विशेष लेख लोकसंवाद २०२६* तीन पिढ्यांना जोडणारी प्रेरणादायी परंपरा पालघर जिल्ह्यातील वाणगावच्या पूर्वेला, डोंगराच्या कुशीत वसलेले चंद्रनगर. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेले हे गाव; मात्र माणुसकी, आपुलकी आणि एकजुटीच्या भावनेने सदैव गजबजलेले. याच चंद्रनगरमधील शेंडेपाड्यात २५ वर्षांपूर्वी एका छोट्याशा कल्पनेचे बीज रोवले गेले. आज त्याच बीजाचा वटवृक्ष झाला आहे. ही केवळ गणेशोत्सव मंडळाची कहाणी नाही. ही कहाणी आहे चार मित्रांच्या विचारातून सुरू झालेल्या सामाजिक चळवळीची, श्रमदानातून उभ्या राहिलेल्या मंडपाची, पाड्याच्या एकजुटीची, तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या व्यासपीठाची आणि तीन पिढ्यांना जोडणाऱ्या विश्वासाची. चार मित्र आणि एका विचाराची सुरुवात सन २००१. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आभासी जगापासून दूर असलेला तो काळ. मित्र म्हणजे एकत्र फिरणे, गप्पा मारणे आणि मौजमस्ती करणे, एवढ्यापुरतीच तरुणाई मर्यादित राहू नये, असा विचार काही तरुणांच्या मनात आकार घेत होता. विनायक भुसारा, संजय शेंडे, यशवंत डोके आणि कै. विजय भोये हे चार मित्र एकत्र आले. ‘आपण एकत्र आलो आहोत, तसेच आपले कुटुंब, मित्र आणि संपूर्ण पाडा एका धाग्यात बांधला गेला पाहिजे. पुढच्या पिढीला आपण काहीतरी चांगले देऊन गेले पाहिजे,’ या विचारातून मंडळाची संकल्पना पुढे आली. यातूनच जन्म झाला—प्रेम गंगा मित्र मंडळाचा. नावातच विचार दडला होता—प्रेमाने वाहणारी गंगा. सन २००१ मध्ये नाव निश्चित झाले; मात्र मंडळाच्या प्रत्यक्ष कार्याला २००२ मध्ये सुरुवात झाली. ‘गाव एक गणपती’पासून पाड्यातील बाप्पापर्यंत त्या काळात गावातील ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा बदलत पाड्या-पाड्यांमध्ये स्वतंत्र गणेश मंडळे आकार घेत होती. शाळेतून सुट्टी झाल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी उत्सुक असणाऱ्या चिमुकल्यांना आपल्या पाड्यातच गणरायाचे दर्शन व्हावे, सर्वांनी एकत्र यावे आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढावा, ही भावना होती. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवामागे ठेवलेल्या सामाजिक एकजुटीच्या विचाराला स्थानिक परिस्थितीशी जोडण्याचे काम या मंडळाने केले. ज्येष्ठ मंडळी आणि तरुण एकत्र आले. प्रकाश शेंडे, शंकर शेंडे, विष्णू शेंडे, कृष्णा शेंडे, रामदास भोये, अशोक शेंडे, कृष्णा भोये, भाऊ शेंडे, शांताराम शेंडे, मावजी गायकवाड, रामचंद्र दळवी यांच्यासह अनेकांनी या उपक्रमाला हातभार लावला. श्रमदानातून उभा राहिला पहिला मंडप आज ज्या जागेवर मंडळ उभे आहे, त्याच परिसरात मंडळाचे पहिले ‘ऑफिस’ एका साध्याशा झोपडीत होते. तेथेच बैठका व्हायच्या, कार्यक्रमांची आखणी व्हायची, मतभेद व्हायचे आणि तेथेच मिटायचे. पहिल्या गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली तेव्हा पैसा नव्हता; पण इच्छाशक्ती होती. कुणी जंगलातून लाकूड आणले, कुणी बांबू आणला, कुणी खिळे आणले. खांद्यावर ओंडके आणि डोक्यावर फांद्या घेऊन तरुण गावात परतले. स्वतःच्या हातांनी मंडप उभारला. कुणाची वर्गणी १० रुपये, कुणाची २० रुपये, तर कुणी ५० किंवा १०० रुपये दिले. रक्कम छोटी होती; पण त्यामागची भावना मोठी होती. आणि अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. १० सप्टेंबर २००२, मंगळवार. पुजारी कै. बच्चू जानू भुसारा यांच्या हस्ते मंडळातील पहिल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. प्रथम पूजेचा मान प्रकाश शेंडे आणि कल्पना शेंडे या दाम्पत्याला मिळाला. विशेष योगायोग म्हणजे मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षीही गणेशमूर्ती देण्याचा मान याच दाम्पत्याला मिळाला. गौरी नृत्य, तारपा नृत्य आणि ढोल नाचाच्या पारंपरिक तालावर निघालेली विसर्जन मिरवणूक या नव्या परंपरेची सुरुवात ठरली. गणपतीच्या निमित्ताने जोडले गेले समाजमन मंडळ स्थापन झाल्यानंतर गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक संवादाचे केंद्र बनला. पूर्वी घराघरांत, शेजाऱ्यांमध्ये किंवा पाड्याबाहेरील लोकांमध्ये होणारे वाद कमी होऊ लागले. व्यसनाधीनतेविरोधात वातावरण तयार