logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चांदवड येथील श्री गोवर्धन गिरीधारी गोपालकृष्ण मंदिरात शनिवारपासून श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ; जन्मोत्सवानिमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन चांदवड येथील पुण्यशील देवी अहिल्याबाई होळकर कालीन श्री गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती होळकर ट्रस्टचे व्यवस्थापक एम. के. पवार व मंदिराचे पुजारी अमोल दीक्षित यांनी दिली. शनिवार दि. २९ ऑगस्ट पासून सुरू होणार्‍या या उत्सवानिमित्त शनिवार दि. २९ ऑगस्ट ते मंगळवार दि. १ नोव्हेंबर या कालावधीत श्री प्रभंजन बुवा भगत (लोणी) यांचे सुश्राव्य कीर्तन तसेच बुधवार दि. २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत श्री प्रसाद महाराज भागवत (पैठण) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच उत्सवात ‘श्रीं’चा महाभिषेक, शृंगार पूजा, दुपारी महिला भजनी मंडळाचे भजन, हरिपाठ, गीतापाठ, विष्णुसहस्रनाम, रात्री ९ ते ११ या वेळेत नारदीय कीर्तन, आरती, प्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वा ‘श्रीं’चा जन्मोत्सव, शनिवार दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी श्रींची महाआरती, महाप्रसाद व रात्री काल्याचे कीर्तन आणि प्रसादाने जन्मोत्सवाची सांगता होणार आहे. उत्सव यशस्वीतेसाठी मंदिराचे अरुण दीक्षित, किशोर दीक्षित, भूषण दीक्षित, चैतन्य दीक्षित, अर्चित दीक्षित व दीक्षित परिवार विशेष परिश्रम घेत आहेत.

6 hrs ago
user_Mahendra kantubhai Gujrathi
Mahendra kantubhai Gujrathi
Local News Reporter चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
6 hrs ago
afda30ec-d632-4eb4-91e6-c4919cbb7eff

चांदवड येथील श्री गोवर्धन गिरीधारी गोपालकृष्ण मंदिरात शनिवारपासून श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ; जन्मोत्सवानिमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन चांदवड येथील पुण्यशील देवी अहिल्याबाई होळकर कालीन श्री गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती होळकर ट्रस्टचे व्यवस्थापक एम. के. पवार व मंदिराचे पुजारी अमोल दीक्षित यांनी दिली. शनिवार दि. २९ ऑगस्ट पासून सुरू होणार्‍या या उत्सवानिमित्त शनिवार दि. २९ ऑगस्ट ते मंगळवार दि. १ नोव्हेंबर या कालावधीत श्री प्रभंजन बुवा भगत (लोणी) यांचे सुश्राव्य कीर्तन तसेच बुधवार दि. २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत श्री प्रसाद महाराज भागवत (पैठण) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच उत्सवात ‘श्रीं’चा महाभिषेक, शृंगार पूजा, दुपारी महिला भजनी मंडळाचे भजन, हरिपाठ, गीतापाठ, विष्णुसहस्रनाम, रात्री ९ ते ११ या वेळेत नारदीय कीर्तन, आरती, प्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वा ‘श्रीं’चा जन्मोत्सव, शनिवार दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी श्रींची महाआरती, महाप्रसाद व रात्री काल्याचे कीर्तन आणि प्रसादाने जन्मोत्सवाची सांगता होणार आहे. उत्सव यशस्वीतेसाठी मंदिराचे अरुण दीक्षित, किशोर दीक्षित, भूषण दीक्षित, चैतन्य दीक्षित, अर्चित दीक्षित व दीक्षित परिवार विशेष परिश्रम घेत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात अध्यक्ष सचिन कळमकर आणि उपाध्यक्ष मोहन शेलार यांची पत्रकारपरिषद येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांनी पत्रकार परिषदेत पाणीपट्टी वाढीची घोषणा केली. जिल्हा परिषदेकडून मिळणारे ५०% वीजबिल प्रोत्साहन अनुदान बंद झाल्याने आणि वीज बिल व देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाल्याने योजनेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून ग्रामपंचायतींसाठी पाणीपट्टीत ३०% तर व्यावसायिक ग्राहकांसाठी २०% वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार ग्रामपंचायतींना प्रतिलाख लिटरसाठी १६२५ रुपये मोजावे लागतील.
