खाकीतील माणुसकीचे दर्शन! ३० फूट खोल विहिरीत उतरून पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण खाकीतील माणुसकीचे दर्शन! ३० फूट खोल विहिरीत उतरून पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण अंबाजोगाई प्रतिनिधी चित्रपटांमध्ये पोलीस नेहमी घटना घडून गेल्यावर पोहोचतात, अशी प्रतिमा वारंवार रंगवली जाते. मात्र, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिसांनी आपल्या प्राणाची बाजी लावत या प्रतिमेला छेद दिला आहे. काळोख्या रात्री ३० फूट खोल विहिरीत उतरून एका महिलेला मृत्यूच्या दारातून बाहेर काढत पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांगवडगाव (ता. केज) येथील अनिता पवार या महिलेचा तिच्या पतीसोबत किरकोळ वाद झाला होता. या वादातून संतापाच्या भरात अनिता यांनी गावातील शिवारात असलेल्या एका ३० फूट खोल विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांना तातडीने बचाव कार्यासाठी रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत गायकवाड, स्वप्निल शिनगारे, सिद्धेश्वर शिंदे, करवले आणि यादव हे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. रात्रीची वेळ असल्याने विहिरीत प्रचंड अंधार होता आणि पाण्याचा अंदाज येत नव्हता. मात्र, महिलेचे प्राण वाचवणे प्राधान्य असल्याने उपनिरीक्षक मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत गायकवाड आणि स्वप्निल शिनगारे हे स्वतःचा जीव धोक्यात घालून दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरले. ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत शिताफीने त्यांनी अनिता पवार यांना सुखरूप बाहेर काढले. एकडे पोलीस जीवाचे रान करून महिलेला वाचवत असतानाच दुसरीकडे एक धक्कादायक बाब समोर आली. अनिता यांनी विहिरीत उडी मारल्यानंतर त्या जिवंत असल्याचे पाहून, त्यांचा पती विहिरीच्या बाहेरून त्यांच्यावर दगड फेकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता. सुदैवाने, कोणताही मोठा दगड त्यांच्या डोक्याला किंवा वर्मी न लागल्याने त्या बचावल्या. विहिरीबाहेर काढल्यानंतर अनिता पवार यांना जीवदान मिळाले असले तरी, त्यांनी आपल्या पतीविरुद्ध कोणतीही कायदेशीर तक्रार देण्यास नकार दिला आहे. पतीकडून जीव घेण्याचा प्रयत्न होत असताना आणि मृत्यू समोर दिसत असताना, देवदूतासारख्या धावून आलेल्या पोलिसांच्या या कामगिरीचे संपूर्ण बीड जिल्ह्यात कौतुक होत आहे. कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि धाडसामुळे एका कुटुंबाचा आधार वाचल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

- Post by अशोक दगडू वाघमारे1
- उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील रहदारी झाली कमी..1
- लातूर - MIDC, मध्ये अतुल. मेटलच्या साईडला असलेल्या अल्म्युनियम भांडे बनविणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला आग...अग्निशमन दल पोहचले1
- सामाजिक बांधिलकी जपत आश्वजीत अनिल गायकवाड यांच्या सेवाकुंड संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शेकडो लिटर ताक आणि पाणी बॉटल्स चे वाटप करण्यात आले1
- Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...1
- नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती1
- महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद1
- Post by अशोक दगडू वाघमारे1