logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे शहर पोलिसांच्या चंदननगर तपास पथकाने रस्त्यावरून गाडी नीट चालवण्यास सांगितल्याच्या रागातून एका व्यक्तीला गंभीर मारहाण करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्कुटी आणि चोरीला गेलेला मोबाईल असा एकूण ३८,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना ०९/०६/२०२६ रोजी चंदननगर येथील बोराटे वस्तीतील लेन नंबर ०२ मधील वेलकम किराणा स्टोअर्ससमोर घडली. फिर्यादी यांचे पती भारत गॅसचा सिलेंडर घेण्यासाठी गेले असता, एका काळ्या रंगाच्या स्कुटीवरून (क्रमांक ८०९३) जात असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींपैकी (दोन मुले आणि एक मुलगी) स्कुटीचा त्यांना धक्का लागला. त्यांनी गाडी नीट चालवण्याबाबत टोकले असता, याचा राग येऊन गाडीवरील दोन अनोळखी मुलांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. एवढेच नाही तर, त्यांच्या जवळील ८,००० रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून तेथून फरार झाले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११९ (२), ११७ (२), ३(५) अन्वये गुन्हा (गु. र. नं. २८७/२०२६) दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या चौकांमधील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. यामध्ये गुन्ह्यात वापरलेल्या एम. एच. १२ एफ. एस. ८०९३ या स्कुटीचा पूर्ण क्रमांक निष्पन्न झाला. गाडीच्या नंबरवरून केलेल्या पुढील तपासात, हा गुन्हा गाडी मालकाच्या मुलाने आणि त्याच्या मित्राने केल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अनिश संदीप सावंत (वय २० वर्षे, रा. वडगावशेरी, पुणे) आणि वेदांत विजय देशमुख (वय २१ वर्षे, रा. वाघोली, पुणे) या दोन आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्कुटी आणि जबरदस्तीने काढून घेतलेला मोबाईल असा एकूण ३८,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गणेश जगदाळे या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली. यामध्ये मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील; मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०७, पुणे शहर डॉ. प्रशांत अमृतकर; मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खराडी विभाग श्रीमती नुतन पवार; वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे श्रीमती अश्विनी जगताप; आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमोल धस यांचा समावेश होता. तपास पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गणेश जगदाळे यांच्यासह कर्मचारी रमेश मेमाने, अमरसिंग डांगे, विकास कदम, रामदास घावटे, किरण घुटे, ज्ञानोबा लहाणे, चंद्रकांत पाटील आणि सुशील बेंद्रे यांनी मोलाचे योगदान दिले.

11 hrs ago
user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
11 hrs ago
44dcb933-1f3c-4c22-9307-c86bf9d1611c

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुण्यातील बिबवेवाडी येथे अनिकेत सोसायटीजवळ PMPML बसचा एक्सल तुटून त्याचे चाक बाहेर आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे PMPML प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतप्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून बसकडे लक्ष दिले जात नसल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. प्रवाशांना चांगली सुविधा आणि योग्य सेवा का मिळत नाही, तसेच त्यांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर या प्रकारामुळे प्रवाशांना काही दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    1
    पुण्यातील बिबवेवाडी येथे अनिकेत सोसायटीजवळ PMPML बसचा एक्सल तुटून त्याचे चाक बाहेर आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे PMPML प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतप्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून बसकडे लक्ष दिले जात नसल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. प्रवाशांना चांगली सुविधा आणि योग्य सेवा का मिळत नाही, तसेच त्यांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर या प्रकारामुळे प्रवाशांना काही दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    user_Vibhav Salkar
    Vibhav Salkar
    City Star पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पुणे कमिशनर ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टी आणि राष्ट्रीय दलित अंतर सेनेने संयुक्तपणे ही धडक कारवाई करत अवैध दारूविक्रीचा अड्डा उघडकीस आणला.
    1
    पुणे कमिशनर ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टी आणि राष्ट्रीय दलित अंतर सेनेने संयुक्तपणे ही धडक कारवाई करत अवैध दारूविक्रीचा अड्डा उघडकीस आणला.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूरोडजवळच्या प्रसिद्ध घोरवडेश्वर डोंगरावर आज दिवसाढवळ्या एका पट्टेदार तरसाचे दर्शन झाले. काही पर्यटकांनी या वन्यप्राण्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये यशस्वीरित्या कैद केला असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. घोरवडेश्वर डोंगर हा ट्रेकर्स आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असलेला परिसर आहे. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या तरस दिसल्याने कुतूहलासोबतच नागरिकांमध्ये चिंतेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, एकटे फिरणे टाळण्याचे आणि वन्यजीवांना कोणत्याही प्रकारे त्रास न देण्याचे आवाहन केले आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूरोडजवळच्या प्रसिद्ध घोरवडेश्वर डोंगरावर आज दिवसाढवळ्या एका पट्टेदार तरसाचे दर्शन झाले. काही पर्यटकांनी या वन्यप्राण्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये यशस्वीरित्या कैद केला असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घोरवडेश्वर डोंगर हा ट्रेकर्स आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असलेला परिसर आहे. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या तरस दिसल्याने कुतूहलासोबतच नागरिकांमध्ये चिंतेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, एकटे फिरणे टाळण्याचे आणि वन्यजीवांना कोणत्याही प्रकारे त्रास न देण्याचे आवाहन केले आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • मारुती जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रभाग ११ मध्ये प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
    1
    मारुती जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रभाग ११ मध्ये प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नाशिक विधान परिषद निवडणुकीतील विजयी अपक्ष आमदार गोपाळ गिते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. ते एका विशेष खासगी विमानाने प्रवास करत असून, उद्योग मंत्री उदय सामंत हे या भेटीमध्ये मध्यस्थी करत आहेत. विशेष म्हणजे, गोपाळ गिते यांनी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. असे असूनही, पक्षाच्या उमेदवाराला हरवणाऱ्या याच अपक्ष उमेदवारासाठी शिवसेनेकडून पायघड्या घालण्यात आल्या आहेत, असे या वृत्तातून समोर आले आहे.
    1
    नाशिक विधान परिषद निवडणुकीतील विजयी अपक्ष आमदार गोपाळ गिते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. ते एका विशेष खासगी विमानाने प्रवास करत असून, उद्योग मंत्री उदय सामंत हे या भेटीमध्ये मध्यस्थी करत आहेत.

विशेष म्हणजे, गोपाळ गिते यांनी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. असे असूनही, पक्षाच्या उमेदवाराला हरवणाऱ्या याच अपक्ष उमेदवारासाठी शिवसेनेकडून पायघड्या घालण्यात आल्या आहेत, असे या वृत्तातून समोर आले आहे.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, १८ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    1
    परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, १८ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    खेड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पिंपरी-चिंचवडमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नाशिक फाटा पुलाजवळ भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या शिवाई इलेक्ट्रिक बसने मागून येऊन दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एक दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
    1
    पिंपरी-चिंचवडमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नाशिक फाटा पुलाजवळ भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या शिवाई इलेक्ट्रिक बसने मागून येऊन दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एक दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
    user_जनता न्यूज
    जनता न्यूज
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.