logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, आमगाव-देवरी-सालेकसा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जनकल्याण आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध करून देणे हा आहे. या आरोग्य महोत्सवाची सुरुवात २० जून रोजी शिलापूर येथे आयोजित महाआरोग्य नेत्र तपासणी शिबिराने झाली. याच यशस्वी मालिकेतून पुढे जात, २२ जून २०२६ रोजी कारूटोला (ता. सालेकसा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाआरोग्य रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. आरोग्यसेवेचा हा लोकहिताचा प्रवास आता पुढे सुरू राहणार असून, येत्या २४ जून २०२६ रोजी आमगाव तालुक्यातील कवडी येथे अशाच प्रकारचे भव्य आरोग्य शिबिर होणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती देताना भारतीय जनता पार्टीच्या तालुका सचिव सौ. गीता गोंडाणे यांनी सांगितले की, नेत्र तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत चष्मे दिले जात आहेत. तसेच, ज्या रुग्णांना अधिक उपचारांची गरज आहे, त्यांना नागपूर येथील दत्ता मेघे हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आणि उपचारानंतर सुरक्षितपणे घरी परत सोडण्यासाठी आमदार संजय पुराम आणि सौ. सविता संजय पुराम यांनी विशेष वाहन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला मोठा आधार मिळाला असून, आरोग्यसेवेची ही गंगा सर्व नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवल्याबद्दल सौ. गोंडाणे यांनी मोदी सरकार व आयोजकांचे आभार मानले.

1 hr ago
user_नरेश बोपचे
नरेश बोपचे
Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
1 hr ago

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, आमगाव-देवरी-सालेकसा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जनकल्याण आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध करून देणे हा आहे. या आरोग्य महोत्सवाची सुरुवात २० जून रोजी शिलापूर येथे आयोजित महाआरोग्य नेत्र तपासणी शिबिराने झाली. याच यशस्वी मालिकेतून पुढे जात, २२ जून २०२६ रोजी कारूटोला (ता. सालेकसा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाआरोग्य रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. आरोग्यसेवेचा हा लोकहिताचा प्रवास आता पुढे सुरू राहणार असून, येत्या २४ जून २०२६ रोजी आमगाव तालुक्यातील कवडी येथे अशाच प्रकारचे भव्य आरोग्य शिबिर होणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती देताना भारतीय जनता पार्टीच्या तालुका सचिव सौ. गीता गोंडाणे यांनी सांगितले की, नेत्र तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत चष्मे दिले जात आहेत. तसेच, ज्या रुग्णांना अधिक उपचारांची गरज आहे, त्यांना नागपूर येथील दत्ता मेघे हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आणि उपचारानंतर सुरक्षितपणे घरी परत सोडण्यासाठी आमदार संजय पुराम आणि सौ. सविता संजय पुराम यांनी विशेष वाहन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला मोठा आधार मिळाला असून, आरोग्यसेवेची ही गंगा सर्व नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवल्याबद्दल सौ. गोंडाणे यांनी मोदी सरकार व आयोजकांचे आभार मानले.

More news from India and nearby areas
  • मधुमेहावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी 'लो ग्लूकोज लोड डाएट' (Low Glucose Load Diet) ही एक स्मार्ट पद्धत आहे. हा आहार रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू न देण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि दिवसभर स्थिर ऊर्जा मिळते. या व्हिडिओमध्ये, योग्य प्रमाणात फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी यांचे संयोजन कसे निवडावे, जेणेकरून तुमचे जेवण चवीशी कोणतीही तडजोड न करता मधुमेहासाठी अनुकूल ठरेल, हे शिकायला मिळेल. 'लो ग्लूकोज लोड डाएट' म्हणजे काय आणि रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करणारे पदार्थ कोणते, याची माहिती तुम्हाला मिळेल. मधुमेह रिव्हर्सल कोचसोबत मोफत 1:1 आहार सल्ला घेण्यासाठी, आमच्या अधिकृत WhatsApp क्रमांक 9125734374 वर संपर्क साधा.
    2
    मधुमेहावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी 'लो ग्लूकोज लोड डाएट' (Low Glucose Load Diet) ही एक स्मार्ट पद्धत आहे. हा आहार रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू न देण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि दिवसभर स्थिर ऊर्जा मिळते.