झाले. एकजूट, बंधुता, समानता आणि परस्पर सहकार्याची भावना रुजत गेली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मंडळ कोण्या एका व्यक्तीचे राहिले नाही. ते संपूर्ण पाड्याचे झाले. याच सामूहिक मालकीच्या भावनेमुळे अनेक अडचणींनंतरही मंडळाची वाटचाल थांबली नाही. ज्येष्ठांकडून तरुणांकडे नेतृत्वाचा वारसा पहिल्या दहा वर्षांत विनायक भुसारा यांनी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनी मंडळाच्या उभारणीत योगदान दिले. त्यानंतर २०१३ मध्ये संजय शेंडे यांनी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. नेतृत्व बदलले; मात्र मंडळाच्या कार्याची दिशा कायम राहिली. ज्येष्ठांनी सूत्रे तरुणांकडे सोपवली आणि स्वतः मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली. तरुणांनीही हा विश्वास सार्थ ठरविला. एक गणपतीमूर्ती आणि अनेकांच्या स्वप्नांना दिशा मंडळाच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला तो दिनेश गायकवाड यांच्या शासकीय सेवेत रुजू होण्याचा. सलग पाच वर्षे गणेशमूर्ती देऊन त्यांनी मंडळासमोर सहकार्याची नवी परंपरा उभी केली. ‘वर्गणीतील संपूर्ण रक्कम उत्सवावर खर्च न करता काही रक्कम समाजोपयोगी कामांसाठी शिल्लक ठेवावी,’ या विचाराला चालना मिळाली. २००७ पासून गणेशमूर्ती वैयक्तिक देणगीच्या माध्यमातून उपलब्ध होण्याची परंपरा सुरू झाली. त्यामुळे मंडळाकडे सामाजिक आणि विकासकामांसाठी निधी शिल्लक राहू लागला. २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळातही ही परंपरा खंडित झाली नाही. कठीण परिस्थितीतही तरुणांनी पुढाकार घेत बाप्पाची प्रतिष्ठापना केली. मंडळ झाले सामाजिक कार्याचे केंद्र काळ बदलत गेला आणि मंडळाची व्याप्ती वाढत गेली. गरीब कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय उपचारासाठी मदत, युवकांना शासकीय सेवेसाठी प्रोत्साहन, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे अशा विविध उपक्रमांना सुरुवात झाली. २०२३ मध्ये चंद्रनगर येथे प्रथमच मंडळाच्या स्वखर्चातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. तब्बल ५२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. ‘दीप महोत्सवा’तून गुणांना मिळाले व्यासपीठ सन २०२१ मध्ये ‘दीप महोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. लहान मुलांपासून विवाहित महिलांपर्यंत विविध खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येऊ लागले. मुलांना शालेय साहित्य, महिलांना साड्या व घरगुती साहित्य बक्षिसांच्या माध्यमातून देण्यात आले. शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या तरुणांचा आणि सेवेतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार करून ‘प्रगतीचा आदर्श आणि अनुभवाचा सन्मान’ अशी नवी परंपरा निर्माण झाली. आजच्या डिजिटल युगात मंडळाने तरुणाईसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. बुद्धिबळ, बॅडमिंटन, कॅरम, व्हॉलीबॉल, फुटबॉल यांसारख्या खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी म्हणून जनरल नॉलेजची पुस्तके, आवश्यक साहित्य आणि पोलीस भरतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करण्यात आले. मंडळाच्या जागेत आजही तरुण अभ्यास करताना दिसतात. पेपर सोडवणे, सराव करणे, चालू घडामोडींवर चर्चा करणे, पुढील ध्येय निश्चित करणे या सगळ्याला मंडळाने व्यासपीठ दिले. सकाळच्या धावण्यापासून रात्रीच्या अभ्यासापर्यंत नियोजन करणाऱ्या तरुण पिढीला पुढे येण्यासाठी या वातावरणाचा आधार मिळत आहे. मंडळाच्या पाऊलखुणांवर चालत शासकीय सेवेत नवी पिढी प्रेम गंगा मित्र मंडळाच्या प्रवासात एक महत्त्वाची उपलब्धी म्हणजे मंडळातील सदस्यांचे शासकीय सेवेत झालेले प्रवेश. दिपिका दळवी, प्रमोद शेंडे, रितेश शेंडे आणि दिनेश दळवी यांसारखे सदस्य शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांच्या यशाने पाड्यातील इतर युवकांनाही स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याची प्रेरणा मिळाली. ‘आपल्यातीलच एखादा मुलगा शासकीय सेवेत जाऊ शकतो, तर आपणही प्रयत्न करू शकतो,’ हा विश्वास निर्माण झाला. कमलेश भोये यांच्या नेतृत्वाखाली नवा कायापालट झाला. मंडळाच्या तिसऱ्या