ढाणकीकरांवर पुन्हा 'अंधारयुग' सोसण्याची वेळ; कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे नागरिक संतप्त.. वातावरणात झालेल्या बदलामुळे ढाणकी शहराला सलग दुसऱ्यांदा रात्र अंधारात काढावी लागली आहे. केवळ किरकोळ तांत्रिक बिघाड असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे संपूर्ण शहराला रात्रभर जागून काढावी लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.काल सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. दरवेळेप्रमाणे वारा सुटताच शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. वारा थांबल्यानंतर वीज येईल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र, रात्र उलटत येऊनही वीज सकाळी 4 वाजेच्या जवळ पास आली. शहरातील किरकोळ बिघाड शोधण्यासाठी केवळ चार कर्मचारी प्रयत्न करत होते, ज्यामुळे संपूर्ण शहराला रात्रभर अंधारात राहावे लागले.शहरातील वीज समस्या गंभीर होण्यामागे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे: सहायक अभियंता आणि प्रिन्सिपल टेक्निशियन हे मुख्यालयी हजर राहत नाहीत.अनेक लाईनमनना मुख्यालयात राहण्याची 'अॅलर्जी' असून, त्यांच्या या वृत्तीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे.शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. चौकट: सहायक अभियंत्यांची उद्धट वागणूक सहायक अभियंता नाखले यांना नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केला असता, त्यांनी अतिशय खालच्या भाषेत संवाद साधून ग्राहकांचा अवमान केल्याची तक्रार विद्युत ग्राहकांनी केली आहे. रात्रभर शहराला अंधारात ठेवणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आता ढाणकीतील संतप्त नागरिक करत आहेत. जर ही परिस्थिती सुधारली नाही, तर मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

- Post by Sk Chand1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Today One Live1
- Post by Karan1
- क्षितिज पुरम” की GRAND OPENING : Skyline Builders & Developers का भव्य प्रोजेक्ट लॉन्च1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Sk Chand1