या व्हिडिओमध्ये, योग्य प्रमाणात फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी यांचे संयोजन कसे निवडावे, जेणेकरून तुमचे जेवण चवीशी कोणतीही तडजोड न करता मधुमेहासाठी अनुकूल ठरेल, हे शिकायला मिळेल. 'लो ग्लूकोज लोड डाएट' म्हणजे काय आणि रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करणारे पदार्थ कोणते, याची माहिती तुम्हाला मिळेल.

मधुमेह रिव्हर्सल कोचसोबत मोफत 1:1 आहार सल्ला घेण्यासाठी, आमच्या अधिकृत WhatsApp क्रमांक 9125734374 वर संपर्क साधा.
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    1 hr ago
  • बिहारमधील रस्त्यांच्या दुरवस्थेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि तडे तात्पुरत्या दुरुस्तीने बुजवण्यात आल्याचे दिसत असून, नागरिक या दुरुस्तीची तुलना 'टांके घातलेल्या रस्त्याशी' करत आहेत. या प्रकारावरून विरोधकांनी केंद्र आणि राज्यातील 'डबल इंजिन सरकार'च्या विकास दाव्यांवर जोरदार टीका केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या रस्त्याची अनेकदा दुरुस्ती करूनही काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडतात, ज्यामुळे वाहनचालकांना खूप त्रास होतो आणि अपघातांचा धोकाही वाढतो. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांची अशी खराब अवस्था नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. विरोधी पक्षांनी सरकार विकासाच्या मोठ्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे सांगत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याउलट, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी संबंधित रस्त्याची दुरुस्ती लवकरच केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते बांधकामाची मागणी केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, विकासाच्या दाव्यांपेक्षा प्रत्यक्ष कामांची गुणवत्ता अधिक महत्त्वाची आहे आणि सुरक्षित व दर्जेदार रस्ते मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे.
    1
    बिहारमधील रस्त्यांच्या दुरवस्थेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि तडे तात्पुरत्या दुरुस्तीने बुजवण्यात आल्याचे दिसत असून, नागरिक या दुरुस्तीची तुलना 'टांके घातलेल्या रस्त्याशी' करत आहेत. या प्रकारावरून विरोधकांनी केंद्र आणि राज्यातील 'डबल इंजिन सरकार'च्या विकास दाव्यांवर जोरदार टीका केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, या रस्त्याची अनेकदा दुरुस्ती करूनही काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडतात, ज्यामुळे वाहनचालकांना खूप त्रास होतो आणि अपघातांचा धोकाही वाढतो. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांची अशी खराब अवस्था नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. विरोधी पक्षांनी सरकार विकासाच्या मोठ्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे सांगत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याउलट, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी संबंधित रस्त्याची दुरुस्ती लवकरच केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते बांधकामाची मागणी केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, विकासाच्या दाव्यांपेक्षा प्रत्यक्ष कामांची गुणवत्ता अधिक महत्त्वाची आहे आणि सुरक्षित व दर्जेदार रस्ते मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे.
