पूर्व उपनगरांतील रेल्वे स्थानक परिसरात जास्त गर्दीच्या वेळांमध्ये पदपथ व वाहतूक मार्गांच्या सुसूत्रतेसाठी नियोजन करावेः-अश्विनी भिडे मुंबई। रेल्वे स्थानक परिसरात सुगम्य पदपथ (Accessible Footpath) धोरणांतर्गत बृहन्मुंबई क्षेत्रात ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) यादृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानक नजीकच्या परिसराचा विकास करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर धोरण तयार करण्यात यावे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात पदपथांसोबतच रस्ते वाहतुकीच्या विषयांची अंमलबजावणी सूक्ष्म आणि नियोजनबद्धरित्या करणे शक्य होईल. परिणामी नागरिकांनाही अति गर्दीच्या वेळेत स्थानक परिसरातून चालणे आणि वाहतुकीचे पर्याय उपलब्ध होण्यासाठी या नियोजनाचा फायदा होईल, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. आज (दिनांक २७ ऑगस्ट २०२६) पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडूप, कांजुरमार्ग याठिकाणच्या स्थानक परिसरात आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी भिडे यांनी निर्देश दिले. सुगम्य पदपथ (Accessible Footpath) धोरणांतर्गत बृहन्मुंबई क्षेत्रात ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे. तसेच, कचरा साचण्याची संवेदनशील ठिकाणे (Garbage Vulnerable Point) निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने पूर्व उपनगरातील एन, एस व टी या विभागात (Ward) विविध ठिकाणी सुरू असलेल्या कार्यवाहीची महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सुमारे तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या या पाहणी दौऱयात भिडे यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. परवान्यात नमूद क्षेत्रफळाव्यतिरिक्त जागेवर व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड,उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर,उपायुक्त (परिमंडळ- ६) संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त ( टी विभाग) योगिता कोल्हे, सहायक आयुक्त (एस विभाग) समरीन सय्यद, सहायक आयुक्त (एन विभाग) जयदीप मोरे आदी उपस्थित होते. ‘टी’ विभागातील एकूण मार्गांपैकी १३ मार्ग ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत हाती घेण्यात आले आहेत. या १३ मार्गांवरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहेत. मुलुंड पश्चिम परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग तसेच, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याकामी प्राधान्य देण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्तअ अश्विनी भिडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील पदपथांची पाहणी केली. पदपथांशी संलग्न अशा विविध उपयोगिता वाहिन्यांच्या अनुषंगाने अभियांत्रिकी विभागाच्या मदतीने पदपथ चालण्यासाठी सोयीस्कर होतील, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. पदपथांची निवड करून त्याठिकाणी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. भांडुप रेल्वेन स्थानक (पश्चिम) येथे 'बेस्ट' बसेसच्या नियमित वाहतुकीसाठी आणि रस्ते वाहतूकीच्या अनुषंगाने पदपथ व वाहतूक मार्ग नियोजनासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना अश्विनी भिडे यांनी दिल्या. भांडुप स्थानक (पश्चिम) परिसरात एकूण ९४ गाळेधारकांना पर्याय जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पदपथांवरील जागा उपलब्ध करून देत रेल्वे स्थानकापर्यंत पोहचण्यासाठीचा पदपथ सुलभपणे वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक (पश्चिम) परिसरातील २४ गाळे निष्कासन करून संपूर्ण परिसर पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या गाळेधारकांना पर्यायी जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, तसेच पदपथ मोकळा करण्यात यावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या. स्थानक परिसरात पोहोचताना किंवा स्थानकातून बाहेर पडताना पदपथावरून चालणाऱया नागरिकांना विनाअडथळा पदपथांचा वापर करता यावा, यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दुसऱया टप्प्यात लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भट्टीपाडा जंक्शन येथील २६ गाळे आणि पेपरमिंट चाळ येथील २७ गाळे निष्कासित करून पदपथ पादचाऱयांसाठी चालण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एस विभागअंतर्गत एकूण १४ मार्गांवर २०.