logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर.. प्रेस नोट *सिल्लोड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न* *११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ* *प्रशासनाने जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनावे; शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – आमदार अब्दुल सत्तार* सिल्लोड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा येथील स्वस्तिक लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, एकात्मिक बाल विकास, वन विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नगर परिषद आदी विविध विभागांच्या योजनांअंतर्गत सुमारे ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले लोककल्याणकारी सरकार असल्याचे सांगितले. ग्रामसभा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांची पूर्तता करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तत्त्वांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख करताना सांगितले की, महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाची उभारणी केली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व दुर्बल घटकांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांवर राज्य शासन कार्यरत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून विविध विकासात्मक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारामुळे शासनाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांग, आदिवासी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच सर्व वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांशी सुसंवाद ठेवून त्यांचे समाधान होईल अशा पद्धतीने प्रशासनाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. ------------- प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या संदर्भात बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पीक विमा हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ------------ यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोकहिताचे निर्णय घेतले जात असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना विनम्र अभिवादन केले. ---------- नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आपल्या भाषणात सिल्लोड शहरातील बेघर नागरिकांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून म्हाडा योजनेंतर्गत पाच हजार घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी प्रास्ताविकात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा तसेच निकाली काढलेल्या प्रकरणांचा आढावा सादर केला. तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड) व तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव) यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी स्वस्तिक लॉन्स परिसरात विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉलची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले व नागरिकांनी स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पुष्पगुच्छाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी मानले. ------ यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार (सिल्लोड), गटविकास अधिकारी अमोल जगताप (सोयगाव), नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार ( सोयगाव ), नायब तहसीलदार तुकाराम बनकर ,बळीराम मुंडे , संभाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (सोयगाव) प्रभाकर काळे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख (सोयगाव) धरमसिंग चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, अब्दुल आमेर अ. सत्तार, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, विश्वासराव दाभाडे, नगर परिषद शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, संदीप राऊत, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, सुरेखा शिंदे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक रउफ बागवान, अकील वसईकर, आसिफ बागवान, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फिरोज पठाण, बबलू पठाण, नूर मोहंमद कुरेशी, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संजय डमाळे, राजूमिया देशमुख, अंबादास सपकाळ, मोतीराम पाडळे, पंकज जयस्वाल आदींसह शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी तसेच विविध गावांतील आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 hrs ago
user_One day news
One day news
News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगरात भेसळीच्या दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई; ३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त, डेअरीचे परवाना निलंबित. छत्रपती संभाजीनगरात भेसळीच्या दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई; ३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त, डेअरीचे परवाना निलंबित. Anc : छत्रपती संभाजीनगर शहरात Safe Food, Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर छापा टाकून तब्बल ३ लाख १२ हजार ३८० रुपयांचे तूप, पनीर, क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले. तपासादरम्यान नॉन-फूड ग्रेड बॅरलमधील सोयाबीन तेलाचा वापर अॅनालॉग पनीर आणि गाईचे तूप तयार करण्यासाठी होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. कारवाईत २९९ किलो तूप, १९९ किलो क्रीम, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल, असा एकूण ९५० किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित डेअरी शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि श्रीराम चौक (दर्गा रोड) येथील तीन किरकोळ विक्री केंद्रांना पनीर आणि तुपाचा पुरवठा करत असल्याचेही उघड झाले. यानंतर लक्ष्मी डेअरीच्या तीन दुकानांवरही कारवाई करत ४१ किलो गाईचे तूप जप्त करण्यात आले असून त्याचे अन्न नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, अमोल दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून उत्पादन युनिट बंद करण्यात आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे, सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
    4
    छत्रपती संभाजीनगरात भेसळीच्या दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई; ३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त, डेअरीचे परवाना निलंबित. 