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • औरंगाबादमधील तरुणांनी नाझिया इलाही खान यांच्या विरोधात पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल केली आहे. नाझिया इलाही खान यांच्यावर नबी-ए-पाक यांच्या सन्मानाला कथित धक्का पोहोचवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
    1
    औरंगाबादमधील तरुणांनी नाझिया इलाही खान यांच्या विरोधात पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल केली आहे. नाझिया इलाही खान यांच्यावर नबी-ए-पाक यांच्या सन्मानाला कथित धक्का पोहोचवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे जागतिक योग दिनानिमित्त आज, २१ जून रोजी सकाळी ७ वाजता स्केटिंग ग्राऊंडवर भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्ष आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी, भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि योगप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन योगाभ्यास केला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. योग केवळ एक व्यायाम नसून ते निरोगी, संतुलित आणि शिस्तबद्ध जीवनाचा आधार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात 'योग आयोग' स्थापन करण्याबाबत विधानसभेत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच राज्यात योग आयोग लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही मुनगंटीवार यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी नियमितपणे योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. या शिबिरात महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी शहराध्यक्ष डॉ. काशीनाथ सिंह, सतविंदरसिंह दारी, मुन्नासिंह ठाकूर, निलेश खरबडे, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली जोशी, अरुण वाघमारे, प्रशांत झामरे, सतीश कनकम, सारिका कनकम, ज्योती गहलोत, बेबी केशकर, शुभम रहिकवार, श्रीनिवास कंदकुरी, घनश्याम बुरडकर आणि विशाल शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे जागतिक योग दिनानिमित्त आज, २१ जून रोजी सकाळी ७ वाजता स्केटिंग ग्राऊंडवर भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्ष आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी, भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि योगप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन योगाभ्यास केला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. योग केवळ एक व्यायाम नसून ते निरोगी, संतुलित आणि शिस्तबद्ध जीवनाचा आधार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात 'योग आयोग' स्थापन करण्याबाबत विधानसभेत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच राज्यात योग आयोग लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही मुनगंटीवार यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी नियमितपणे योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. या शिबिरात महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी शहराध्यक्ष डॉ. काशीनाथ सिंह, सतविंदरसिंह दारी, मुन्नासिंह ठाकूर, निलेश खरबडे, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली जोशी, अरुण वाघमारे, प्रशांत झामरे, सतीश कनकम, सारिका कनकम, ज्योती गहलोत, बेबी केशकर, शुभम रहिकवार, श्रीनिवास कंदकुरी, घनश्याम बुरडकर आणि विशाल शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    user_Disha News
    Disha News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • वणी पोलिसांनी शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 19.27 ग्रॅम एम.डी. पावडर आणि मोबाईल फोनसह एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एका वेकोली कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, वणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गणेशपूर रोड परिसरात छापा टाकण्यात आला. या छाप्यात कौतुक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (28, रा. तेलीफैल, वणी) याच्या झडतीत 1 लाख 34 हजार 890 रुपये किमतीची 19.27 ग्रॅम एम.डी. पावडर आणि 15 हजार रुपयांचा मोबाईल फोन आढळून आला. चौकशीत मेश्रामने ही एम.डी. पावडर प्रज्योत उर्फ कॉकरोच महेश उपरे याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानुसार, दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकारातील यापूर्वी नोंद असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे, ज्यात प्रज्योत महेश उपरे (27), अविनाश विजय पाटील (42) आणि रविंद्र धनराज गुप्ता (34) यांचा समावेश आहे. यामुळे या एम.डी. रॅकेटमधील अटक आरोपींची संख्या आता चारवर पोहोचली आहे. अमली पदार्थांच्या या साखळीचा संपूर्ण तपास सुरू असून, पोलीस या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल आणि पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साजिद सय्यद, सुयोग महापुरे तसेच वणी पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
    1
