खताच्या टंचाइला पर्याय म्हणून कृषी अवषेशाचा वापर शेतकऱ्यांनी करावा: रवींद्र मनोहरे भव्य कृषी मेळावा संपन्नः खताच्या टंचाइला पर्याय म्हणून कृषी अवषेशाचा वापर शेतकऱ्यांनी करावा: रवींद्र मनोहरे नागपूर : सिरकॉट, अमरावती रोड, नागपूर येथे 27 मार्च रोजी "स्पेशल प्रोजेक्ट ऑन कॉटन" अंतर्गत भव्य किसान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास कृषी क्षेत्रातील विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अरविंद वाघमारे, डायरेक्टर (DOCD), नागपूर व कृषी मंत्रालय, यांची उपस्थिती होती. याशिवाय रवींद्र मनोहरे (DSAO), नागपूर, डॉ.के.पांडीयन (वरिष्ठ शास्त्रज्ञ, GTC, CIRCOT, नागपूर), डॉ. मुख्तार शेख (वरिष्ठ शास्त्रज्ञ,, GTC, CIRCOT, नागपूर), डॉ. समीर वड्याळकर (अंकुर सीड्स, नागपूर), गोविंद वैराळे (प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, CITI CDRA, महाराष्ट्र) व संजय सत्यकार (डायरेक्टर, जीविका कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात गोविंद वैराळे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करत एचडीपीएस (High Density Planting System) कापूस तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन व उत्पन्न कसे मिळू शकते, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. समीर वड्याळकर यांनी दर्जेदार बियाण्यांची निवड, रोपांची संख्या व अंतर, खत व्यवस्थापन, कीडनाशक फवारणी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा योग्य वापर यावर मार्गदर्शन केले. तर डॉ. मुख्तार शेख यांनी कापूस जिनिंगचे महत्त्व, कापसातील आर्द्रता (मॉइश्चर), दर्जा व कंटॅमिनेशन याबाबत माहिती देत मॉइश्चर मीटरच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले. प्रगतिशील शेतकरी संजय सत्येकार यांनी एचडीपीएस तंत्रज्ञानाचा स्वतःचा अनुभव शेअर करत 2025-26 हंगामात प्रति एकर 22 किंटल उत्पादन घेतल्याचे सांगितले. ही पद्धत पारंपरिक शेतीतही फायदेशीर ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले. डॉ. के.पांडीयन, यांनी कमी होत चाललेल्या शेती क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर अधिक उत्पादन घेण्याची गरज व्यक्त केली. एचडीपीएस तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच "कस्तुरी भारत कापूस" या ब्रेडद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाचे मूल्य वाढविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सेंद्रिय कर्ब वाढविणे, सूक्ष्मजीवांची संख्या वाढविणे आणि कापसाच्या अवशेषांचा बायोचार किंवा ब्रिकेटसाठी उपयोग करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर प्रगतिशील शेतकरी व कॉटन एक्स्टेंशन व्हॉलेंटियर्स यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये महादेव गावंडे, पारशिवनी (18 किंटल/एकर), उमेश वाघमारे, काटोल (14.5 किंटल/एकर), सचिन ठाकरे, नरखेड (13) किंटल/ एकर), संदीप ढगे, भिवापूर (13 किंटल/ एकर) व विनोद शिंदे, नागपूर ग्रामीण (14 किंटल / एकर) या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल गौरव करण्यात आला. रवींद्र मनोहरे, यांनी एचडीपीएस पद्धतीचे फायदे, लांब धाग्याचा कापूस, स्मार्ट कापूस उत्पादन आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासह विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. त्यांनी सांगितले की, खताच्या टंचाइला पर्याय म्हणून कृषी अवषेशाचा वापर शेतकऱ्यांनी करावा. डॉ.अरविंद वाघमारे, यांनी भारतातील कापूस उत्पादन जागतिक तुलनेत कमी असल्याचे सांगत ते वाढविण्याची गरज अधोरेखित केली. एचडीपीएस तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकते व त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अंतर कमी करता येईल, असे त्यांनी नमूद केले. आगामी 2026 -27 साठी नवीन कृषी धोरणे व तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिनिंग प्रक्रियेपासून ब्रिकेट निर्मितीपर्यंत विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमात सहभाग घेतला, तसेच CITI CDRA चे कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युगांतर मेश्राम (प्रकल्प अधिकारी, CITI CDRA, नागपूर) यांनी केले आणि संचालन व समारोप जगदीश नेरलवार (प्रकल्प अधिकारी, CITI CDRA), यांनी आभार प्रदर्शनाने केला.

- नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार वेलतूर(शरद शहारे) वेलतूरलगतच्या प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, दररोज, बकरी, बैल, गाय-वासरांची शिकार त्याने आरंभीली आहे. वेलतूर वनपरीक्षेत्रातील वेलतूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रतापपुर रिठी गावात पोहरा गावानंतर आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्यापुर्वी पोहरा येथे एका इसमाला जखमी केले होते तर दोन दिवसांपूर्वी वेलतूरच्या प्रतापपूर शिवारात महिलेला ठार केले होते. वनपरीक्षेत्रात आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शेतकरी व शेतमजुरांसमोर शेतीची कामे करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्रत मागील आठवड्यापासून 2 ते 3 वाघांनी धुमाकूळ घातला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. गावालगतच्या परिसरात दिवसाढवळ्या शेतात चराई करीत असलेल्या जनावरांवर वाघ हल्ला करीत असल्याने पशुपालक शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. टेकेपार येथील पंकज लांजेवार यांच्या शेतातील 2 शेळ्या, पंकज शेंडे यांच्या शेतातील एक वासरू व दुधाळ गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करीत जखमी केले. आता उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी उन्हाळी व खरीप हंगामासाठी दिवसभर शेतात राबराब राबत आहेत. अशा स्थितीत परिसरात वाघाचा धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची वनविभागाला माहिती देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक व बिट वनरक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती क्षेत्र सहाय्यक यांनी माध्यमांना दिली आहे. गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे, अशा सूचनाही वनविभागामार्फत नागरिकांना दिल्या आहेत या वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. आज पुन्हा दिसली वाघाची हालचाल वाघांचा दिवसेंदिवस वाढता धुमाकूळ सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. घटनास्थळावरून सुमारे 200 ते 300 मीटर परिसरात माकडे जोरजोरात ओरडत होते. याचा अर्थ वाघ याच परिसरात थांबला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. हे सर्व वास्तविक असतानाच रूयाड गावालगत असलेल्या शेत व नाला परिसरात वाघ दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दुसरा परिसर गाठला असता वनविभागाचे काही कर्मचारी व गावकरी त्या ठिकाणी दिसून आले. वाघ याच परिसरात होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती तालूका वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार , पोलिस अधिकारी यांना दिली असता त्यांनी वनविभागाची टीम घटनास्थळी रवाना केली. वनविभाग कर्मचाऱ्यांनी परिसरात बंदुकीने आवाज करीत वाघाला परिसराबाहेर जंगलाच्या का वळवू नये असाही सवाल भयभीत परीसर वासी आता करत आहेत. मात्र, वाघ पुन्हा या परिसरातच असल्याने गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.2
- हिंगणा/ नागपूर: (दि ३० मार्च) हिंगण्यातील आय सी चौकात सोसाट्याचा वारा; वाहतूक झाली शांत1