logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिक्षण आयुक्तांच्या आदेशाने शिक्षकांची वाढली डोकेदुखी; १ मे रोजी निकालावेळी पालकांना दाखवाव्या लागणार त्यांच्या मुलांच्या उत्तरपत्रिका राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना २ मेपासून उन्हाळा सुट्टी असणार आहे. त्यापूर्वी १ मे रोजी इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. निकालावेळी यंदा पहिल्यांदाच शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तरपत्रिका दाखवाव्या लागणार आहेत. तसे आदेश शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी काढले आहेत.राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना २ मेपासून उन्हाळा सुट्टी असणार आहे. त्यापूर्वी १ मे रोजी इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. निकालावेळी यंदा पहिल्यांदाच शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तरपत्रिका दाखवाव्या लागणार आहेत. तसे आदेश शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी काढले आहेत. शिक्षकांना आता प्रत्येक विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका अचूक तपासावी लागणार आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसीत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षक व पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास व अभ्यासेतर दोन्ही क्षेत्रात चालना देण्यासाठी राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी निकालपत्र देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवायच्या आहेत.उत्तरपत्रिका दाखविल्याने विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, अनुप्रयोग क्षमता व कौशल्यांचे अचूक निदान करता येणार आहे. विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करणे शक्य होईल. तसेच वैयक्तिक पातळीवर उपारात्मक अध्ययन व गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम राबविता येतील. गुणांपेक्षा कौशल्य व समज यावर आधारित प्रगतीचे मोजमाप शक्य होईल, हा त्यामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीत पालकांचीही होईल मदत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग व जबाबदार होतील. अध्ययनातील उणिवा लक्षात घेऊन घरी नियमित सराव, पुनरावृत्ती व मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पालक पार पाडतील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवयी (अभ्यासाची वेळ, वाचन, लेखन) विकसीत करण्यासाठी पालक सक्रिय भूमिका बजावतील. शाळा-घर या दोन्ही स्तरावर समन्वय ठेवून शैक्षणिक वातावरण निर्माण होईल. शिक्षक-पालकात सतत संवाद होईल. त्याअनुषंगाने विद्यार्थ्याच्या विकासासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करता येतो, असेही शिक्षण आयुक्तांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.म्हणून काढले आदेश मूल्यमापन प्रक्रियेबाबत पालकांचा विश्वास दृढ होईल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ व पारदर्शक चित्र समोर येईल. आत्मपरीक्षणातून सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते आणि शैक्षणिक तसेच वर्णनात्मक प्रगतीवर पालकांचे लक्ष केंद्रीय होईल. या उद्देशानेच राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी १ मे राेजी निकालावेळी पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवायच्या आहेत.

15 hrs ago
user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग.... भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती. बाईट : आमदार संजय केणेकर
    3
    छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग....
भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत
ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती.
बाईट : आमदार संजय केणेकर
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • येवला येथील श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात प्रदोष निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते. यावेळी महादेवांची विधिवत महापूजा आणि मनमोहक भस्म आरती करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदा महादेवांना प्रभू श्रीरामांच्या स्वरूपात अत्यंत देखणा शृंगार साकारण्यात आला होता. या अलौकिक दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
    1
    येवला येथील श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात प्रदोष निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते. यावेळी महादेवांची विधिवत महापूजा आणि मनमोहक भस्म आरती करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदा महादेवांना प्रभू श्रीरामांच्या स्वरूपात अत्यंत देखणा शृंगार साकारण्यात आला होता. या अलौकिक दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • गंगापूर वैजापूर रोड शिंगी पाटी येथे टू व्हीलर चा अपघात अपघातात एक जण गंभीर जखमी ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास गंगापूर घाटी येथे दाखल केले जखमीचे नाव शंकर विनायकराव वाघ वय 30 वर्ष रा. शिंगी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर
    1
    गंगापूर वैजापूर रोड शिंगी पाटी येथे टू व्हीलर चा अपघात अपघातात एक जण गंभीर जखमी ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास गंगापूर घाटी येथे दाखल केले जखमीचे नाव शंकर विनायकराव वाघ वय 30 वर्ष रा. शिंगी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर
    user_अरबाज शेख. सावरगावकर
    अरबाज शेख. सावरगावकर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    14 hrs ago
  • Post by Gautam Hiwrale
    1
    Post by Gautam Hiwrale
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • भीषण अपघात; भरधाव पिकअप उलटून १२ जणांचा मृत्य, २ लहान मुलांचा समावेश भयानक व्हिडिओ समोर मध्य प्रदेश राज्यात बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला असून, भरधाव पिकअप वाहन उलटल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ११ हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    1
    भीषण अपघात; भरधाव पिकअप उलटून १२ जणांचा मृत्य, २ लहान मुलांचा समावेश भयानक व्हिडिओ समोर 
मध्य प्रदेश राज्यात बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला असून, भरधाव पिकअप वाहन उलटल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ११ हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : भर उन्हात महानगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवरही महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कडक कारवाई केली. शहरातील सेवन हिल परिसरातील गजानन मंदिराजवळील मुख्य रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. 42 अंशांच्या कडक उन्हात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली. दरम्यान, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अचानक सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या या कठोर भूमिकेची शहरभर चर्चा सुरू आहे.
    4
    छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : भर उन्हात महानगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा
छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवरही महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कडक कारवाई केली. शहरातील सेवन हिल परिसरातील गजानन मंदिराजवळील मुख्य रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. 42 अंशांच्या कडक उन्हात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली.
दरम्यान, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अचानक सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या या कठोर भूमिकेची शहरभर चर्चा सुरू आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • ​येवला तालुक्यातील रेल्वे गेट क्रमांक ७७, ७६ आणि ७४ वरील वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटणार आहे. मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या तीन उड्डाणपुलांच्या (ROB) कामांना मंजुरी देण्यात आली. ​मध्य रेल्वेच्या २०२६-२७ मधील 'अंब्रेला योजने'तून या कामांसाठी जून महिन्यात १३६.७९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. दौंड-मनमाड मार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक असल्याने या गेटवर सतत ट्रॅफिक जॅम होतो. विशेषतः नगरसूल स्थानकावर उतरणाऱ्या साईभक्तांना शिर्डीकडे जाताना गेट क्र. ७७ मुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. ​या बैठकीत रेल्वे प्रशासनाने सांगितले की, प्रकल्पाचे आराखडे पूर्ण झाले असून जूनपासून कामाला गती मिळेल. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भूसंपादन व इतर तांत्रिक कामांसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    ​येवला तालुक्यातील रेल्वे गेट क्रमांक ७७, ७६ आणि ७४ वरील वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटणार आहे. मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या तीन उड्डाणपुलांच्या (ROB) कामांना मंजुरी देण्यात आली.
​मध्य रेल्वेच्या २०२६-२७ मधील 'अंब्रेला योजने'तून या कामांसाठी जून महिन्यात १३६.७९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. दौंड-मनमाड मार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक असल्याने या गेटवर सतत ट्रॅफिक जॅम होतो. विशेषतः नगरसूल स्थानकावर उतरणाऱ्या साईभक्तांना शिर्डीकडे जाताना गेट क्र. ७७ मुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता.
​या बैठकीत रेल्वे प्रशासनाने सांगितले की, प्रकल्पाचे आराखडे पूर्ण झाले असून जूनपासून कामाला गती मिळेल. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भूसंपादन व इतर तांत्रिक कामांसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.