एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करुन तरुणाची आत्महत्या. पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ... जुन्नर पुणे : - : पुण्यातील जुन्नर तालुक्यात खळबळजनक घटना घडलीये. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर आधी जीवघेणा हल्ला केला अन मग तरुणाने स्वतः गळफास घेत आत्महत्या केलीये. एकतर्फी प्रेमातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे नाव महेश डामसे होते. महेशचे एका तरुणीवर प्रेम होते, मात्र ती लग्नाला होकार देत नव्हती. या रागातून त्याने तरुणीवर हल्ला करण्याचा कट आखला. जुन्नरमधील एका वस्तीगृहातून ही तरुणी महाविद्यालयात निघाली होती. तेंव्हा सरकारी रुग्णालयाच्या मागे महेशने तिला गाठले आणि कोयत्याने तिच्या डोक्यावर-चेहऱ्यावर वार केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर जुन्नर पोलीसांनी महेशचा शोध सुरु केला. तेंव्हा आज सकाळी एका टेकडीवर महेशची गाडी आढळली तर तिथंच एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. सीसीटीव्हीमध्ये त्या परिसरात तो एकटाच गेल्याचं दिसून आलं, त्यामुळं ही आत्महत्या असल्याचं दिसून येतंय. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेनं जुन्नर तालुका हादरून गेलाय.... : महादेव शेलार - एपीआय, गुन्हे शाखा पुणे ग्रामीण #जुन्नर #पुणेग्रामीणपोलीस #एकतर्फीप्रेम #प्रेमातूनहल्ला #धक्कादायकघटना #क्राईमन्यूज #पुणेबातमी #तरुणीवरहल्ला #आत्महत्या #महाराष्ट्रन्यूज #Junnar #PuneCrime #OneSidedLove #CrimeNews #PuneRuralPolice #MaharashtraNews #BreakingNews #AttemptToMurder #SuicideCase #IndiaNews

- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात काल रात्री रत्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावर भलमोठ झाड कोसळल्याची घटना घडली,... सुदैवानं या घटनेत ही महिला किरकोळ जखमी झाली आहे, वर्दळीच्या रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची वर्दी मिळताच आपल्या कडे असलेल्या साधन सामग्रीच्या साहाय्याने झाड कापून रस्ता मोकळा केला....1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- सर्वात आधी मी पोलिसांचा आभार मानतो की त्याच्या मुळे अनेक लोकांचे जीव वाचला नाही तर खूप मोठा अपघात झाला असता. आता त्याच्या मध्ये असा झाला त्याने सिग्नल तोडला मग पोलिसांनी त्याला गाडी साईडला घेयला सांगितले होती. मग पोलिसांनी पकडलं म्हणून त्याला राग आला तो पळून जायचं प्रयत्न करत होता त्याचा राग एवढा भयंकर होता त्याने रागाच्या भरात बाईक चा भुर भुर असा फुल रेस केला होता. आणि त्याच्या रागाच्या भरात मध्ये त्यांना लोकांना उडवला असता रिक्षा साठी लोक थांबले होते म्हणून पोलिसांनी चावी काढली म्हणून पोलिसांचा आभार मानतो कारण आज पोलिसांनी चावी काढली नसती तर आज मोठा अपघात झाला असता त्याने शांतपणे गाडी बाजूला घेऊन गाडीतून उतरून भले रागाने बोलले तरी चाललेल रागाने कोणतीच गाडी चालवून नका. त्याने अपघात होण्याची शक्यता आहे.1
- चार महिन्यांपूर्वी लग्न, हुंड्यासाठी नवऱ्याने आणि सासूने नवविवाहित सोनाली ला संपविले, पतीला अन् सासूला मोहोळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!1
- पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : शहरातील अनैतिक मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत गुन्हेगारी विश्वाला जोरदार धक्का दिला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने चिखली परिसरात मध्यरात्री छापा टाकून एक मोठे रॅकेट उघडकीस आणले. १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील लक्ष्मी चौकातील ‘आदित्य लॉज’वर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत ९ महिलांची सुटका करण्यात आली. यातील एक महिला बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या तस्करी करून आणण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. संबंधित महिलेच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून तिला मायदेशी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात ‘आदित्य लॉज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लॉज चालक, मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये ७ मसाज पार्लर आणि ४ हॉटेल्सचा समावेश आहे. या कारवायांमध्ये एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कारवाई केवळ गुन्हेगारीवर प्रहार नसून, पीडित महिलांना नवजीवन देणारी ठरत आहे.1
- ग्लोबल ब्रॅंड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूंनी दाखविला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रम शिंदे /भोर दि.16 नव्या काळांच्या आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड असेल्या राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.16) पुणे जिह्यातील भोर येथील रांजे येथे दिली. त्यांच्या हस्ते रांजे इथं उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, यांच्यासह इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली, नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर असलेली दर्जेदार यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे.2
- Lucknow mein Aag lagne ke Karan Bhari nuksan aur hua Hai1
- पिंपरी चिंचवड :- बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याला शस्त्र पुरवणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरी स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली... मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित वाघमारे हे गस्तीवर असताना त्यांना एका अल्पवयीन मुलाकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता, त्या मुलाकडे ५० हजार ५०० रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्तूल मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलासह त्याला शस्त्र पुरवणारा प्रतापसिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत....1