logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुंबईतील तब्बल १३ हजार ४०० पागडी आणि उपकरप्राप्त इमारतींमध्ये राहणाऱ्या २० लाख रहिवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या इमारतींना 'धोकादायक' ठरवण्याचे कायदेशीर अधिकार आता 'म्हाडा'ला देण्यात आले असून, म्हाडाला यासाठी 'सक्षम प्राधिकरण' म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात आणि प्रशासकीय पातळीवर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून सरकारने या मागणीला मंजुरी दिली आहे. मुंबईतील दक्षिण आणि मध्य भागात मोठ्या संख्येने असलेल्या पागडी पद्धतीच्या इमारतींची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मात्र, या इमारतींना अधिकृतपणे 'धोकादायक' घोषित करणे, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आणि पुनर्विकास सुरू करणे या प्रक्रियेत मुंबई महानगर पालिका आणि म्हाडा यांच्यातील तांत्रिक अधिकारांमुळे मोठा वेळ वाया जात होता. यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता आणि कित्येक प्रकल्प रखडले होते. आता इमारतींच्या सुरक्षेबाबत म्हाडा हाच अंतिम निर्णय घेणार असल्याने विविध परवानग्यांसाठी वेगवेगळ्या विभागांकडे जाण्याची गरज उरणार नाही. यामुळे रखडलेल्या पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होऊन विकासक किंवा घरमालकांच्या मनमानीला चाप बसेल. तसेच पावसाळ्यात अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करणे आता म्हाडाला कायदेशीररित्या सोपे होणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, हा मुंबईतील २० लाख पागडी रहिवाशांच्या सुरक्षिततेचा आणि न्याय्य हक्काचा विजय आहे. १३,४०० इमारतींमधील नागरिकांच्या जिवाशी होणारा खेळ थांबवण्यासाठी म्हाडाला सक्षम प्राधिकरण करणे गरजेचे होते, ज्यामुळे पुनर्विकासाच्या कामांना खरी गती मिळेल. शासनाच्या या निर्णयाचे मुंबईतील पागडी भाडेकरू आणि विविध रहिवासी संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून, यामुळे मुंबईचा कायापालट होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

1 hr ago
user_जनहित न्यूज महाराष्ट्र
जनहित न्यूज महाराष्ट्र
Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
1 hr ago
85b21c25-f940-403c-b204-b7ff517d70c0