अध्यक्षपदाची जबाबदारी कमलेश भोये यांनी स्वीकारली. पारंपरिक अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालत मंडळाच्या विकासाला नवी दिशा देण्यात आली. ताडपत्रीच्या मंडपापासून लोखंडी अँगल आणि पत्र्याच्या कायमस्वरूपी मंडपापर्यंतचा प्रवास झाला. मंडळाची संस्था म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षागणिक नियोजन करून काही निधी शिल्लक ठेवण्याच्या पद्धतीमुळे मंडळ आर्थिकदृष्ट्याही सक्षम होत गेले. या प्रवासात अनेकांनी योगदान दिले. मात्र कै. विजय भोये यांचे योगदान मंडळाच्या इतिहासात विशेषत्वाने अधोरेखित होते. गावात कोणताही कार्यक्रम असो—तेथे उपस्थित राहून मदतीचा हात देणे, प्रत्येक कामाचे बारकाईने नियोजन करणे आणि लहान मुलांना मार्गदर्शन करणे, हा त्यांचा स्वभाव होता. क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मंडळाच्या वाटचालीतील हा आधारस्तंभ आज प्रत्यक्षात आपल्यात नसला तरी त्यांच्या कार्याची आठवण मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात जिवंत आहे. आज मंडळाची धुरा तिसऱ्या पिढीकडे आहे. दिनेश दळवी हे मंडळाचे पहिले नोंदणीकृत अध्यक्ष झाले. राहुल शेंडे, सागर भूसारा, प्रमोद शेंडे, प्रदीप शेंडे, रुपेश शेंडे, रितेश शेंडे, प्रविण शेंडे, प्रतिक भूसारा, नितेश रिंजड, भूपेश शेंडे, अनिकेत भोये, भावेश दळवी, अरविंद माळी, सागर शेंडे, सुरेश चौधरी, अजित झिरवा, नवनाथ दळवी आणि अविनाश दळवी यांसह अनेक तरुणांनी मंडळाच्या कार्याला पुढे नेले. मंडळाने साकारलेल्या एका देखाव्याची चर्चा जिल्ह्याच्या पलीकडे पोहोचली. चंद्रनगरच्या या छोट्याशा मंडळाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. एका पिढीचा वारसा दुसऱ्या पिढीने जपला कै. बच्चू भूसारा यांच्या पश्चात चंद्रकांत भूसारा यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे नेला. आज ते स्वतः पुजारी म्हणून विविध गणेश मंडळांमध्ये जाऊन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करतात. एका पिढीने सुरू केलेले कार्य पुढील पिढीने केवळ जपले नाही, तर त्याला व्यापक रूप दिले—याचे हे उदाहरण. २०३० पर्यंत मंडळाची सूत्रे चौथ्या पिढीकडे सोपविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. उदय शेंडे, प्रणय दळवी, अक्षय दळवी, अतुल शेंडे, नीरज रिंजड, आदेश शेंडे, अक्षत भूसारा, कुणाल भोये, सुशांत भूसारा, चिन्मय शेंडे, गुरु दळवी आणि योगेश दळवी यांसारखी मुले आतापासूनच मंडळाच्या कामात सहभागी होत आहेत. म्हणजेच २५ वर्षांपूर्वी लावलेले रोपटे आता केवळ वटवृक्ष झालेले नाही; तर त्याच्या सावलीत पुढील पिढीही वाढत आहे. मंडळाच्या इतिहासातील अनेक प्रसंग एकच गोष्ट सांगतात अडचणी आल्या, निधी कमी पडला, कधी मनुष्यबळ कमी पडले; पण विश्वास कमी पडला नाही. कधी मंडळाचा गणेशोत्सव होणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा पाड्यातील एखादा ज्येष्ठ म्हणायचा— ‘अरे, बाप्पा आहे ना... तो बघून घेईल!’ आणि प्रत्येक वेळी काही ना काही मार्ग निघाला. याच विश्वासातून अनेक युवकांनी आपापल्या क्षेत्रात यश मिळवले. अनेकांनी शासकीय सेवेत प्रवेश केला. अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. त्यामुळे मंडळातील बाप्पाबद्दलची श्रद्धा अधिक दृढ झाली. २५ वर्षांचा उत्सव नव्हे, २५ वर्षांच्या संस्कारांचा सोहळा सन २०२६ हे प्रेम गंगा मित्र मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष. २५ वर्षांपूर्वी चार मित्रांनी पाहिलेले स्वप्न आज तीन पिढ्यांच्या सहभागातून आकाराला आले आहे. जंगलातून लाकूड आणून पहिला मंडप उभारणारे हात आजही या प्रवासाचे साक्षीदार आहेत. त्या वेळी दहा-पन्नास रुपयांची वर्गणी देणारे हात आज समाजासाठी वेळ, श्रम आणि योगदान देत आहेत. प्रेम गंगा मित्र मंडळाचा हा प्रवास एका गणेशमूर्तीपासून सुरू झाला; पण तो माणसांना जोडण्याच्या विचारापर्यंत पोहोचला. आज येथे गणेशोत्सव आहे, सामाजिक उपक्रम आहेत, क्रीडा आहे, अभ्यास आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी आहे, रक्तदान आहे, सत्कार आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—एकमेकांसाठी उभे राहण्याची परंपरा आहे. या मंडळाची खरी ताकद इमारतीत नाही, मंडपात नाही किंवा निधीतही नाही. ती आहे ‘हे मंडळ माझे आहे’ या प्रत्येक पाडावासीयाच्या भावनेत. २५ वर्षांपूर्वी लावलेले प्रेमाचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. त्याच्या सावलीत पहिली पिढी मार्गदर्शक म्हणून उभी आहे, दुसरी पिढी कार्यकर्ता म्हणून काम करते आहे, तिसरी पिढी नेतृत्व करते आहे आणि चौथी पिढी त्या वारशाची पाऊलवाट शिकते आहे. *राहुल शोभाबाई लक्ष्मणराव भालेराव* *जिल्हा माहिती अधिकारी* *पालघर*
