नाशिक येथे 3 एप्रिल रोजी राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी होणार संघर्ष परिषद. परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षाताई गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे. नाशिक येथे 3 एप्रिल रोजी राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी होणार संघर्ष परिषद. परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षाताई गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे. शुरू ॲप, मराठी न्यूज. नितीन चालक. सोमवार दि. 30 मार्च 2026. नाशिक: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद आयोजित केल्याची माहिती राज्य अध्यक्ष माधव बावगे राज्य प्रधान सचिव रुकसाना मुल्ला व राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार यांनी दिली आहे. नाशिक येथील भोंदू अशोक खरात बुवाचे प्रकरण उघडकीस आले असून त्या बुवाने केलेले आर्थिक, मानसिक आणि लैंगिक शोषण चव्हाट्यावर आल्याने बुवाबाजीचे भीषण वास्तव अधोरेखित झाले असून शोषणाचे मोठे रॅकेट उघडकीस येत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या ३६ वर्षात हजारो बुवाबाबांचा पर्दाफाश केलेले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत काही भोंदूंना शिक्षा झाली आहे. यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे भोंदूबुवा उपजत आहेत. नाशिक येथील खुटवड नगरमधील सिटू भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही परिषद होईल. या परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षाताई गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे. या परिषदेत प्राचार्य डॉ नितीन शिंदे, सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त बाबासाहेब बुधवंत, मानसोपचार तज्ज्ञ डॉ जयंत ढाके, कॉ डी. एल. कराड, ॲड. रंजना गवांदे, दादा चांदणे, महा अंनिस चे राज्य अध्यक्ष माधव बावगे, महा अंनिस चे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेच्या समारोपप्रसंगी लोकप्रबोधनपर रॅलीचे आयोजन केलेले आहे. सदर रॅली हुतात्मा स्मारक येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करेल. तेथे परिषदेचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक, संपादक व महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या भाषणाने होईल. परिषदेत काही संकल्प आणि निर्धार केले जाणार आहेत. या परिषदेचे नियोजन डॉ. ठकसेन गोराणे, विनायक सावळे, कृष्णा चांदगुडे, प्रा.आशा लांडगे, अरुण घोडेराव, सुरेश बोरसे, राजेंद्र फेगडे आदी करीत असून या परिषदेसाठी राज्यभरातून तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी या परिषदेस लातूर जिल्ह्यातून अधिकाधिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, लातूर शहर अध्यक्ष बब्रवाहन गोमसाळे, रामकुमार रायवाडीकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे, प्रधानसचिव सुधीर भोसले व बळीराम बुक्तरे, राज्य कार्यवाह अनिल दरेकर, रणजीत आचार्य, बाबा हलकुडे, हनुमंत मुंडे, लातूर शहर कार्याध्यक्ष डॉ. गणेश गोमारे, शहर प्रधानसचिव ज्योती ढगे, गंगाधर गवळी, बालासाहेब जगताप, नबी शेख, प्रा. भिमराव पाटील, सचिन औरंगे, सुरज पाटील यांनी केले आहे.
नाशिक येथे 3 एप्रिल रोजी राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी होणार संघर्ष परिषद. परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षाताई गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे. नाशिक येथे 3 एप्रिल रोजी राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी होणार संघर्ष परिषद. परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षाताई गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे. शुरू ॲप, मराठी न्यूज. नितीन चालक. सोमवार दि. 30 मार्च 2026. नाशिक: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद आयोजित केल्याची माहिती राज्य अध्यक्ष माधव बावगे राज्य प्रधान सचिव रुकसाना मुल्ला व राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार यांनी दिली आहे. नाशिक येथील भोंदू अशोक खरात बुवाचे प्रकरण उघडकीस आले असून त्या बुवाने केलेले आर्थिक, मानसिक आणि लैंगिक शोषण चव्हाट्यावर आल्याने बुवाबाजीचे भीषण वास्तव अधोरेखित झाले असून शोषणाचे मोठे रॅकेट उघडकीस येत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या ३६ वर्षात हजारो बुवाबाबांचा पर्दाफाश केलेले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत काही भोंदूंना शिक्षा झाली आहे. यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे भोंदूबुवा उपजत आहेत. नाशिक येथील खुटवड नगरमधील सिटू भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही परिषद होईल. या परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षाताई गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे. या परिषदेत प्राचार्य डॉ नितीन शिंदे, सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त बाबासाहेब बुधवंत,
मानसोपचार तज्ज्ञ डॉ जयंत ढाके, कॉ डी. एल. कराड, ॲड. रंजना गवांदे, दादा चांदणे, महा अंनिस चे राज्य अध्यक्ष माधव बावगे, महा अंनिस चे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेच्या समारोपप्रसंगी लोकप्रबोधनपर रॅलीचे आयोजन केलेले आहे. सदर रॅली हुतात्मा स्मारक येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करेल. तेथे परिषदेचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक, संपादक व महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या भाषणाने होईल. परिषदेत काही संकल्प आणि निर्धार केले जाणार आहेत. या परिषदेचे नियोजन डॉ. ठकसेन गोराणे, विनायक सावळे, कृष्णा चांदगुडे, प्रा.आशा लांडगे, अरुण घोडेराव, सुरेश बोरसे, राजेंद्र फेगडे आदी करीत असून या परिषदेसाठी राज्यभरातून तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी या परिषदेस लातूर जिल्ह्यातून अधिकाधिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, लातूर शहर अध्यक्ष बब्रवाहन गोमसाळे, रामकुमार रायवाडीकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे, प्रधानसचिव सुधीर भोसले व बळीराम बुक्तरे, राज्य कार्यवाह अनिल दरेकर, रणजीत आचार्य, बाबा हलकुडे, हनुमंत मुंडे, लातूर शहर कार्याध्यक्ष डॉ. गणेश गोमारे, शहर प्रधानसचिव ज्योती ढगे, गंगाधर गवळी, बालासाहेब जगताप, नबी शेख, प्रा. भिमराव पाटील, सचिन औरंगे, सुरज पाटील यांनी केले आहे.
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.1
- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1