    वणी पोलिसांनी शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 19.27 ग्रॅम एम.डी. पावडर आणि मोबाईल फोनसह एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एका वेकोली कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, वणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गणेशपूर रोड परिसरात छापा टाकण्यात आला. या छाप्यात कौतुक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (28, रा. तेलीफैल, वणी) याच्या झडतीत 1 लाख 34 हजार 890 रुपये किमतीची 19.27 ग्रॅम एम.डी. पावडर आणि 15 हजार रुपयांचा मोबाईल फोन आढळून आला. चौकशीत मेश्रामने ही एम.डी. पावडर प्रज्योत उर्फ कॉकरोच महेश उपरे याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानुसार, दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याच प्रकारातील यापूर्वी नोंद असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे, ज्यात प्रज्योत महेश उपरे (27), अविनाश विजय पाटील (42) आणि रविंद्र धनराज गुप्ता (34) यांचा समावेश आहे. यामुळे या एम.डी. रॅकेटमधील अटक आरोपींची संख्या आता चारवर पोहोचली आहे. अमली पदार्थांच्या या साखळीचा संपूर्ण तपास सुरू असून, पोलीस या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल आणि पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साजिद सय्यद, सुयोग महापुरे तसेच वणी पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • बंधन बँकेच्या बचत गट वसुली कर्मचाऱ्याकडून पैशांनी भरलेली बॅग लुटून ₹४८ हजार ७५० रुपयांची रोकड पळवून नेल्याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी जलद तपास करत एका आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकी आणि चोरीच्या रकमेपैकी ₹३० हजार ५०० रोख असा एकूण ₹१ लाख ५० हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक रामदास मांडवगणे (वय २४, रा. धामणगाव जुना) हे बंधन बँकेचे वसुली कर्मचारी असून, ९ जून रोजी आनंदवाडी, भारसवाडा परिसरातून भीष्णूर येथे वसुलीसाठी जात असताना लघुशंकेसाठी थांबले होते. याच वेळी दोन दुचाकींवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला होता. या घटनेनंतर तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत या बालकाने इतर आरोपींची नावे उघड केली, त्यानंतर पोलिसांनी गौरव संजय डोळस (वय २३, रा. आनंदवाडी) याला अटक केली. आरोपींकडून एमएच-२७ बीएन-९१४५ आणि एमएच-४० एएच-७१७३ क्रमांकाच्या दोन दुचाकींसह चोरीच्या रकमेपैकी ₹३०,५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी, चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र जयसिंगपुरे, निखिल काळे, अतुल अडसड आणि पोलीस कॉन्स्टेबल अंकुश वडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
    1
    बंधन बँकेच्या बचत गट वसुली कर्मचाऱ्याकडून पैशांनी भरलेली बॅग लुटून ₹४८ हजार ७५० रुपयांची रोकड पळवून नेल्याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी जलद तपास करत एका आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकी आणि चोरीच्या रकमेपैकी ₹३० हजार ५०० रोख असा एकूण ₹१ लाख ५० हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक रामदास मांडवगणे (वय २४, रा. धामणगाव जुना) हे बंधन बँकेचे वसुली कर्मचारी असून, ९ जून रोजी आनंदवाडी, भारसवाडा परिसरातून भीष्णूर येथे वसुलीसाठी जात असताना लघुशंकेसाठी थांबले होते. याच वेळी दोन दुचाकींवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला होता. या घटनेनंतर तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत या बालकाने इतर आरोपींची नावे उघड केली, त्यानंतर पोलिसांनी गौरव संजय डोळस (वय २३, रा. आनंदवाडी) याला अटक केली. आरोपींकडून एमएच-२७ बीएन-९१४५ आणि एमएच-४० एएच-७१७३ क्रमांकाच्या दोन दुचाकींसह चोरीच्या रकमेपैकी ₹३०,५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी, चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र जयसिंगपुरे, निखिल काळे, अतुल अडसड आणि पोलीस कॉन्स्टेबल अंकुश वडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
    user_राजेंद्र वामनराव खंडारे
    राजेंद्र वामनराव खंडारे
    आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • देशातील NEET, JEE, SSC, UPSC आणि RRB यांसारख्या पाच प्रमुख स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून दरवर्षी तब्बल ३.५ लाख कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रचंड आर्थिक भारामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील वाढते खासगीकरण, महागडी कोचिंग संस्कृती आणि सरकारी शिक्षणाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात व्यक्त झालेल्या मतानुसार, सरकारने सर्वांसाठी परवडणारी आणि दर्जेदार सरकारी शिक्षण व्यवस्था उभारण्यात अपेक्षित यश मिळवले नाही. परिणामी, लाखो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी खासगी कोचिंग संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे, ज्याचा मोठा आर्थिक भार पालकांवर पडत आहे. अनेक कुटुंबे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कर्ज काढून किंवा मोठ्या आर्थिक त्यागातून कोचिंगचा खर्च भागवत आहेत. मात्र, त्यानंतरही नोकरी आणि प्रवेश प्रक्रियेमधील अनिश्चितता कायम असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण वाढत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की, सरकारी शाळा, महाविद्यालये आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची गुणवत्ता वाढविणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण रोखणे ही काळाची गरज आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थी आणि पालकांवर वाढत चाललेला हा आर्थिक भार कमी करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क असून तो सर्वांसाठी सहज, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    1