विशेष लेख लोकसंवाद २०२६* तीन पिढ्यांना जोडणारी प्रेरणादायी परंपरा पालघर जिल्ह्यातील वाणगावच्या पूर्वेला, डोंगराच्या कुशीत वसलेले चंद्रनगर. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेले हे गाव; मात्र माणुसकी, आपुलकी आणि एकजुटीच्या भावनेने सदैव गजबजलेले. याच चंद्रनगरमधील शेंडेपाड्यात २५ वर्षांपूर्वी एका छोट्याशा कल्पनेचे बीज रोवले गेले. आज त्याच बीजाचा वटवृक्ष झाला आहे. ही केवळ गणेशोत्सव मंडळाची कहाणी नाही. ही कहाणी आहे चार मित्रांच्या विचारातून सुरू झालेल्या सामाजिक चळवळीची, श्रमदानातून उभ्या राहिलेल्या मंडपाची, पाड्याच्या एकजुटीची, तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या व्यासपीठाची आणि तीन पिढ्यांना जोडणाऱ्या विश्वासाची. चार मित्र आणि एका विचाराची सुरुवात सन २००१. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आभासी जगापासून दूर असलेला तो काळ. मित्र म्हणजे एकत्र फिरणे, गप्पा मारणे आणि मौजमस्ती करणे, एवढ्यापुरतीच तरुणाई मर्यादित राहू नये, असा विचार काही तरुणांच्या मनात आकार घेत होता. विनायक भुसारा, संजय शेंडे, यशवंत डोके आणि कै. विजय भोये हे चार मित्र एकत्र आले. ‘आपण एकत्र आलो आहोत, तसेच आपले कुटुंब, मित्र आणि संपूर्ण पाडा एका धाग्यात बांधला गेला पाहिजे. पुढच्या पिढीला आपण काहीतरी चांगले देऊन गेले पाहिजे,’ या विचारातून मंडळाची संकल्पना पुढे आली. यातूनच जन्म झाला—प्रेम गंगा मित्र मंडळाचा. नावातच विचार दडला होता—प्रेमाने वाहणारी गंगा. सन २००१ मध्ये नाव निश्चित झाले; मात्र मंडळाच्या प्रत्यक्ष कार्याला २००२ मध्ये सुरुवात झाली. ‘गाव एक गणपती’पासून पाड्यातील बाप्पापर्यंत त्या काळात गावातील ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा बदलत पाड्या-पाड्यांमध्ये स्वतंत्र गणेश मंडळे आकार घेत होती. शाळेतून सुट्टी झाल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी उत्सुक असणाऱ्या चिमुकल्यांना आपल्या पाड्यातच गणरायाचे दर्शन व्हावे, सर्वांनी एकत्र यावे आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढावा, ही भावना होती. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवामागे ठेवलेल्या सामाजिक एकजुटीच्या विचाराला स्थानिक परिस्थितीशी जोडण्याचे काम या मंडळाने केले. ज्येष्ठ मंडळी आणि तरुण एकत्र आले. प्रकाश शेंडे, शंकर शेंडे, विष्णू शेंडे, कृष्णा शेंडे, रामदास भोये, अशोक शेंडे, कृष्णा भोये, भाऊ शेंडे, शांताराम शेंडे, मावजी गायकवाड, रामचंद्र दळवी यांच्यासह अनेकांनी या उपक्रमाला हातभार लावला. श्रमदानातून उभा राहिला पहिला मंडप आज ज्या जागेवर मंडळ उभे आहे, त्याच परिसरात मंडळाचे पहिले ‘ऑफिस’ एका साध्याशा झोपडीत होते. तेथेच बैठका व्हायच्या, कार्यक्रमांची आखणी व्हायची, मतभेद व्हायचे आणि तेथेच मिटायचे. पहिल्या गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली तेव्हा पैसा नव्हता; पण इच्छाशक्ती होती. कुणी जंगलातून लाकूड आणले, कुणी बांबू आणला, कुणी खिळे आणले. खांद्यावर ओंडके आणि डोक्यावर फांद्या घेऊन तरुण गावात परतले. स्वतःच्या हातांनी मंडप उभारला. कुणाची वर्गणी १० रुपये, कुणाची २० रुपये, तर कुणी ५० किंवा १०० रुपये दिले. रक्कम छोटी होती; पण त्यामागची भावना मोठी होती. आणि अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. १० सप्टेंबर २००२, मंगळवार. पुजारी कै. बच्चू जानू भुसारा यांच्या हस्ते मंडळातील पहिल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. प्रथम पूजेचा मान प्रकाश शेंडे आणि कल्पना शेंडे या दाम्पत्याला मिळाला. विशेष योगायोग म्हणजे मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षीही गणेशमूर्ती