पादन घेण्याची गरज व्यक्त केली. एचडीपीएस तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच "कस्तुरी भारत कापूस" या ब्रेडद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाचे मूल्य वाढविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सेंद्रिय कर्ब वाढविणे, सूक्ष्मजीवांची संख्या वाढविणे आणि कापसाच्या अवशेषांचा बायोचार किंवा ब्रिकेटसाठी उपयोग करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर प्रगतिशील शेतकरी व कॉटन एक्स्टेंशन व्हॉलेंटियर्स यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये महादेव गावंडे, पारशिवनी (18 किंटल/एकर), उमेश वाघमारे, काटोल (14.5 किंटल/एकर), सचिन ठाकरे, नरखेड (13) किंटल/ एकर), संदीप ढगे, भिवापूर (13 किंटल/ एकर) व विनोद शिंदे, नागपूर ग्रामीण (14 किंटल / एकर) या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल गौरव करण्यात आला. रवींद्र मनोहरे, यांनी एचडीपीएस पद्धतीचे फायदे, लांब धाग्याचा कापूस, स्मार्ट कापूस उत्पादन आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासह विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. त्यांनी सांगितले की, खताच्या टंचाइला पर्याय म्हणून कृषी अवषेशाचा वापर शेतकऱ्यांनी करावा. डॉ.अरविंद वाघमारे, यांनी भारतातील कापूस उत्पादन जागतिक तुलनेत कमी असल्याचे सांगत ते वाढविण्याची गरज अधोरेखित केली. एचडीपीएस तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकते व त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अंतर कमी करता येईल, असे त्यांनी नमूद केले. आगामी 2026 -27 साठी नवीन कृषी धोरणे व तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिनिंग प्रक्रियेपासून ब्रिकेट निर्मितीपर्यंत विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमात सहभाग घेतला, तसेच CITI CDRA चे कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युगांतर मेश्राम (प्रकल्प अधिकारी, CITI CDRA, नागपूर) यांनी केले आणि संचालन व समारोप जगदीश नेरलवार (प्रकल्प अधिकारी, CITI CDRA), यांनी आभार प्रदर्शनाने केला.

- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- नवनियुक्त ठाणेदार यांनी पत्रकारांशी शहरातील विविध विषयावर साधला संवाद उमरेड (राजु जांभुळे ) भिवापूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांसोबत संवाद साधत कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्यासाठी व यासरख्या इतर विषयाबाबत चर्चा बैठक घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांशी दि. २८ मार्चला महत्वाच्या विषयावर चर्चा केली. यात शहरातील महामार्गावर होणारे अपघात व वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमके काय करावे याबाबतची माहिती पत्रकाराकडून जाणून घेतली. यावेळी शहरात मोकाट जनावारे महामार्गावर फिरत असतात. बस स्थानक परिसर हॉटेल समोर प्रवासी आपली वाहने उभी करीत असतात. तसेच दोन्ही बाजूच्या मार्गावर ट्रॉव्हस थांबतात तिथे वाहतूक वाहतूक कोंडी होवून येजा करणाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो.तसेच माँ भिमादेवी प्रवेश द्वारा कडून येणाऱ्या नागरीक व वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्ग वरील वाहने दुकानांच्या अतिक्रमणामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क सांधण्यात येवून उपाय योजना करण्याची आवशकता असल्याची गरज पत्रकारांनी व्यक्त केली. बिअर बार व दारूची दुकाने सकाळीच सुरू शहरातील बिअर बार व देशीची दुकाने सकाळीच ६ वाजता उघडण्यात येते. तर बरीच बिअर बार समोरून बंद अवस्थेत दिसतात तर मात्र मागील दारातून आतमध्ये मद्यपीला टेबलवर राजरोसपणे दारू पुरविण्यात येत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांनी ठाणेदार मस्कर यांना सांगितली. तसेच कारगाव व पांढरवाणी येथे अवैधपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती ठाणेदारांना देण्यात आली. अगोदर खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय सुरू होती. आताही स्वःताला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लपून - छपून फोनद्वारे सट्टापट्टी घेत असल्याचा प्रकार सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहन परवाना नसलेल्यावर कारवाई ! शहरात मोठया प्रमाणात दुचाकी वाहनाची रेलचेल असून यात बिना वाहन परवाना धारक असलेल्या युवक वर्गाची संख्या मोठया प्रमाणात असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी या युवका करीता आरटीओ कॅम्प उमरेड विधासभा क्षेत्र आमदार संजय मेश्राम यांच्या सहकार्याने शहरात लावण्यात येवून जास्तीत जास्त जणांचे परवाना काढण्याची संधी यात देणार असून त्यानंतर परवाना नसलेल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरी घटना घडू नये यासाठी रात्रीचे गस्त घालण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार रविद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवांद सांधताना दिली. यावेळी भिवापूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष शरद मिरे, व्हाईस ऑफ मिडीया तालुकाध्यक्ष प्रदीप राऊत, पत्रकार अमर मोकाशी, राजेश जांभुळे, पंढरी हिवसे, जोग्रेंद्र सरदारे,नरेंद्र ढोणे उपस्थित होते.1
- चित्रकूट मऊ के टिकरा पूरब पताई के पास ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक की मौत तीन घायल प्रयागराज रेफर। मामला चित्रकूट जनपद के मऊ थाना क्षेत्र के टिकरा पूरब पताई के पास का बीते रविवार की शाम लगभग 7 बजे का है जहां ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक युवक की मौत हो गई और चालक सहित 3 लोग घायल हो गए मृतक 26 वर्षीय अजय पुत्र मिश्रीलाल निवासी बरियारी कला थाना मऊ के परिजनों ने बताया कि अजय गांव के ही ऑटो से मऊ से बरियारी कला जा रहा था तभी टिकरा के पास सामने से आए तेज रफ्तार ट्रैक्टर ने ऑटो मे टक्कर मार दी जिसमें अजय की घटना स्थल पर ही मौत हो गई और ऑटो चालक राजकिशोर ,बड़का और छोटू निवासीगण बरियारी कला गंभीर रूप से घायल हो गए जिनको सूचना पर पहुंची पुलिस ने मऊ सीएचसी से भेजा जहां से तीनों को गंभीर अवस्था में प्रयागराज रेफर किया गया है वहीं परिजनों को सूचना देने के बाद पुलिस ने मृतक अजय के शव को कब्जे में लेकर शव का आज सोमवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है।1
- Post by Samachar king digital1