धावत्या मेल-एक्स्प्रेसमधील दागिने चोरणारी जोडगोळी गजाआड; कल्याण लोहमार्ग पोलिसांची धडक कारवाई कल्याण : धावत्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवेश करून महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या एका सराईत जोडगोळीला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या 'ओल्या पार्टी'दरम्यान बेसावध असलेल्या या चोरट्यांवर पोलिसांनी अचानक झडप घालून त्यांना बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दीपक चव्हाण आणि भोला चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या एका चोरीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दोन्ही चोरांच्या हालचाली रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या होत्या. या फुटेजच्या आधारे लोहमार्ग गुन्हे शाखेने ₹ कसून शोधमोहीम सुरू केली होती. चोरीच्या पैशातून मौजमजा करण्यासाठी हे दोन्ही संशयित कल्याण रेल्वे स्थानकासमोरील एका नामांकित हॉटेलमध्ये पार्टी करणार असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली. या माहितीची खात्री पटताच पोलिसांच्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा रचला. आरोपी हॉटेलमध्ये बेसावधपणे दारूच्या पार्टीत मग्न असतानाच पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोघांनी पोलिसी खाक्या दाखवताच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या जोडगोळीने यापूर्वी लांब पल्ल्याच्या कोणत्या मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांमध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत, तसेच त्यांच्याकडून चोरीचा आणखी किती मुद्देमाल हस्तगत होतो, याचा सखोल तपास कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून सुरू आहे. या चौकशीतून रेल्वे प्रवाशांवरील गुन्ह्यांची आणखी अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- मुम्ब्रा में मौत का ब्रेकर,कौन होगा जिम्मेदार ? || Islamuddin Khan मुम्ब्रा में मौत का ब्रेकर,कौन होगा जिम्मेदार ? || Islamuddin Khan1
- रक्षाबंधन के मौके पर वरिष्ठ नगरसेवक राजन किने का सुंदर संदेश रक्षाबंधन के मौके पर वरिष्ठ नगरसेवक राजन किने का सुंदर संदेश1
- मुंब्रा पुलिस स्टेशन में मनाया गया रक्षाबंधन, महिलाओं ने पुलिसकर्मियों को बांधी राखी मुंब्रा पुलिस स्टेशन में मनाया गया रक्षाबंधन, महिलाओं ने पुलिसकर्मियों को बांधी राखी1
- ब्रेकिंग न्यूज़: हिस्ट्रीशीटर ओंकार भोसले ठाणे क्राइम ब्रांच की एंटी-एक्सटॉर्शन सेल में लाया गया!...1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठी सीखने के लिए 1 साल का समय दिया कोई कार्रवाई नहीं होगी BNN NEWS मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठी सीखने के लिए 1 साल का समय दिया कोई कार्रवाई नहीं होगी BNN NEWS1
- मुंब्रा में बड़े उत्साह और धूमधाम से मनाया गया जशने ईद मीलादुन्नबी, पूरा शहर उतरा सड़कों पर।1
- ब्राइट लाइन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट'च्या "१९० स्वप्ने... 'ब्राइट लाइन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट'च्या "१९० स्वप्ने... एक मिशन" या प्रवासाचे साक्षीदार बना. प्रत्येक मुलाचे एक स्वप्न असते, पण प्रत्येक मुलाला ते पूर्ण करण्याची संधी मिळत नाही. ज्या मुलांना याची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, शालेय शुल्कासाठी मदत करण्यासाठी आणि त्यांना पुस्तके पुरवण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. शिक्षणाला पाठिंबा द्या, उज्ज्वल भविष्याला साथ द्या!1
- जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा Mumbai Bulletin News जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा Mumbai Bulletin News1