देण्याचा मान याच दाम्पत्याला मिळाला. गौरी नृत्य, तारपा नृत्य आणि ढोल नाचाच्या पारंपरिक तालावर निघालेली विसर्जन मिरवणूक या नव्या परंपरेची सुरुवात ठरली. गणपतीच्या निमित्ताने जोडले गेले समाजमन मंडळ स्थापन झाल्यानंतर गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक संवादाचे केंद्र बनला. पूर्वी घराघरांत, शेजाऱ्यांमध्ये किंवा पाड्याबाहेरील लोकांमध्ये होणारे वाद कमी होऊ लागले. व्यसनाधीनतेविरोधात वातावरण तयार झाले. एकजूट, बंधुता, समानता आणि परस्पर सहकार्याची भावना रुजत गेली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मंडळ कोण्या एका व्यक्तीचे राहिले नाही. ते संपूर्ण पाड्याचे झाले. याच सामूहिक मालकीच्या भावनेमुळे अनेक अडचणींनंतरही मंडळाची वाटचाल थांबली नाही. ज्येष्ठांकडून तरुणांकडे नेतृत्वाचा वारसा पहिल्या दहा वर्षांत विनायक भुसारा यांनी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनी मंडळाच्या उभारणीत योगदान दिले. त्यानंतर २०१३ मध्ये संजय शेंडे यांनी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. नेतृत्व बदलले; मात्र मंडळाच्या कार्याची दिशा कायम राहिली. ज्येष्ठांनी सूत्रे तरुणांकडे सोपवली आणि स्वतः मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली. तरुणांनीही हा विश्वास सार्थ ठरविला. एक गणपतीमूर्ती आणि अनेकांच्या स्वप्नांना दिशा मंडळाच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला तो दिनेश गायकवाड यांच्या शासकीय सेवेत रुजू होण्याचा. सलग पाच वर्षे गणेशमूर्ती देऊन त्यांनी मंडळासमोर सहकार्याची नवी परंपरा उभी केली. ‘वर्गणीतील संपूर्ण रक्कम उत्सवावर खर्च न करता काही रक्कम समाजोपयोगी कामांसाठी शिल्लक ठेवावी,’ या विचाराला चालना मिळाली. २००७ पासून गणेशमूर्ती वैयक्तिक देणगीच्या माध्यमातून उपलब्ध होण्याची परंपरा सुरू झाली. त्यामुळे मंडळाकडे सामाजिक आणि विकासकामांसाठी निधी शिल्लक राहू लागला. २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळातही ही परंपरा खंडित झाली नाही. कठीण परिस्थितीतही तरुणांनी पुढाकार घेत बाप्पाची प्रतिष्ठापना केली. मंडळ झाले सामाजिक कार्याचे केंद्र काळ बदलत गेला आणि मंडळाची व्याप्ती वाढत गेली. गरीब कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय उपचारासाठी मदत, युवकांना शासकीय सेवेसाठी प्रोत्साहन, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे अशा विविध उपक्रमांना सुरुवात झाली. २०२३ मध्ये चंद्रनगर येथे प्रथमच मंडळाच्या स्वखर्चातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. तब्बल ५२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. ‘दीप महोत्सवा’तून गुणांना मिळाले व्यासपीठ सन २०२१ मध्ये ‘दीप महोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. लहान मुलांपासून विवाहित महिलांपर्यंत विविध खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येऊ लागले. मुलांना शालेय साहित्य, महिलांना
साड्या व घरगुती साहित्य बक्षिसांच्या माध्यमातून देण्यात आले. शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या तरुणांचा आणि सेवेतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार करून ‘प्रगतीचा आदर्श आणि अनुभवाचा सन्मान’ अशी नवी परंपरा निर्माण झाली. आजच्या डिजिटल युगात मंडळाने तरुणाईसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. बुद्धिबळ, बॅडमिंटन, कॅरम, व्हॉलीबॉल, फुटबॉल यांसारख्या खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी म्हणून जनरल नॉलेजची पुस्तके, आवश्यक साहित्य आणि पोलीस भरतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करण्यात आले. मंडळाच्या जागेत आजही तरुण अभ्यास करताना दिसतात. पेपर सोडवणे, सराव करणे, चालू घडामोडींवर चर्चा करणे, पुढील ध्येय निश्चित करणे या सगळ्याला मंडळाने व्यासपीठ दिले. सकाळच्या धावण्यापासून रात्रीच्या अभ्यासापर्यंत नियोजन करणाऱ्या तरुण पिढीला पुढे येण्यासाठी या वातावरणाचा आधार मिळत आहे. मंडळाच्या पाऊलखुणांवर चालत शासकीय सेवेत नवी पिढी प्रेम गंगा मित्र मंडळाच्या प्रवासात एक महत्त्वाची उपलब्धी म्हणजे मंडळातील सदस्यांचे शासकीय सेवेत झालेले