    देशातील NEET, JEE, SSC, UPSC आणि RRB यांसारख्या पाच प्रमुख स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून दरवर्षी तब्बल ३.५ लाख कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रचंड आर्थिक भारामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील वाढते खासगीकरण, महागडी कोचिंग संस्कृती आणि सरकारी शिक्षणाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यासंदर्भात व्यक्त झालेल्या मतानुसार, सरकारने सर्वांसाठी परवडणारी आणि दर्जेदार सरकारी शिक्षण व्यवस्था उभारण्यात अपेक्षित यश मिळवले नाही. परिणामी, लाखो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी खासगी कोचिंग संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे, ज्याचा मोठा आर्थिक भार पालकांवर पडत आहे. अनेक कुटुंबे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कर्ज काढून किंवा मोठ्या आर्थिक त्यागातून कोचिंगचा खर्च भागवत आहेत. मात्र, त्यानंतरही नोकरी आणि प्रवेश प्रक्रियेमधील अनिश्चितता कायम असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण वाढत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की, सरकारी शाळा, महाविद्यालये आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची गुणवत्ता वाढविणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण रोखणे ही काळाची गरज आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थी आणि पालकांवर वाढत चाललेला हा आर्थिक भार कमी करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क असून तो सर्वांसाठी सहज, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • शिलफाटा येथील आचार गल्लीमध्ये ठाणे महानगरपालिका (टीएमसी) ने केलेल्या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बाधित व्यापारी आणि गाळे मालकांचा आरोप आहे की, मनपाने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या गाळ्यांवर थेट तोडफोड केली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना आपले म्हणणे मांडण्याची किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची कोणतीही संधी दिली नाही. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. आता या संपूर्ण प्रकरणी ठाणे महानगरपालिका काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
    1
    शिलफाटा येथील आचार गल्लीमध्ये ठाणे महानगरपालिका (टीएमसी) ने केलेल्या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बाधित व्यापारी आणि गाळे मालकांचा आरोप आहे की, मनपाने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या गाळ्यांवर थेट तोडफोड केली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना आपले म्हणणे मांडण्याची किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची कोणतीही संधी दिली नाही.

या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. आता या संपूर्ण प्रकरणी ठाणे महानगरपालिका काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा-आदिलाबाद मार्गावरील टोल नाक्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असलेली तब्बल ६९ हजार ५०० किलो सुपारी आणि दोन ट्रक जप्त केले आहेत. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८९ लाख २५ हजार रुपये आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला पांढरकवडा-आदिलाबाद मार्गावरून सुपारीची एक मोठी खेप पाठवली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, विभागाच्या पथकाने पांढरकवडा तपासणी नाक्यावर कडक नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान, संशयास्पद वाटणारे दोन ट्रक थांबवून त्यांची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीचा साठा आढळून आला. त्यानंतर पथकाने ट्रकमधील सुपारीची आणि वाहतुकीच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली. मात्र, दोन्ही ट्रकचालकांकडे कुठलीही वैध कागदपत्रे आढळून न आल्यामुळे, अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन ट्रकसह ८९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध विभागाचे अधिकारी अमित उपलाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, ज्यात अधिकारी नरवाडे आणि जगदीश कापसे यांचा सहभाग होता.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा-आदिलाबाद मार्गावरील टोल नाक्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असलेली तब्बल ६९ हजार ५०० किलो सुपारी आणि दोन ट्रक जप्त केले आहेत. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८९ लाख २५ हजार रुपये आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाला पांढरकवडा-आदिलाबाद मार्गावरून सुपारीची एक मोठी खेप पाठवली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, विभागाच्या पथकाने पांढरकवडा तपासणी नाक्यावर कडक नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान, संशयास्पद वाटणारे दोन ट्रक थांबवून त्यांची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीचा साठा आढळून आला. त्यानंतर पथकाने ट्रकमधील सुपारीची आणि वाहतुकीच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली.

मात्र, दोन्ही ट्रकचालकांकडे कुठलीही वैध कागदपत्रे आढळून न आल्यामुळे, अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन ट्रकसह ८९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध विभागाचे अधिकारी अमित उपलाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, ज्यात अधिकारी नरवाडे आणि जगदीश कापसे यांचा सहभाग होता.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.