Anc : छत्रपती संभाजीनगर शहरात Safe Food, Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर छापा टाकून तब्बल ३ लाख १२ हजार ३८० रुपयांचे तूप, पनीर, क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले. तपासादरम्यान नॉन-फूड ग्रेड बॅरलमधील सोयाबीन तेलाचा वापर अॅनालॉग पनीर आणि गाईचे तूप तयार करण्यासाठी होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
कारवाईत २९९ किलो तूप, १९९ किलो क्रीम, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल, असा एकूण ९५० किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित डेअरी शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि श्रीराम चौक (दर्गा रोड) येथील तीन किरकोळ विक्री केंद्रांना पनीर आणि तुपाचा पुरवठा करत असल्याचेही उघड झाले.
यानंतर लक्ष्मी डेअरीच्या तीन दुकानांवरही कारवाई करत ४१ किलो गाईचे तूप जप्त करण्यात आले असून त्याचे अन्न नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, अमोल दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून उत्पादन युनिट बंद करण्यात आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे, सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त रक जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त
    1
    जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त रक
जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जालना महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पौसाचा घाण पाणी रस्त्यावर शिरले नाळ्या तुबले
    1
    जालना महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पौसाचा घाण पाणी रस्त्यावर शिरले नाळ्या तुबले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही महापालिका आयुक्त व महापौर तलेन्च कलेक्टर यसा निवेदन देवून ही वस्तीतील कामे मात्र आश्वासनावर काल झालेल्या पावसामुळे अत्यत वाईट अ ईट अशी अवस्था येथील रहिवाशाची झाली असुन नागरिक त्रसा आहे. म्हणून यावेळेस नागरिकाना प्रश्न पडला आहे कि आमच्या समस्या कोळा सोडू शकतो
    2
    भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही 
भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही महापालिका आयुक्त व महापौर तलेन्च कलेक्टर यसा निवेदन देवून ही वस्तीतील कामे मात्र आश्वासनावर काल झालेल्या पावसामुळे अत्यत वाईट अ ईट अशी अवस्था येथील रहिवाशाची झाली असुन नागरिक त्रसा आहे. म्हणून यावेळेस नागरिकाना प्रश्न पडला आहे कि आमच्या समस्या कोळा सोडू शकतो
    user_Eshwar Panchal
    Eshwar Panchal
    Painter जालना, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 15 ऑगस्टपूर्वी मुस्लिम बांधवांना हर्षवर्धन जाधव यांचे महत्त्वाचे आवाहन कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्यांच्या या संदेशाची राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू असून, नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
    1
    15 ऑगस्टपूर्वी मुस्लिम बांधवांना हर्षवर्धन जाधव यांचे महत्त्वाचे आवाहन
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्यांच्या या संदेशाची राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू असून, नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आज दिनांक 31 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना भागातील माळीपुरा परिसरात असलेल्या एकता भवनच्या जीर्ण इमारतीचे छताचे प्लास्टर सततच्या पावसामुळे वेळोवेळी कोसळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीच्या पाठीमागील भागात तसेच आजूबाजूच्या परिसरात नागरिकांची वस्ती असल्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

आज दिनांक 31 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जुना जालना भागातील माळीपुरा परिसरात असलेल्या एकता भवनच्या जीर्ण इमारतीचे छताचे प्लास्टर सततच्या पावसामुळे वेळोवेळी कोसळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीच्या पाठीमागील भागात तसेच आजूबाजूच्या परिसरात नागरिकांची वस्ती असल्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भिवंडी येथील गंगाराम वाडी येथील चार मजली इमारत कोसळून आठ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू भिवंडी येथील गंगाराम वाडी येथील चार मजली इमारत कोसळून आठ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू तसेच अनेक जण जखमी असल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
    1
    भिवंडी येथील गंगाराम वाडी येथील चार मजली इमारत कोसळून आठ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू
भिवंडी येथील गंगाराम वाडी येथील चार मजली इमारत कोसळून आठ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू तसेच अनेक जण जखमी असल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.