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात नाल्यांची सफाई करण्यासाठी २ कोटी ४० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे टेंडर काढण्यात आले होते. मात्र, असे असूनही येथील नालेसफाईचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. भिवंडीत सध्या केवळ ४० ते ५० टक्केच नालेसफाई पूर्ण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे भिवंडी शहर पाण्यात बुडणार आणि येथील जनतेचे मोठे नुकसान होणार हे आता निश्चित मानले जात आहे.
    3
    ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात नाल्यांची सफाई करण्यासाठी २ कोटी ४० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे टेंडर काढण्यात आले होते. मात्र, असे असूनही येथील नालेसफाईचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. भिवंडीत सध्या केवळ ४० ते ५० टक्केच नालेसफाई पूर्ण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे भिवंडी शहर पाण्यात बुडणार आणि येथील जनतेचे मोठे नुकसान होणार हे आता निश्चित मानले जात आहे.
    user_Shivam
    Shivam
    भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ठाणे येथे एस आय आर च्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी शमीम खान आणि शानू पठान हे अधिकाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी तेथील उपस्थित अधिकाऱ्यांसोबत मिळून एस आय आर च्या विविध कामकाजाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.
    1
    ठाणे येथे एस आय आर च्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी शमीम खान आणि शानू पठान हे अधिकाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी तेथील उपस्थित अधिकाऱ्यांसोबत मिळून एस आय आर च्या विविध कामकाजाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.
    user_Prime mumbai 24 News
    Prime mumbai 24 News
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    27 min ago
  • ठाण्याच्या एमएम व्हॅली मनपा शाळेत NCP (SP) नेत्यांनी अचानक भेट दिली आहे. या अचानक दौऱ्यादरम्यान, तेथील बीएलओवर (BLO) जनतेने बदसलूकीचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
    1
    ठाण्याच्या एमएम व्हॅली मनपा शाळेत NCP (SP) नेत्यांनी अचानक भेट दिली आहे. या अचानक दौऱ्यादरम्यान, तेथील बीएलओवर (BLO) जनतेने बदसलूकीचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    40 min ago
  • कल्याणमधून किरीट सोमय्या यांनी एक मोठा हल्लाबोल केला आहे. मुंब्रामध्ये तब्बल ४० हजार बांगलादेशींची नावे असल्याचा थेट दावा त्यांनी केला आहे.
    1
    कल्याणमधून किरीट सोमय्या यांनी एक मोठा हल्लाबोल केला आहे. मुंब्रामध्ये तब्बल ४० हजार बांगलादेशींची नावे असल्याचा थेट दावा त्यांनी केला आहे.
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    42 min ago
  • ठाणे येथील जनता टाईम्स न्यूजचे मुख्य संपादक सरवर खान यांनी एक इशारा दिला आहे. हतबल आणि मजबूर लोकांच्या पाठीशी जनता टाईम्स न्यूज पूर्ण ताकदीनिशी खंबीरपणे उभी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
    1
    ठाणे येथील जनता टाईम्स न्यूजचे मुख्य संपादक सरवर खान यांनी एक इशारा दिला आहे. हतबल आणि मजबूर लोकांच्या पाठीशी जनता टाईम्स न्यूज पूर्ण ताकदीनिशी खंबीरपणे उभी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे 'एसआयआर' (SIR) आणि 'टॉरेंट' (TORENT) यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंनंतर आम आदमी पार्टीचे नेते शाह आलम यांनी यावर भाष्य केले आहे. या गंभीर निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंबाबत शाह आलम यांनी नेमके काय म्हटले आहे आणि काय भूमिका मांडली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे 'एसआयआर' (SIR) आणि 'टॉरेंट' (TORENT) यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंनंतर आम आदमी पार्टीचे नेते शाह आलम यांनी यावर भाष्य केले आहे. या गंभीर निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंबाबत शाह आलम यांनी नेमके काय म्हटले आहे आणि काय भूमिका मांडली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • झारखंडच्या रांची-टाटा हायवेवर महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता वाढवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमशेदपूरहून हजारीबागला जाणाऱ्या तीन महिलांच्या कारचा एका स्कॉर्पिओने पाठलाग केला, रस्ता अडवला आणि त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. दशम फॉलजवळ एका वेगवान स्कॉर्पिओने त्यांच्या कारला धडक दिली, ज्यानंतर गाडीतील दोन तरुण त्यांच्याशी वाद घालू लागले. धोका ओळखून महिला तेथून निघून गेल्या, परंतु आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला आणि अनेकदा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. शेवटी आरोपींनी महिलांची कार थांबवून तिचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यात यश न मिळाल्याने त्यांनी गाडीवर दगडफेक केली, ज्यामुळे ड्रायव्हरच्या बाजूची काच फुटली आणि चालक रणवीर सिंग जखमी झाले. या घटनेनंतर महिलांनी तात्काळ डायल-१०० वर पोलिसांना संपर्क साधला. मात्र, पोलीस सुमारे २५ मिनिटांनंतर घटनास्थळी पोहोचले आणि तोपर्यंत आरोपी तिथून पळून गेले होते, असा आरोप महिलांनी केला आहे. नंतर पोलिसांनी एका व्हिडिओच्या आधारे स्कॉर्पिओची ओळख पटवून वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी राजकुमार महतो आणि शोएब रझा या दोन आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली असून सध्या पुढील तपास सुरू आहे.
    1
    झारखंडच्या रांची-टाटा हायवेवर महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता वाढवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमशेदपूरहून हजारीबागला जाणाऱ्या तीन महिलांच्या कारचा एका स्कॉर्पिओने पाठलाग केला, रस्ता अडवला आणि त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. दशम फॉलजवळ एका वेगवान स्कॉर्पिओने त्यांच्या कारला धडक दिली, ज्यानंतर गाडीतील दोन तरुण त्यांच्याशी वाद घालू लागले. धोका ओळखून महिला तेथून निघून गेल्या, परंतु आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला आणि अनेकदा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला.

शेवटी आरोपींनी महिलांची कार थांबवून तिचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यात यश न मिळाल्याने त्यांनी गाडीवर दगडफेक केली, ज्यामुळे ड्रायव्हरच्या बाजूची काच फुटली आणि चालक रणवीर सिंग जखमी झाले. या घटनेनंतर महिलांनी तात्काळ डायल-१०० वर पोलिसांना संपर्क साधला. मात्र, पोलीस सुमारे २५ मिनिटांनंतर घटनास्थळी पोहोचले आणि तोपर्यंत आरोपी तिथून पळून गेले होते, असा आरोप महिलांनी केला आहे.

नंतर पोलिसांनी एका व्हिडिओच्या आधारे स्कॉर्पिओची ओळख पटवून वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी राजकुमार महतो आणि शोएब रझा या दोन आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली असून सध्या पुढील तपास सुरू आहे.
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.