    1
    येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात अध्यक्ष सचिन कळमकर आणि उपाध्यक्ष मोहन शेलार यांची पत्रकारपरिषद
येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांनी पत्रकार परिषदेत पाणीपट्टी वाढीची घोषणा केली. जिल्हा परिषदेकडून मिळणारे ५०% वीजबिल प्रोत्साहन अनुदान बंद झाल्याने आणि वीज बिल व देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाल्याने योजनेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून ग्रामपंचायतींसाठी पाणीपट्टीत ३०% तर व्यावसायिक ग्राहकांसाठी २०% वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार ग्रामपंचायतींना प्रतिलाख लिटरसाठी १६२५ रुपये मोजावे लागतील.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील उमराणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था, कर्मचारी दवाखान्यात येतात की नाही प्रश्नचिन्ह
    1
    दिंडोरी तालुक्यातील उमराणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था, कर्मचारी दवाखान्यात येतात की नाही प्रश्नचिन्ह
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    1
    दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रतिनिधी समाधान शिरसाठ मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे सन 2003 साली नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे कालांतराने ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. सदर कृषी महाविद्यालय हे नुकतेच दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह अशा तीनही भव्य इमारतींचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे व सर्व शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार आमदार, नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव आणि मविप्र समाज समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक व विद्यार्थी यांची उपस्थिती असेल. नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्याची कृषी शिक्षणाची गरज व निकड या बाबींचा विचार करून मविप्र संस्थेने १ नोव्हेंबर २००३ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता कृषी शिक्षणाची कवाडे खुली केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करता यावे, या उद्देशाने शहरातील कृषी महाविद्यालय दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतरित करण्यात आले. तब्बल १४ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या याच प्रशस्त अशा महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच १४ एकर कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय विभाग, सुसज्ज असे भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, सर्व १० विभागांच्या सुसज्ज, अद्ययावत परिपूर्ण अशा प्रयोगशाळा व शिक्षण साहित्य साधनांनीयुक्त व्याख्यान कक्ष, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. चार वर्षांच्या बीएससी कृषी पदवी असलेल्या या कृषी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष १२० विद्यार्थी इतकी आहे. याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय व इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयसुद्धा सुरू आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी महाविद्यालयातील सर्व सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता तपासून महाविद्यालयास सन २०२२-२३ मध्ये ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. तसेच, सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’ यांच्यातर्फे महाविद्यालयास ‘कृषीभूषण-२०२४’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘KRUSHITHON 2024’ मध्ये ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक व ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यावर महाविद्यालयाचा जास्त भर आहे. शिक्षण संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांचा कृषी व आर्थिक विकास साधने हेच कृषी महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.
    2
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
प्रतिनिधी समाधान शिरसाठ 
मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे सन 2003 साली नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे कालांतराने ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. सदर कृषी महाविद्यालय हे नुकतेच दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह अशा तीनही भव्य इमारतींचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे व सर्व शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार आमदार, नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव आणि मविप्र समाज समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक व विद्यार्थी यांची उपस्थिती असेल. 
नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्याची कृषी शिक्षणाची गरज व निकड या बाबींचा विचार करून मविप्र संस्थेने १ नोव्हेंबर २००३ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता कृषी शिक्षणाची कवाडे खुली केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करता यावे, या उद्देशाने शहरातील कृषी महाविद्यालय दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतरित करण्यात आले. तब्बल १४ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या याच प्रशस्त अशा महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच १४ एकर कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय विभाग, सुसज्ज असे भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, सर्व १० विभागांच्या सुसज्ज, अद्ययावत परिपूर्ण अशा प्रयोगशाळा व शिक्षण साहित्य साधनांनीयुक्त व्याख्यान कक्ष, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. चार वर्षांच्या बीएससी कृषी पदवी असलेल्या या कृषी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष १२० विद्यार्थी इतकी आहे. याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय व इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयसुद्धा सुरू आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी महाविद्यालयातील सर्व सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता तपासून महाविद्यालयास सन २०२२-२३ मध्ये  ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. तसेच, सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’ यांच्यातर्फे महाविद्यालयास ‘कृषीभूषण-२०२४’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘KRUSHITHON 2024’ मध्ये ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य 
डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक व ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यावर महाविद्यालयाचा जास्त भर आहे. शिक्षण संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांचा कृषी व आर्थिक विकास साधने हेच कृषी महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.
    user_PRASIDHI PRAMUKH NEWS
    PRASIDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • लासलगावात शेतकरी आक्रमक! ‘कांदा एक्स्प्रेस’ रोखली; सडलेल्या कांद्यावरून अधिकाऱ्यांना घेतले धारेवर नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला आहे. एनसीसीएफ (NCCF) च्या कांदा खरेदी धोरणाविरोधात आणि कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट ‘कांदा एक्स्प्रेस’ अडवून रेल्वे रोको आंदोलन केले. ​ याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत लासलगाव स्थानकात कांदा घेऊन जाणारी ट्रेन अडवली. मध्य प्रदेशातून आणलेला आणि निकृष्ट/सडलेला कांदा दिल्लीला पाठवला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. ​ शेतकर्‍यांच्या घरात चांगल्या दर्जाचा कांदा पडून असताना सडलेला कांदा का खरेदी केला जातोय, असा सवाल करत आंदोलकांनी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरले. ​आंदोलनादरम्यान गणेश निंबाळकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले ​"गेली पाच वर्षे प्रशासनाचा कारभार अपारदर्शक आहे. एनसीसीएफने कांदा खरेदी केंद्रे कुठे सुरू केली? हा कांदा कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केला? याची कोणतीही माहिती दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या घरात फेब्रुवारी-मार्चमधील कांदा अजून सुरक्षित आहे, मग यांचा अवघ्या १५ दिवसांत खरेदी केलेला कांदा कसा सडला? दिल्लीला चांगलाच कांदा गेला पाहिजे, हीच आमची मागणी आहे." ​शेतकऱ्यांची मुख्य मागणी ​• सडलेला आणि निकृष्ट दर्जाचा कांदा दिल्लीला पाठवणे तत्काळ थांबवावे. • स्थानिक शेतकऱ्यांच्या घरातील चांगल्या दर्जाचा कांदा रास्त भावाने खरेदी करण्यात यावा. • कांदा खरेदी केंद्रांची आणि प्रक्रियेची माहिती पूर्णपणे पारदर्शक करावी.
    3
    लासलगावात शेतकरी आक्रमक! ‘कांदा एक्स्प्रेस’ रोखली; सडलेल्या कांद्यावरून अधिकाऱ्यांना घेतले धारेवर
नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला आहे. एनसीसीएफ (NCCF) च्या कांदा खरेदी धोरणाविरोधात आणि कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट ‘कांदा एक्स्प्रेस’ अडवून रेल्वे रोको आंदोलन केले. 
​ याबाबत सविस्तर वृत्त असे की  प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत लासलगाव स्थानकात कांदा घेऊन जाणारी ट्रेन अडवली.  मध्य प्रदेशातून आणलेला आणि निकृष्ट/सडलेला कांदा दिल्लीला पाठवला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.
​ शेतकर्‍यांच्या घरात चांगल्या दर्जाचा कांदा पडून असताना सडलेला कांदा का खरेदी केला जातोय, असा सवाल करत आंदोलकांनी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरले. 