५० कि.मी. लांबीचे पदपथ चालण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 'एन' विभागातील पंतनगर (घाटकोपर) येथील शिवाजी तंत्रशिक्षण शाळा परिसरातील पदपथांची आयुक्त अश्विनी भिडे यांनी पाहणी केली. या परिसरातील पाच मार्गावरील पदपथांवरील अतिक्रमण निष्कासन करण्याची कार्यवाही नियोजित करण्यात आली आहे. त्या्चा आढावा भिडे यांनी घेतला. श्रद्धानंद मार्ग, झुनझुनवाला मार्ग, अंकुश गावडे मार्ग, हरिश्चंद्र देसाई मार्ग या पाच मार्गांतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या कार्यवाही अंतर्गत एकूण ३ कि.मी. लांबीचे पदपथ चालण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे व इतर सर्व प्रकारचे अडथळे तत्काळ हटवून पदपथ पूर्णपणे अडथळामुक्त करावेत. तसेच, पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक् अश्विनी भिडे यांनी दिले. कचऱयाच्या संवेदनशील ठिकाणांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने मुलुंड पश्चिम येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग आणि भांडुप येथील बडवाईक रूग्णालय येथे नियमितपणे स्वच्छता करण्याचे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. कचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्यान संस्थांनी स्थानिक परिसरात घरोघरी नियमितपणे कचरा संकलन करावे. तसेच स्थानिक रहिवाश्यांचनी कचरा नियमितपणे योग्य ठिकाणी टाकून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त भिडे यांनी केले. रस्त्यावरील कचरा टाकण्याच्या ठिकानांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने नियमितपणे दंड वसूल करणे, सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या माध्यरमातून निगराणी करणे, कचरा संकलन वाहनांद्वारे कचरा संकलन करणे आदी गोष्टी नियमितपणे करण्याच्या सूचना भिडे यांनी दिल्या. *कचरा संवेदनशील ठिकाण निर्मूलनाचा बदवाईक रूग्णालयाचा पॅटर्न* भांडुप येथील बडवाईक रूग्णालय येथे वाणिज्यिक आणि स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने रस्त्यावर कचरा टाकण्यात येत होता. या परिसरात चालणाऱया विविध वाणिज्यिक उद्योगातून अॅल्युमिनियम, फर्निचर, मॅट्रेसेस, सॅनिटरी उत्पादने, सुका मेवा, रुग्णालयीन कचरा यासारखा विविध प्रकारचा घनकचरा रस्त्यावर टाकण्यात येत असल्याचे दिसून आले होते. याठिकाणी वाणिज्यिक उद्योगांच्या कचऱयाच्या प्रकारानुसार सुका कचरा वाहून नेण्याची वाहने उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, वाणिज्यिक गाळ्याच्या ठिकाणीही कचरा गोळा करण्यासाठीची संस्थांची ‘टीम’ पोहचू लागली. तसेच कचऱयाचे डबे रस्त्यावर उपलब्ध करून देण्यात आले. त्याठिकाणी कचऱयाच्या वाहनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘बीन अटेन्डंट’ची नेमणूक तीन सत्रांमध्ये करण्यात आली. अशा रितीने सलग पंधरा दिवस या परिसरातील वाणिज्यिक ग्राहक आणि नागरिकांचे कचरा टाकण्याच्या सवयी बदलण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर पुढील पंधरा दिवसांमध्ये नियमितपणे कचरा संकलनाची यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात आली. त्यामुळे कचरा संवेदनशील ठिकाणाचे निर्मूलन होतानाच या परिसरातील नागरिक तसेच बस थांब्याचा वापर करणाऱया प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे. या पुढाकारासाठी एस विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चमुचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी कौतुक केले. तसेच अशा पुढाकाराची माहिती इतर प्रशासकीय विभागांनाही सादरीकरणाच्या स्वरूपात मांडण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.

- पठान ने ह्यूमन चेन से दिखाया आईना नबी की हदीस मुंब्रा में मुंब्रा की सड़कों पर उतरी मानवता की मिसाल! नगरसेविका मर्जिया शानू पठान ने ह्यूमन चेन से दिखाया आईना नबी की हदीस मुंब्रा में ईद-ए-मिलादुन्नबी के खास मौके पर नगरसेविका मर्जिया शानू पठान द्वारा 'ह्यूमन चेन' बनाकर पैगंबर हज़रत मोहम्मद (स.) की हदीस पेश करने की इस अनूठी और प्रेरणादायक खबर के लिए1