प्रवेश. दिपिका दळवी, प्रमोद शेंडे, रितेश शेंडे आणि दिनेश दळवी यांसारखे सदस्य शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांच्या यशाने पाड्यातील इतर युवकांनाही स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याची प्रेरणा मिळाली. ‘आपल्यातीलच एखादा मुलगा शासकीय सेवेत जाऊ शकतो, तर आपणही प्रयत्न करू शकतो,’ हा विश्वास निर्माण झाला. कमलेश भोये यांच्या नेतृत्वाखाली नवा कायापालट झाला. मंडळाच्या तिसऱ्या अध्यक्षपदाची जबाबदारी कमलेश भोये यांनी स्वीकारली. पारंपरिक अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालत मंडळाच्या विकासाला नवी दिशा देण्यात आली. ताडपत्रीच्या मंडपापासून लोखंडी अँगल आणि पत्र्याच्या कायमस्वरूपी मंडपापर्यंतचा प्रवास झाला. मंडळाची संस्था म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षागणिक नियोजन करून काही निधी शिल्लक ठेवण्याच्या पद्धतीमुळे मंडळ आर्थिकदृष्ट्याही सक्षम होत गेले. या प्रवासात अनेकांनी योगदान दिले. मात्र कै. विजय भोये यांचे योगदान मंडळाच्या इतिहासात विशेषत्वाने अधोरेखित होते. गावात कोणताही कार्यक्रम असो—तेथे उपस्थित राहून मदतीचा हात देणे, प्रत्येक कामाचे बारकाईने नियोजन करणे आणि लहान मुलांना मार्गदर्शन करणे, हा त्यांचा स्वभाव होता. क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मंडळाच्या वाटचालीतील हा आधारस्तंभ आज प्रत्यक्षात आपल्यात नसला तरी त्यांच्या कार्याची आठवण मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात जिवंत आहे. आज मंडळाची धुरा तिसऱ्या पिढीकडे आहे. दिनेश दळवी हे मंडळाचे पहिले नोंदणीकृत अध्यक्ष झाले. राहुल शेंडे, सागर भूसारा, प्रमोद शेंडे, प्रदीप शेंडे, रुपेश शेंडे, रितेश शेंडे, प्रविण शेंडे, प्रतिक भूसारा, नितेश रिंजड, भूपेश शेंडे, अनिकेत भोये, भावेश दळवी, अरविंद माळी, सागर शेंडे, सुरेश चौधरी, अजित झिरवा, नवनाथ दळवी आणि अविनाश दळवी यांसह अनेक तरुणांनी मंडळाच्या कार्याला पुढे नेले. मंडळाने साकारलेल्या एका देखाव्याची चर्चा जिल्ह्याच्या पलीकडे पोहोचली. चंद्रनगरच्या या छोट्याशा मंडळाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. एका पिढीचा वारसा दुसऱ्या पिढीने जपला कै. बच्चू भूसारा यांच्या पश्चात चंद्रकांत भूसारा यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे नेला. आज ते स्वतः पुजारी म्हणून विविध गणेश मंडळांमध्ये जाऊन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करतात. एका पिढीने सुरू केलेले कार्य पुढील पिढीने केवळ जपले नाही, तर त्याला व्यापक रूप दिले—याचे हे उदाहरण. २०३० पर्यंत मंडळाची सूत्रे चौथ्या पिढीकडे सोपविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. उदय शेंडे, प्रणय दळवी, अक्षय दळवी, अतुल शेंडे, नीरज रिंजड, आदेश शेंडे, अक्षत भूसारा, कुणाल भोये, सुशांत भूसारा, चिन्मय शेंडे, गुरु दळवी आणि योगेश दळवी यांसारखी मुले आतापासूनच मंडळाच्या कामात सहभागी होत आहेत. म्हणजेच २५ वर्षांपूर्वी लावलेले रोपटे आता केवळ वटवृक्ष झालेले नाही; तर त्याच्या सावलीत पुढील पिढीही वाढत आहे. मंडळाच्या इतिहासातील अनेक प्रसंग एकच गोष्ट सांगतात अडचणी आल्या, निधी कमी पडला, कधी मनुष्यबळ कमी पडले; पण विश्वास कमी पडला नाही. कधी मंडळाचा गणेशोत्सव होणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा पाड्यातील एखादा ज्येष्ठ म्हणायचा— ‘अरे, बाप्पा आहे ना... तो बघून घेईल!’ आणि प्रत्येक वेळी काही ना काही मार्ग निघाला. याच विश्वासातून अनेक युवकांनी आपापल्या क्षेत्रात यश मिळवले. अनेकांनी शासकीय सेवेत प्रवेश केला. अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. त्यामुळे मंडळातील बाप्पाबद्दलची श्रद्धा अधिक दृढ झाली. २५ वर्षांचा उत्सव नव्हे, २५ वर्षांच्या संस्कारांचा सोहळा सन २०२६ हे प्रेम गंगा मित्र मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष. २५ वर्षांपूर्वी चार मित्रांनी पाहिलेले स्वप्न आज तीन पिढ्यांच्या सहभागातून आकाराला आले आहे. जंगलातून लाकूड आणून पहिला मंडप उभारणारे हात आजही या प्रवासाचे साक्षीदार आहेत. त्या वेळी दहा-पन्नास रुपयांची वर्गणी देणारे हात आज समाजासाठी