logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पंचगंगा घाटावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अग्निशमन दलासह सोयीसुविधा वाढवण्याची मागणी कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क श्री क्षेत्र जोतिबा यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी होत असताना पंचगंगा घाट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काल घडलेल्या घटनेत दोन महिला भाविक पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. सुदैवाने स्थानिक नागरिक आणि उपस्थित भाविकांच्या तत्परतेमुळे दोघींनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या पार्श्वभूमीवर श्री जोतिबा भाविक भक्त समितीचे समन्वयक किशोर घाटगे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. घाटावर दररोज हजारो भाविक स्नानासाठी येत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाची तैनाती करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यासोबतच घाट परिसराची नियमित स्वच्छता, सुलभ शौचालयांची व्यवस्था, तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच यात्रेदरम्यान वाढणाऱ्या गर्दीचा फायदा घेत मोबाइल चोरी व भुरट्या चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असेही समितीने नमूद केले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरित पावले उचलून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

12 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
12 hrs ago
7e8caa02-d645-4869-bbf0-a703b357b0e9

पंचगंगा घाटावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अग्निशमन दलासह सोयीसुविधा वाढवण्याची मागणी कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क श्री क्षेत्र जोतिबा यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी होत असताना पंचगंगा घाट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काल घडलेल्या घटनेत दोन महिला भाविक पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. सुदैवाने स्थानिक नागरिक आणि उपस्थित भाविकांच्या तत्परतेमुळे दोघींनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या पार्श्वभूमीवर श्री जोतिबा भाविक भक्त समितीचे समन्वयक किशोर घाटगे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. घाटावर दररोज हजारो भाविक स्नानासाठी येत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाची तैनाती करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यासोबतच घाट परिसराची नियमित स्वच्छता, सुलभ शौचालयांची व्यवस्था, तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच यात्रेदरम्यान वाढणाऱ्या गर्दीचा फायदा घेत मोबाइल चोरी व भुरट्या चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असेही समितीने नमूद केले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरित पावले उचलून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित २१ व्या शिव महोत्सवात कागल येथील डी. आर. माने कॉलेजच्या ग्रुपने 'देवीचा जागर' हा कार्यक्रम सादर केला. या ऊर्जावान सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या व्हिडिओमध्ये पहा: कागलच्या कलाकारांचा हाय-एनर्जी परफॉर्मन्स. लोककलेचा वारसा जपणारा 'देवीचा जागर'. कोरिओग्राफर शुभम सोनुले यांचे विशेष दिग्दर्शन. योगिता खाडे मॅम आणि हसीना मालदार मॅम यांचे मार्गदर्शन. सहभागी कलाकार: विश्वजित वाघमारे, सूरज कुऱ्हाडे, स्वरंगी सारंगले, रसिका आवळे, आदिका भोसले, तनुजा जाधव, रूपाली भोसले, श्रुतिका पाटील आणि स्मिता कुऱ्हाडे.
    1
    शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित २१ व्या शिव महोत्सवात कागल येथील डी. आर. माने कॉलेजच्या ग्रुपने 'देवीचा जागर' हा कार्यक्रम सादर केला. या ऊर्जावान सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
या व्हिडिओमध्ये पहा:
कागलच्या कलाकारांचा हाय-एनर्जी परफॉर्मन्स.
लोककलेचा वारसा जपणारा 'देवीचा जागर'.
कोरिओग्राफर शुभम सोनुले यांचे विशेष दिग्दर्शन.
योगिता खाडे मॅम आणि हसीना मालदार मॅम यांचे मार्गदर्शन.
सहभागी कलाकार:
विश्वजित वाघमारे, सूरज कुऱ्हाडे, स्वरंगी सारंगले, रसिका आवळे, आदिका भोसले, तनुजा जाधव, रूपाली भोसले, श्रुतिका पाटील आणि स्मिता कुऱ्हाडे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • हुपरी येथील अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.
    1
    हुपरी येथील अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    53 min ago
  • सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    1
    सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे नागरिकांचे म्हणणे. वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .
    1
    विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे  नागरिकांचे म्हणणे.  वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सोलापूरमध्ये रविवारी पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने दमदार कामगिरी करत वेदिका सासने हिला एकतर्फी पराभूत करून महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. या विजयानंतर अमृता पुजारी हिचे नाव महिला कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. हरीभाई देवकरण प्रशाला मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व निर्झरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली.
    1
    सोलापूरमध्ये रविवारी पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने दमदार कामगिरी करत वेदिका सासने हिला एकतर्फी पराभूत करून महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. या विजयानंतर अमृता पुजारी हिचे नाव महिला कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे.
हरीभाई देवकरण प्रशाला मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व निर्झरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली.
    user_Solapur News
    Solapur News
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by ईलियास नजीर शेख
    2
    Post by ईलियास नजीर शेख
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं... #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव #Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange
    3
    पिंपरी चिंचवड : -
हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं...
#हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव
#Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.