रेती माफियांवर ऐतिहासिक कारवाई | १७ टिप्पर जप्त | ३.५० कोटींचा मुद्देमाल ताब्यात मोहाडी तालुक्यात अवैध रेती चोरीविरोधात आजवरची सर्वात मोठी आणि एकाचवेळी झालेली ऐतिहासिक कारवाई करण्यात आली आहे. वरठी जवळील पांजरा फाट्याजवळ अवैध मार्गाने रेती वाहतूक करणाऱ्या १७ रेतीच्या टिप्परवर छापा टाकत तब्बल ३ कोटी ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरठी पोलिसांच्या मदतीने भंडारा व तुमसर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिवहन विभाग आणि जिल्हा खनिकर्म विभाग यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली आहे. भंडारा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांना रेती चोरीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने वरठी–तुमसर मार्गावर पांजरा फाट्याजवळून जात असताना रेतीने भरलेले १७ टिप्पर संशयास्पदरीत्या जाताना दिसले. एसडीओ माधुरी तिखे यांनी तत्काळ हे टिप्पर थांबवून रेती वाहतुकीच्या रॉयल्टी परवान्याबाबत विचारणा केली. मात्र तपासात १७ पैकी एकाही टिप्परकडे वैध परवाना नसल्याचे उघड झाले. कारवाईची चाहूल लागताच टिप्पर चालकांनी जवळील जय किसान राईस मिलमध्ये लपण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वरठी पोलीस, मोहाडी पोलीस, भंडारा व तुमसर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिवहन व खनिकर्म विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर जय किसान राईस मिलच्या आवारातून विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारे १७ टिप्पर ताब्यात घेण्यात आले. या टिप्परमध्ये अंदाजे १७० ब्रास अवैध रेती आढळून आली.

- भागवत सप्ताहातून समाजसेवेचा संदेश; पाचगावमध्ये १०० गरजु नागरिकांना वस्त्रदान1
- विद्यानगर में आयसर ट्रक की टक्कर से पेपर बांटने वाले की मौत, चालक फरार #Bhandara #BhandaraNews #Vidyanagar #RoadAccident #HitAndRun #TruckAccident #AisarTruck #NationalHighway #PaperBoy #InnocentLifeLost #MorningAccident #DriverAbsconding #PoliceInvestigation #JusticeForShankar #News211
- भडंगा में गूंजेंगे शायरी के सुर: सरस्वती लिल्हारे और खेमू रणागिरे के बीच होगा दुय्यम शायरी का महामुकाबला https://youtu.be/mlcoCuTxW8M प्राध्यापक डॉ. भूपेश नंदेश्वर ने क्षेत्र की कलाप्रेमी जनता से भारी संख्या में पहुंचने का किया विशेष आह्वान https://youtu.be/mlcoCuTxW8M खबर और जाहिरात के लिए संपर्क करें सत्य को जानो न्यूज़ संपादक नरेश बोपचे 86984914861
- mkrskrnte ke ladu 😍🙏 good night freind shubh ratri dosto🙏दोस्तो देने के लिए दान , लेने के लिए ज्ञान, और त्यागने के लिए अभीमान सर्वश्रेष्ठ है...✍️🥀🌹🤩💫🌟⭐✨⚡ 🌹शुभ संध्या फ्रेंड्स 🌃🌹🤩💫7
- Post by Dharam das Korram6
- Post by वीर सिंह बसंतपुर2
- Post by Pushpendra SP1