वेळ, श्रम आणि योगदान देत आहेत. प्रेम गंगा मित्र मंडळाचा हा प्रवास एका गणेशमूर्तीपासून सुरू झाला; पण तो माणसांना जोडण्याच्या विचारापर्यंत पोहोचला. आज येथे गणेशोत्सव आहे, सामाजिक उपक्रम आहेत, क्रीडा आहे, अभ्यास आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी आहे, रक्तदान आहे, सत्कार आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—एकमेकांसाठी उभे राहण्याची परंपरा आहे. या मंडळाची खरी ताकद इमारतीत नाही, मंडपात नाही किंवा निधीतही नाही. ती आहे ‘हे मंडळ माझे आहे’ या प्रत्येक पाडावासीयाच्या भावनेत. २५ वर्षांपूर्वी लावलेले प्रेमाचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. त्याच्या सावलीत पहिली पिढी मार्गदर्शक म्हणून उभी आहे, दुसरी पिढी कार्यकर्ता म्हणून काम करते आहे, तिसरी पिढी नेतृत्व करते आहे आणि चौथी पिढी त्या वारशाची पाऊलवाट शिकते आहे. *राहुल शोभाबाई लक्ष्मणराव भालेराव* *जिल्हा माहिती अधिकारी* *पालघर*
- देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा तालिबान करायचा ठरवले आहे का? सुप्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांना पुण्यात गावगुंडांकडून रोखले जाते, धमकावले जाते आणि लुटण्याचा प्रयत्न केला जातो. ही घटना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायदा-सुव्यवस्थेवरील अपयशाचे उदाहरण आहे. अभिनेत्री असलेली महिला आज महाराष्ट्रात सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य महिला कशी सुरक्षित असेल? हा तार्किक प्रश्न निर्माण होतो. पुणे शहर आणि परिसरात दररोज किमान एक तरी अशी घटना घडते, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. फडणवीस स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी जितका प्रयत्न करतात, तितकाच प्रयत्न नागरिकांच्या सुरक्षेसाठी का करत नाहीत? हा सर्वसामान्य पुणेकरांचा आणि एकूणच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने काँग्रेस पक्षाचा सवाल आहे. फडणवीस, तुम्हाला जमत असेल तर खुर्ची खाली करा आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्या!1
- भिवंडी में नशे के कारोबार पर पुलिस का बड़ा वार! भिवंडी में पुलिस की कार्रवाई के दौरान 20.960 किलो गांजा बरामद किए जाने की खबर सामने आई है। कार्रवाई में एक आरोपी को हिरासत में लिया गया है। मामले में पुलिस द्वारा आगे की जांच की जा रही है। आखिर नशे का यह नेटवर्क कहां तक फैला है? पूरी खबर के लिए वीडियो देखें और जुड़े रहें Times of Reporting News के साथ। 📰 #Bhiwandi #भिवंडी #BhiwandiNews #CrimeNews #PoliceAction #Ganja #DrugBust #NDPS #CrimeNewsIndia #MumbaiNews #ThaneNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #ViralNews #MaharashtraNews #TimesOfReportingNews #InstagramNews #FacebookNews #Reels #ViralReels भिवंडी में नशे के कारोबार पर पुलिस का बड़ा वार! भिवंडी में पुलिस की कार्रवाई के दौरान 20.960 किलो गांजा बरामद किए जाने की खबर सामने आई है। कार्रवाई में एक आरोपी को हिरासत में लिया गया है। मामले में पुलिस द्वारा आगे की जांच की जा रही है। आखिर नशे का यह नेटवर्क कहां तक फैला है? पूरी खबर के लिए वीडियो देखें और जुड़े रहें Times of Reporting News के साथ। 📰 #Bhiwandi #भिवंडी #BhiwandiNews #CrimeNews #PoliceAction #Ganja #DrugBust #NDPS #CrimeNewsIndia #MumbaiNews #ThaneNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #ViralNews #MaharashtraNews #TimesOfReportingNews #InstagramNews #FacebookNews #Reels #ViralReels1
- गोलिस्तान होटल के ठीक आगे मामूली बात पर बवाल! खानपान की दुकान के बाहर शुरू हुई मारपीट.1
- शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राजकमल चौक येथील सभास्थळाची महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या. अमरावती जिल्ह्यातील संघटन विस्ताराला नवी दिशा आणि अधिक बळ देणाऱ्या या अभियानाच्या शुभारंभासाठी जय्यत तयारी सुरू आहे.1
