logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गजानन महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी ४० लाखांचा निधी; धारणीत विकासकामाचा शुभारंभ गजानन महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी ४० लाखांचा निधी; धारणीत विकासकामाचा शुभारंभ -धारणी (प्रतिनिधी) : ऋषिपंचमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत धारणी येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या विकासाला महत्त्वपूर्ण चालना मिळाली. मंदिराच्या सभामंडपाच्या बांधकामासाठी तब्बल ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाचे भूमिपूजन आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते धार्मिक वातावरणात पार पडले. यावेळी आमदार काळे यांनी श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन भाविकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात सभामंडपाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सव, भजन-कीर्तन तसेच सामाजिक उपक्रमांसाठी भाविकांना प्रशस्त जागा मिळणार आहे. त्यामुळे मंदिराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडून परिसराच्या विकासालाही गती मिळणार आहे. धारणी परिसरातील श्रद्धास्थळांच्या विकासासोबतच भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मंजूर निधीतून होणाऱ्या सभामंडपाच्या कामामुळे भाविकांची गैरसोय दूर होऊन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, कमल मालवीय, अनिल मालवीय, सचिन कडू, पंकज माकोडे, श्याम गंगराळे, राजा पाटील, नगरसेवक, विविध पदाधिकारी आणि श्री गजानन महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऋषिपंचमीच्या निमित्ताने मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

12 hrs ago
user_Sachin Ingale
Sachin Ingale
Local News Reporter Chikhaldara, Amravati•
12 hrs ago
90fbf4e1-9dcc-4be3-b3d9-df6ee80c809e

गजानन महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी ४० लाखांचा निधी; धारणीत विकासकामाचा शुभारंभ गजानन महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी ४० लाखांचा निधी; धारणीत विकासकामाचा शुभारंभ -धारणी (प्रतिनिधी) : ऋषिपंचमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत धारणी येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या विकासाला महत्त्वपूर्ण चालना मिळाली. मंदिराच्या सभामंडपाच्या बांधकामासाठी तब्बल ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाचे भूमिपूजन आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते धार्मिक वातावरणात पार पडले. यावेळी आमदार काळे यांनी श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन भाविकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात सभामंडपाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सव, भजन-कीर्तन तसेच सामाजिक उपक्रमांसाठी भाविकांना प्रशस्त जागा

46227103-363b-47c9-a44b-33d7084fd60b

मिळणार आहे. त्यामुळे मंदिराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडून परिसराच्या विकासालाही गती मिळणार आहे. धारणी परिसरातील श्रद्धास्थळांच्या विकासासोबतच भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मंजूर निधीतून होणाऱ्या सभामंडपाच्या कामामुळे भाविकांची गैरसोय दूर होऊन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, कमल मालवीय, अनिल मालवीय, सचिन कडू, पंकज माकोडे, श्याम गंगराळे, राजा पाटील, नगरसेवक, विविध पदाधिकारी आणि श्री गजानन महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऋषिपंचमीच्या निमित्ताने मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गोडावूनमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणारे चार जण ताब्यात; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
    1
    गोडावूनमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणारे चार जण ताब्यात; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे : जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल
जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल
प्रतिनिधी : संतोष वाघमारे
धामणगांव रेल्वे :
जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    12 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    3
    बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!
    1
    बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh [14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं? नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं। [14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई
    1
    दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh 
[14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं?
नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं।
[14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • नवनीत राणा यांच्या ‘गंगा सावित्री निवासस्थानी’ बाप्पाचे आगमन सुख-समृद्धीसाठी लाडक्या विघ्नहर्त्याचरणी प्रार्थना
    1
    नवनीत राणा यांच्या ‘गंगा सावित्री निवासस्थानी’ बाप्पाचे आगमन
सुख-समृद्धीसाठी लाडक्या विघ्नहर्त्याचरणी प्रार्थना
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या :- संभाजी ब्रिगेड सद्ध्याच्या परिस्थितीत पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून, तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. सध्या मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील शेतीची परिस्थिती अत्यंत भयावह असून कोरडा दुष्काळसदृश बनली आहे. तरी मुख्यमंत्री यांनी वरील विभागातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, विविध पतपुरवठा संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पाऊस न झाल्याने या शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू कराव्यात : विशेषतः बुलढाणा जिल्हा जो कोरडा दुष्काळ यादीतून वगळला आहे तो तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून घोषित करावा.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलती द्या, तातडीची आर्थिक खरीप पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत, आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, बियाणे उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था यावर तातडीने निर्णय घ्या,शेतीच्या नुकसानीकडे लक्ष देताना कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करून दिलासा द्या, पावसाअभावी तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी टँकरने पाणीपुरवठा आणि चारा छावण्या यांचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. तरी आपण वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकरी सुरक्षित ठेवावा या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे निवेदन आज नांदूर तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.हे निवेदन संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे यांच्या आदेशानुसार व प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात व बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,शेतकरी नेते अरविंद बाठे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे,तालुका उपाध्यक्ष सचिन गणगे,वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत,विशाल इंगळे,विनायक वडोदे,रोहन मनस्कार,सुनील अंभोरे,प्रतीक धांडे,संतोष पारस्कार,ज्ञानेश्वर मनस्कार,अंबादास मनस्कार,बाळू डाबेराव,सुनील बाठे,श्रीकृष्ण गायेल,पत्रकार अमोल करुटले व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या :- संभाजी ब्रिगेड


सद्ध्याच्या परिस्थितीत पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून, तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.
सध्या मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील शेतीची परिस्थिती अत्यंत भयावह असून कोरडा दुष्काळसदृश बनली आहे. तरी मुख्यमंत्री यांनी वरील विभागातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, विविध पतपुरवठा संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पाऊस न झाल्याने या शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू कराव्यात : विशेषतः बुलढाणा जिल्हा जो कोरडा दुष्काळ यादीतून वगळला आहे तो तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून घोषित करावा.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलती द्या, तातडीची आर्थिक खरीप पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत, आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, बियाणे उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था यावर तातडीने निर्णय घ्या,शेतीच्या नुकसानीकडे लक्ष देताना कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करून दिलासा द्या, पावसाअभावी तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी टँकरने पाणीपुरवठा आणि चारा छावण्या यांचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. तरी आपण वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकरी सुरक्षित ठेवावा या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे निवेदन आज नांदूर तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.हे निवेदन संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे यांच्या आदेशानुसार व प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात व बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
यावेळी जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,शेतकरी नेते अरविंद बाठे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे,तालुका उपाध्यक्ष सचिन गणगे,वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत,विशाल इंगळे,विनायक वडोदे,रोहन मनस्कार,सुनील अंभोरे,प्रतीक धांडे,संतोष पारस्कार,ज्ञानेश्वर मनस्कार,अंबादास मनस्कार,बाळू डाबेराव,सुनील बाठे,श्रीकृष्ण गायेल,पत्रकार अमोल करुटले व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
    1
    Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
    user_Public Press (Journalist)
    Public Press (Journalist)
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी परिसरातील विहिरीत आढळल्या मृतदेह
    1
    कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी परिसरातील विहिरीत आढळल्या मृतदेह
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.