कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये वारंवार घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ३९ शासकीय आश्रमशाळा आणि २९ वसतिगृहांमध्ये हजारो आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी निवासी स्वरूपात शिक्षण घेत आहेत. मात्र, गर्भवती विद्यार्थिनी, विषबाधा आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूसारख्या अत्यंत गंभीर घटना घडूनही प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी आणि भवितव्याशी सुरू असलेल्या या जीवघेण्या खेळावर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नुकतीच मोहंदरी येथील शासकीय आश्रमशाळेतील अवघ्या १४ वर्षीय विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याची आणि तिने एका मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी कनाशी शासकीय आश्रमशाळेत दूषित अन्नामुळे तब्बल ५९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. याशिवाय चादिवासी आश्रमशाळा, गोपाळखडी येथील चौथीतील विद्यार्थिनी आणि गणोरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू अशा अनेक वेदनादायी घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे आश्रमशाळांमधील सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि प्रशासनाच्या एकूणच कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाकडून मोफत शिक्षण, निवास आणि भोजनाचे दावे केले जात असले, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप पालक आणि सामाजिक संघटना करत आहेत. केवळ चौकशी समित्या नेमून प्रकरणे दडपण्याऐवजी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रभावी महिला सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही, नियमित आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि सक्षम तक्रार निवारण व्यवस्था उभी करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे आणि संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी, अशी मागणी आदिवासी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांकडून केली जात आहे.

- नाशिक–पळसन मार्गावरील एसटी बस सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा फाटा येथे अचानक पंक्चर झाली, मात्र बसमध्ये टायर बदलण्यासाठी आवश्यक असलेला जॅकच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे तासन्तास हाल झाले. या महत्त्वाच्या साधनसामग्रीअभावी बस दुरुस्तीचे काम जागेवरच खोळंबले. परिणामी, बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत रस्त्यावरच ताटकळत राहावे लागले. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात जॅकसारखे मूलभूत साहित्यही उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून, यामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अभावामुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाया गेला नाही, तर चालक आणि वाहकालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व बसमध्ये आवश्यक साधनसामग्रीची खात्री करावी, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.1
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आज खेडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी दिंडोरी पेठचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।1
- नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी टवाळखोरांच्या विरोधात केलेल्या कडक कारवाईचे शहरभरात कौतुक होत आहे. या कारवाईनंतर आवामी विकास पार्टीचे नाशिक शहर अध्यक्ष सरफराज पठाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांची भेट घेऊन पोलिसांच्या या कामगिरीची प्रशंसा केली. या भेटीदरम्यान त्यांनी मागणी केली की, ज्याप्रमाणे टवाळखोरांच्या विरुद्ध मोहीम राबवून कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर भद्रकाली परिसरात कथित स्वरूपात सुरू असलेल्या अवैध जुगार, मटका आणि सट्ट्याच्या धंद्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. या बेकायदेशीर व्यवसायांमध्ये सहभागी असलेले चालक आणि खेळाडू यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांच्या यापुढील कारवाईकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- नाशिकच्या सातपूर परिसरातील बहुचर्चित 'गोल्ड मॅन' जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत मुख्य आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिर्यादी हे आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनात प्रवेश केला आणि धारदार चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमालही जप्त केला आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राकेश सोनार हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता. गुन्हेशाखा युनिट-२ ने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राकेश सोनार पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि त्यांनी चोहोली फाटा परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर तसेच डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.3
- येवला-मनमाड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची आणि स्थानिक नागरिकांची त्रासातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाळ्यात या रस्त्यावर निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य आता संपले असले, तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण महामार्गावर 'धुळीचे साम्राज्य' पसरले आहे. या उडणाऱ्या धुळीमुळे ये-जा करणारे प्रवासी कमालीचे हतबल झाले असून नागरिक आणि प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गाच्या अत्यंत संथ गतीने चाललेल्या कामामुळे नागरिक आधीच त्रस्त होते. पावसाळ्यात चिखलातून रस्ता काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती, तर आता चिखल सुकल्यानंतर रस्त्यावर धूलिकणांचे प्रचंड मोठे थर साचले आहेत. महामार्गावरून जड वाहने किंवा एसटी बस गेल्यास एवढी प्रचंड धूळ उडते की, मागून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना समोरील रस्ता दिसणे कठीण होते. अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या 'ब्लाइंड स्पॉट'मुळे या महामार्गावर लहान-मोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे. या धुळीचा सर्वाधिक फटका रस्त्याच्या कडेला असणारे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि स्थानिक रहिवाशांना बसत आहे. दुकानांमधील साहित्यावर धुळीचे थर साचत असल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, सतत उडणाऱ्या या धुळीमुळे लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांना श्वसनाचे आजार, खोकला आणि डोळ्यांचे विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.1
- पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि परिसरात सलग २ दिवस पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आहेत. विशेषतः ज्या भागात आधीच पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत, तिथे शेतकरी अधिक अडचणीत आले आहेत. आता पुन्हा पाऊस पडेल का, असा मोठा प्रश्न आणि संभ्रम शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाला असून अनेक ठिकाणी सध्या अशीच बिकट परिस्थिती पाहायला मिळत आहे. या संकटकाळात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शक्य असल्यास उपलब्ध पाण्याच्या मदतीने शेतात हलके सिंचन करावे. शेतातील जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत किंवा मल्चिंगचा वापर करावा. तसेच, पुढील पावसाचा अंदाज पाहूनच खतांचा वापर करावा. जर पाऊस अधिक दिवस लांबला, तर शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्यावा.1
- ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरण आणि धर्माच्या नावावर झालेल्या कथित लुटीच्या निषेधार्थ १२ जुलै २०२६ रोजी डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणातील दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदन सादर करताना पोलीस ठाण्यातील एपीआय अनिल शिनकर, एपीआय प्रशांत मोरे, हवालदार सोनार, हवालदार गीते आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या योग्य सहकार्याबद्दल अमित म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे आभार मानले. पोलिसांकडून हा अर्ज पुढील आवश्यक कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी "रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम" अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. त्यानंतर रीतसर निवेदन सादर करून दोषींवर त्वरित व कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली।2
- नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी धडाकेबाज कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला तब्बल ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी राऊ हॉटेलसमोर, आमदार चहा दुकान परिसरात सापळा रचून करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मनोज दगु गायकवाड (वय ३७) या पोलीस अंमलदाराने तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात कोंबड्यांनी भरलेले वाहन सोडून देणे, गुन्हा रद्द करणे आणि पुढील कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते. यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.1