​आंदोलनादरम्यान गणेश निंबाळकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले
​"गेली पाच वर्षे प्रशासनाचा कारभार अपारदर्शक आहे. एनसीसीएफने कांदा खरेदी केंद्रे कुठे सुरू केली? हा कांदा कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केला? याची कोणतीही माहिती दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या घरात फेब्रुवारी-मार्चमधील कांदा अजून सुरक्षित आहे, मग यांचा अवघ्या १५ दिवसांत खरेदी केलेला कांदा कसा सडला? दिल्लीला चांगलाच कांदा गेला पाहिजे, हीच आमची मागणी आहे."
​शेतकऱ्यांची मुख्य मागणी
​• सडलेला आणि निकृष्ट दर्जाचा कांदा दिल्लीला पाठवणे तत्काळ थांबवावे. 
• स्थानिक शेतकऱ्यांच्या घरातील चांगल्या दर्जाचा कांदा रास्त भावाने खरेदी करण्यात यावा. 
• कांदा खरेदी केंद्रांची आणि प्रक्रियेची माहिती पूर्णपणे पारदर्शक करावी.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    2
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद.​ NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद.​
    1
    NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद.​
NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद.​
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पुस्तकांचा तुटवडा निफाड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तकांच्या १,५२७ संचांची कमतरता; तातडीने पुस्तके द्या, अन्यथा शिक्षण विभागाला टाळे ठोकू : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. तालुक्यात तब्बल १,५२७ संचांचा तुटवडा असून, पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा तुटवडा तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत; अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून ती जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर वितरित करण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पुस्तके पोहोचलेली नाहीत. निफाड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी, चौथी, पाचवी, सहावी व सातवीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेषतः दुसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांनी जुनी पुस्तके जमा करून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी नवीन पुस्तके उपलब्ध नसल्याने अध्यापनात अडथळे येत आहेत. या प्रश्नाबाबत प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे जाब विचारला. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे चर्चेतून समोर आल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी लासलगाव शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वर्गनिहाय तुटवडा इयत्ता २ री — ७ संच इयत्ता ४ थी — २७ संच इयत्ता ५ वी — ७६८ संच इयत्ता ६ वी — ६१४ संच इयत्ता ७ वी — १११ संच एकूण — १,५२७ संच “विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मोफत पुस्तके वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पुस्तकांचा तुटवडा तातडीने दूर करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संच उपलब्ध करून द्यावेत.” — प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य
    1
    पुस्तकांचा तुटवडा

निफाड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तकांच्या १,५२७ संचांची कमतरता; तातडीने पुस्तके द्या, अन्यथा शिक्षण विभागाला टाळे ठोकू
: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. तालुक्यात तब्बल १,५२७ संचांचा तुटवडा असून, पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा तुटवडा तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत; अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी दिला.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून ती जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर वितरित करण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पुस्तके पोहोचलेली नाहीत.
निफाड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी, चौथी, पाचवी, सहावी व सातवीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेषतः दुसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांनी जुनी पुस्तके जमा करून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी नवीन पुस्तके उपलब्ध नसल्याने अध्यापनात अडथळे येत आहेत.
या प्रश्नाबाबत प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे जाब विचारला. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे चर्चेतून समोर आल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी लासलगाव शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
वर्गनिहाय तुटवडा
इयत्ता २ री — ७ संच
इयत्ता ४ थी — २७ संच
इयत्ता ५ वी — ७६८ संच
इयत्ता ६ वी — ६१४ संच
इयत्ता ७ वी — १११ संच
एकूण — १,५२७ संच
“विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मोफत पुस्तके वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पुस्तकांचा तुटवडा तातडीने दूर करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संच उपलब्ध करून द्यावेत.”
— प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बिहार गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें। गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।
    1
    बिहार गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है।
इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें।
S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।
गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है।
इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें।
S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.