- अंडर-17 गर्ल्स में स्वर्ण पदक, अंडर-19 मिक्स में स्वर्ण पदक और अंडर-17 मिक्स में रजत पदक। ठाणे जिले के लिए राज्य स्तरीय मुकाबले। परभणी में मुंब्रा के बच्चों का शानदार प्रदर्शन! टग ऑफ वॉर में जीते स्वर्ण और रजत पदक, शहर का नाम किया रोशन अंडर-17 गर्ल्स में स्वर्ण पदक, अंडर-19 मिक्स में स्वर्ण पदक और अंडर-17 मिक्स में रजत पदक। ठाणे जिले के लिए राज्य स्तरीय मुकाबले। परभणी में मुंब्रा के बच्चों का शानदार प्रदर्शन! टग ऑफ वॉर में जीते स्वर्ण और रजत पदक, शहर का नाम किया रोशन1
- मुंब्रा में हॉकर्स और हॉकर्स जोन के मुद्दे पर गरमाई सियासत, टीम नजीब मूला ने कर दिया बड़ा खुलासा।1
- मालाड की ओंकार SRA बिल्डिंग बनी कचरे का ढेर, BMC प्रशासन की चुप्पी पर उठे सवाल मालाड ओंकार SRA बिल्डिंग में लोगों ने फैलाया कचरा, BMC कब लेगी एक्शन? मालाड की ओंकार SRA बिल्डिंग में लोगों द्वारा जगह-जगह कचरा फैलाने का मामला सामने आया है। सार्वजनिक जगहों पर इस तरह कचरा फेंकने से गंदगी के साथ-साथ स्वास्थ्य और स्वच्छता पर भी असर पड़ता है। अब सवाल यह है कि BMC कब इस मामले में कार्रवाई करेगी? अगर आपके इलाके में भी ऐसी समस्या है, तो हमें जानकारी और फोटो/वीडियो भेजें। #MaladNews #OmkarSRA #BMCAction #Swachhता #CivicIssue #MumbaiNews #कचरा #सफाई_अभियान #जनता_परेशान1
- डेहनोली गावात गणेशोत्सवात साकारला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेहनोलीचा देखावा "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी, येथल्या मनामनात नांदते मराठी"...... या उक्तीप्रमाणे मराठी भाषेचा महिमा आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र सध्याच्या काळात ही मराठी भाषा जी आपली मातृभाषा आहे ती मराठी आणि जिच्यामुळे आमच्या ओठावर मराठी भाषा रेंगाळायला लागली ती मराठी शाळा वाचविणे आज काळाची गरज आहे. महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती, मराठी भाषा, मराठी परंपरा टिकविण्याचा सुंदर प्रयत्न ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री डोंगराच्या खाली असलेल्या मुरबाड तालुक्यातील डेहनोली गावात सध्या गणेशोत्सवाच्या काळात पाहायला मिळत आहे. मराठी शिकूया, मराठी जगूया, मराठी जपूया या ब्रीदवाक्याखाली प्रत्येक गावपाड्याचं प्राण असलेली सुंदर- सुबक -आकर्षक अशी मराठी शाळा गणपती बाप्पाच्या आसनाला वेध घेत साकारली आहे. डेहनोली गावातील लक्ष्मण दगडू आगिवले यांच्या निवासस्थानी २९ व्या वर्षाचा घरगुती गणेशोत्सव साजरा करत असताना 'मराठी शाळा वाचवा',मराठी आपली अस्मिता या धर्तीखाली हा सुंदर देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्यामध्ये इयत्ता १ ली ते ७ वी चे जुने वर्ग, वर्गात बसलेली मुले, क्रीडांगण, जुने पारंपरिक खेळ खेळताना रमलेले विद्यार्थी, मराठी शाळेला शितल गारवा देणारे मोठे झाड, समोर साकारलेलं डेहनोली नावाचे कौलारू घरांचे सुंदर गाव, पथदिवे, शाळेत जाणारी मुले, घराकडे जाणारी मुले, झोपाळा, घसरगुंडी, कोयबा खेळ, टबू असे जुने खेळ खेळणारे विद्यार्थी, गावातला गोठा, गोठ्यातल्या म्हैसी, हंबरणाऱ्या गायी म्हैसी,आजूबाजूला हिरवीगार झाडे- झुडपे अशी सुंदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेहनोलीचा देखावा या गावात बघायला मिळतो. मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार भरत दळवी यांनी या गणेशोत्सवाला भेट देऊन या सजावटीचे कौतुक केले आणि सजावटकारांचा सत्कारही केला. या गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते दिगंबर आगिवले यांच्या संकल्पनेखाली हा सुंदर प्रबोधनात्मक देखावा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचं राज्य आहे. त्यामुळे इंग्रजी शिकताना मराठी भाषेला विसरू नका, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत हा मोलाचा संदेश या देखाव्यातून मिळतो. या देखाव्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. वैभव आगिवले, यज्ञा अगिवले , नमन आगिवले यांनी तब्बल आठवडाभर मेहनत घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेहनोली, मराठी शाळा टिकवा -वाचवा हा देखावा तयार केला आहे. एकदा या देखाव्याला आपण नक्कीच भेट द्यावी. या देखाव्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्याला digambaragivale music या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल.1