नामदेवाची मॅनेजमेंट तलवारीच्या धारेवर! पालिकेच्या आवारात उघडी तलवार पाहून खळबळ; युवराज दाखले यांचा घणाघात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवारात उभ्या असलेल्या एका आलिशान इनोव्हा गाडीच्या डॅशबोर्डवर उघडी तलवार ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. MH14HK8074 क्रमांकाच्या या गाडीवर "शिवाजी द मॅनेजमेंट गुरु" असे लिहिले असून, या घटनेचा फोटो समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. हिंदू मातंग सेनेचे मुख्य प्रवक्ते युवराज दाखले यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत, "नामदेवाची मॅनेजमेंट तलवारीच्या धारेवर चालते का?" असा बोचरा सवाल उपस्थित केला आहे. "हे शिवरायांच्या विचारांची पायमल्ली" यावेळी बोलताना युवराज दाखले म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला प्रेम आणि न्यायाचा संदेश दिला. त्यांच्या नावाचा वापर करणाऱ्या संस्थेच्या गाडीत अशा प्रकारे उघडी तलवार मिरवणे म्हणजे महाराजांच्या विचारांचा अपमान आहे. ही तलवार कोणाला घाबरवण्यासाठी ठेवली आहे?" असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. युवराज दाखले यांच्या प्रमुख मागण्या: गाडी जप्ती: संबंधित MH14HK8074 क्रमांकाची गाडी तात्काळ जप्त करून मालकावर गुन्हा दाखल करावा. शस्त्रबंदी: शासकीय आवारात उघडी शस्त्रे आणणाऱ्यांवर कायमची बंदी घालावी. कठोर कारवाई: 'शिवाजी' नावाचा गैरवापर करून दहशत निर्माण करणाऱ्यांची चौकशी व्हावी. आंदोलनाचा इशारा: पोलीस आयुक्तांनी २४ तासांच्या आत संबंधितांवर कारवाई न केल्यास शिवशाही व्यापारी संघ आणि हिंदू मातंग सेना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दाखले यांनी दिला आहे. आता या प्रकरणावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नामदेवाची मॅनेजमेंट तलवारीच्या धारेवर! पालिकेच्या आवारात उघडी तलवार पाहून खळबळ; युवराज दाखले यांचा घणाघात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवारात उभ्या असलेल्या एका आलिशान इनोव्हा गाडीच्या डॅशबोर्डवर उघडी तलवार ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. MH14HK8074 क्रमांकाच्या या गाडीवर "शिवाजी द मॅनेजमेंट गुरु" असे लिहिले असून, या घटनेचा फोटो समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. हिंदू मातंग सेनेचे मुख्य प्रवक्ते युवराज दाखले यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत, "नामदेवाची
मॅनेजमेंट तलवारीच्या धारेवर चालते का?" असा बोचरा सवाल उपस्थित केला आहे. "हे शिवरायांच्या विचारांची पायमल्ली" यावेळी बोलताना युवराज दाखले म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला प्रेम आणि न्यायाचा संदेश दिला. त्यांच्या नावाचा वापर करणाऱ्या संस्थेच्या गाडीत अशा प्रकारे उघडी तलवार मिरवणे म्हणजे महाराजांच्या विचारांचा अपमान आहे. ही तलवार कोणाला घाबरवण्यासाठी ठेवली आहे?" असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. युवराज दाखले यांच्या प्रमुख मागण्या: गाडी जप्ती: संबंधित MH14HK8074 क्रमांकाची गाडी तात्काळ
जप्त करून मालकावर गुन्हा दाखल करावा. शस्त्रबंदी: शासकीय आवारात उघडी शस्त्रे आणणाऱ्यांवर कायमची बंदी घालावी. कठोर कारवाई: 'शिवाजी' नावाचा गैरवापर करून दहशत निर्माण करणाऱ्यांची चौकशी व्हावी. आंदोलनाचा इशारा: पोलीस आयुक्तांनी २४ तासांच्या आत संबंधितांवर कारवाई न केल्यास शिवशाही व्यापारी संघ आणि हिंदू मातंग सेना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दाखले यांनी दिला आहे. आता या प्रकरणावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- नांदेड पोलिसांचे 'ऑपरेशन क्रॅक डाऊन': ४३ लाख ४८ हजारांचा अवैध शस्त्रसाठा जप्त; दोन आरोपींवर गुन्हा दाखल1
- तळेगाव एमआयडीसीत आठव्या मजल्यावरून उडी; ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू... मावळ पुणे :- मावळमधील तळेगाव एमआयडीसी परिसरात अर्बन लाईफ टॉवर सोसायटीत एका ३५ वर्षीय महिलेने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.प्रतिभा शंकर असे मृत महिलेचे नाव असून, पतीसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या प्रकरणात घरगुती वादाचे नेमके कारण काय होते आणि महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले होते का, याचा तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.... : लक्ष्मण कांबळे,पोलीस उपनिरीक्षक तळेगाव MIDC #तळेगाव #मावळ #तळेगावएमआयडीसी #अर्बनलाईफटॉवर #महिलेचामृत्यू #घरगुतीवाद #पोलीसतपास #पुणेबातम्या #Talegaon #Maval #TalegaonMIDC #UrbanLifeTower #WomanDeath #DomesticDispute #PoliceInvestigation #PuneNews1
- पुण्यात वादळी वाऱ्यामुळे पुणे मेट्रोच्या बांधकामावरील पत्रे उडून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मेट्रोच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- महामेट्रोच्या कामामुळे निगडी महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा जीव गेला. या घातक प्रकारामुळे पिंपरी चिंचवडकरांनी महामेट्रो संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.1
- नसरापूर अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात काढला मोर्चा ; नागरिक मोठ्या संख्येने सहभागी विक्रम शिंदे /भोर दि.१० नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकातून मूक मोर्चा काढण्यात आला. “चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे” आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात पीडित मुलीचे आई-वडीलही सहभागी झाले होते. पुणे शहरातील विविध भागांतून नागरिक, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताप व्यक्त केला.1
- एका युझरने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत 'कृष्णावतारम' नावाच्या एका सिनेमासाठी व्हायरल लूक तयार केला आहे. चॅटजीपीटीने बनवलेल्या या आकर्षक डिझाइनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने कला क्षेत्रात काय नवं घडू शकतं, यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जात आहे.1
- उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात भगवान लिंबोरे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला आहे. गजानन लिंबोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मृताच्या पत्नी सौ. आशा भगवान लिंबोरे यांनी न्याय मिळावा अशी मागणी केली. या प्रकरणी शासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे.1
- सांगली जिल्ह्यात जमिनीच्या वादातून संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. पोलिसांनी याची माहिती मिळताच, तात्काळ कारवाई करत फिल्मी स्टाईलने आरोपींना बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.1