‘मराठी पाऊल पडते पुढे’ संगीत सोहळ्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद; जिल्हाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती* ‘मराठी पाऊल पडते पुढे’ संगीत सोहळ्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद; जिल्हाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती बुलढाणा, दि. १८ (जिमाका) :* छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित मराठी लोककला, संस्कृतीचा वारसा, परंपरा आणि सुरांची मोहिनी अनुभवण्याची संधी देणाऱ्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या भव्य संगीत सोहळ्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराज महोत्सवानिमित्त आयोजित हा सांस्कृतिक कार्यक्रम बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागारात उत्साहात पार पडला. कार्यक्रमात मराठी भावगीत, लोकगीते, देशभक्तीपर गीते तसेच आधुनिक मराठी संगीताची बहारदार सादरीकरणे करण्यात आली. कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचा कडकडाट आणि दाद मिळत होती. या सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सपत्नीक विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत मराठी सांस्कृतिक वारसा जपण्याचे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाने मराठी अस्मितेचा जागर साजरा करत रसिकांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटविला.
‘मराठी पाऊल पडते पुढे’ संगीत सोहळ्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद; जिल्हाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती* ‘मराठी पाऊल पडते पुढे’ संगीत सोहळ्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद; जिल्हाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती बुलढाणा, दि. १८ (जिमाका) :* छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित मराठी लोककला, संस्कृतीचा वारसा, परंपरा आणि सुरांची मोहिनी अनुभवण्याची संधी देणाऱ्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या भव्य संगीत सोहळ्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांची मोठी
गर्दी उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराज महोत्सवानिमित्त आयोजित हा सांस्कृतिक कार्यक्रम बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागारात उत्साहात पार पडला. कार्यक्रमात मराठी भावगीत, लोकगीते, देशभक्तीपर गीते तसेच आधुनिक मराठी संगीताची बहारदार सादरीकरणे करण्यात आली. कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचा कडकडाट आणि दाद मिळत होती. या सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सपत्नीक विशेष उपस्थिती लावून
कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत मराठी सांस्कृतिक वारसा जपण्याचे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाने मराठी अस्मितेचा जागर साजरा करत रसिकांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटविला.
- खामगाव : स्थानिक प्रतिभेने पुन्हा एकदा सर्वांना भुरळ घातली आहे. खामगाव येथील दीपक खानचंदानी यांची कन्या राधा दीपक खानचंदानी हिने एका सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एका नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात राधाने सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे गाजलेले गाणे 'ओ मेरे सोना रे सोना रे' अतिशय सुंदर रीतीने सादर केले. राधाचा आवाज आणि तिच्या गायकीतील सहजता पाहून उपस्थितांनी तिला उभे राहून दाद दिली. राधाच्या या सादरीकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून तिच्या आवाजाचे खूप कौतुक केले जात आहे. खामगावच्या या चिमुकलीच्या प्रतिभेने संपूर्ण जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. राधाला गाण्याची उपजत आवड असून, तिची ही कला पाहून ती भविष्यात एक मोठी गायिका होऊ शकते, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत. तिचे वडील दीपक खानचंदानी यांनी देखील तिच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.1
- खामगावच्या बाळापूर फैल भागातील गणेश सोनोने आणि अशोक मुरेकर यांच्या मंडळांनी एकत्र येत एकतेचा नवा पायंडा रचला आहे. सामाजिक एकोप्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. 🛡️🤝 #ShivjayantiUtsav #UnityIsStrength #Khamgaon #ShivajiMaharajJayanti1
- सुरक्षेचा 'चक्रव्यूह' आणि प्रशासकीय सज्जता; राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज*1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Raghunath Aghao1
- Post by SamirQureash Quresh1
- खामगाव : शिवजयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या मुख्य भागातून आणि मिरवणूक मार्गावरून 'रूट मार्च' काढण्यात आला. मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शिवजयंती मिरवणुकीच्या पारंपारिक मार्गाची पायी चालत पाहणी केली. मार्गावरील संवेदनशील ठिकाणे, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणत्याही अफवांना थारा मिळू नये, हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.4
- खामगाव: हमीद चौक परिसरात दोन गटात राडा; पोलीस प्रशासन सतर्क! #Khamgaon #Buldhana1
- रोहणला हवंय हक्काचं घर; नातेवाईकांनो पुढे या बुलढाणा जिल्हा प्रशासनाचे आवाहन1