- #Amravati #Maharashtra #AmravatiHospital #FireIncident #NICU #News24mumbai#महाराष्ट्र #अमरावती1
- पार्लमेंट मे लालूप्रसाद यादव का शाराना अंदाज ऐसा क्या कहा? पार्लमेंट मे लालूप्रसाद यादव का शाराना अंदाज ऐसा क्या कहा? Pure vidhansabha ko shayarana banaa Diya1
- समाजवादी पार्टी की तरफ से नाज़िम सिद्दीकी ने दी तमाम देशवासियों को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद | भाईचारे और मोहब्बत का पैगाम समाजवादी पार्टी की तरफ से नाज़िम सिद्दीकी ने दी तमाम देशवासियों को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद | भाईचारे और मोहब्बत का पैगाम1
- *IIIT हैदराबाद में एडमिशन के नाम पर 20 लाख ठगे:* फर्जी अलॉटमेंट लेटर भेजकर फोन बंद किया, लखनऊ में 3 ठगों पर पीड़ित और पृष्ठभूमि: विभूतिखंड के रहने वाले नरेंद्र सिंह की बेटी रुद्राक्षी सिंह कोटा से इंजीनियरिंग प्रवेश परीक्षा की तैयारी कर रही थीं. दिसंबर 2024 में कोचिंग संस्थान FIIT JEE के अचानक बंद होने से उनकी पढ़ाई प्रभावित हुई, जिसके बाद वे किसी प्रतिष्ठित कॉलेज में एडमिशन का विकल्प ढूंढ रहे थे. [1] गूगल सर्च से संपर्क: अप्रैल 2026 में पीड़ित का संपर्क गूगल सर्च के जरिए अविनाश सिंह नाम के व्यक्ति से हुआ. उसने खुद को मुंबई की "विजडम एजुकेशन" नामक कंसल्टेंसी का संचालक बताया. [1] झांसा और फर्जीवाड़ा: आरोपी ने पहले बेंगलुरु के एक कॉलेज में और फिर बाद में IIIT हैदराबाद में उतने ही खर्च में बीटेक (ECE) सीट दिलाने का दावा किया. [1] रकम की वसूली: आरोपियों ने पीड़ित को झांसे में लेकर 5 किस्तों में कुल ₹20 लाख ऐंठ लिए. इस रकम का कुछ हिस्सा आरोपी खुद पीड़ित के घर आकर नकद ले गया और बाकी हिस्सा ट्रांसफर कराया गया. [1] फर्जी अलॉटमेंट और फरार: आरोपियों ने फर्जी सीट अलॉटमेंट लेटर भेजा और जैसे ही पूरी रकम मिल गई, उन्होंने अपने मोबाइल फोन बंद कर दिए. ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा दैनिक समाचार पत्र1
- 🚨 ठाणे पुलिस की बड़ी कार्रवाई! बस में महिलाओं की सोने की चूड़ियां चोरी करने वाले गिरोह का पर्दाफाश। 3 आरोपी गिरफ्तार, करीब ₹20.53 लाख कीमत की 130 ग्राम सोने की चूड़ियां बरामद। जांच में 6 चोरी के मामलों का खुलासा। 🚨 ठाणे पुलिस की बड़ी कार्रवाई! बस में महिलाओं की सोने की चूड़ियां चोरी करने वाले गिरोह का पर्दाफाश। 3 आरोपी गिरफ्तार, करीब ₹20.53 लाख कीमत की 130 ग्राम सोने की चूड़ियां बरामद। जांच में 6 चोरी के मामलों का खुलासा।1
- मुंबई में इमरान प्रतापगढ़ी का जोरदार भाषण; ईद मिलाद-उन-नबी पर झूमी जनता! मुंबई में इमरान प्रतापगढ़ी का जोरदार भाषण; ईद मिलाद-उन-नबी पर झूमी जनता!1
- नेपाल में कुदरत का कहर: बाढ़ ने मचाई भारी तबाही, सैकड़ों की मौत और 1,300 से ज्यादा लापता काठमांडू। नेपाल-चीन सीमा के पास आई विनाशकारी बाढ़ ने भारी तबाही मचा दी है। तेज बहाव ने घरों, सड़कों, पुलों और कई इलाकों को अपनी चपेट में ले लिया। तस्वीरों में बाढ़ के पानी का खौफनाक मंजर साफ दिखाई दे रहा है। रिपोर्टों के अनुसार, 26 अगस्त को हिमालयी क्षेत्र में बर्फ-पत्थर के बड़े पैमाने पर खिसकने के बाद अचानक आई बाढ़ ने नेपाल के कई इलाकों में कहर बरपाया। नेपाल में 826 लोग अब भी लापता बताए जा रहे हैं, जबकि तिब्बत में भी सैकड़ों लोगों के लापता होने की खबर है। नेपाल और तिब्बत को मिलाकर 1,300 से अधिक लोगों के लापता होने की रिपोर्ट सामने आई है। इस आपदा में सैकड़ों लोगों की जान जा चुकी है और राहत-बचाव अभियान लगातार जारी है। कई इलाकों में सड़क और संचार व्यवस्था बुरी तरह प्रभावित होने के कारण बचाव दलों को मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। सेना और सुरक्षा बल हेलीकॉप्टरों समेत अन्य संसाधनों से लोगों को सुरक्षित निकालने में जुटे हैं। सोशल मीडिया पर 1,500–2,000 लोगों के बह जाने का दावा भी वायरल है, लेकिन इस संख्या की स्वतंत्र पुष्टि अभी नहीं हुई है। ऐसे में आधिकारिक आंकड़ों के सामने आने तक इस दावे को सावधानी से देखना जरूरी है। कुदरत के इस कहर ने एक बार फिर पूरे हिमालयी क्षेत्र में बढ़ते प्राकृतिक खतरे की भयावह तस्वीर सामने रख दी है।1