Shuru
Apke Nagar Ki App…
हापुस आम का पेड़ ( देवगड , कोंकण ) | Mango tree
Vishal Bharat jadhao
हापुस आम का पेड़ ( देवगड , कोंकण ) | Mango tree
More news from Devgad and nearby areas
- आषाढी कार्तिकी। पंढरीची वारी। करे वारकरी। नियमांत।। #वारी_एक_दिव्य_अनुभव वारीत एक वेगळाच उत्साह जाणवत असतो. हे बळ परमेश् वरच देतो. वारीत सेवेसाठी सगळे तत्पर असतात. घरी एवढी कोणी काळजी घेणार नाही एवढी वारीत काळजी घेतली जाते. असाच एक अनुभव वारीचा आम्हाला सुध्दा आला.. सुरवातीला आळंदी ते पुणे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे असे ठरले पण काहीं कारणास्तव ते जमले नाही. मन काहीं लागत नव्हते, सारखी ओढ वारीला जाण्याची. मग रविवारी दुपारी बस स्टँड वर अनिल भैय्या अग्रवाल व आम्हीं चर्चा करतं असताना वारीचा विषय निघाला आणि बघता बघता वारीला जाण्याचे नियोजन ठरले. बुधवारी 3 जुलै 2024 रोजी अजित पोरवाल, अनिल अग्रवाल, सचिन सोमाणी व आम्हीं सासवड ते जेजुरी माऊलींच्या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झालो. देवगड येथे श्री दत्त गुरूंचे दर्शन घेत मंठा येथील व्यापारी वर्ग व लखोटियाजी यांच्या मार्गदर्शनात वारीत सेवेसाठी जात असलेल्या वारकर्यांसोबत प्रसाद घेत पुढचा प्रवास सुरू केला. त्यांनी सांगितल्या प्रमाणे आळंदी येथे माउलींच्या समाधीचे दर्शन घेऊन सासवड येथे जाण्याचे ठरवले पण उशीर होत असल्यामुळे शिरूर येथुन मधातल्या मार्गे मोरगांव येथुन जेजुरी मार्गे सासवड येथे जात असताना पोलिसांनी जेजुरी पर्यंत जावू देवू पण पुढे कसे. मग काय करावे. त्यावेळी माऊली यांनीच सुपे मार्गे पर्यायी मार्ग दाखवला. रात्री 12.30 वाजता सासवड येथे पोहोचलो. एवढ्या रात्री सुध्दा माउलींच्या पालखीचे दर्शन चालू होते. रात्री 1 वाजता सुध्दा आळंदी ट्रस्टचे विश्वस्त व सर्व सेवेकरी माऊलींचे दर्शन व्यवस्थीत व्हावें म्हणुन कोणतीही तक्रार न करता सेवा करतांना पाहून मनातून खूप आनंद झाला. माउलींच्या पादुकांचे दर्शन 1.24 वाजता घेतले. हाके ताईंच्या माध्यमातून जवळचं भुमेमळा येथे जगताप ताई यांच्या मूळ गावी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती पण एवढ्या रात्री 2 वाजता त्यांच्या भावाला कसें फोन करावे. तरी जगताप काकांना फोन लावताच त्यांनी एका क्षणात फोन उचलत हायवे वर आम्हाला घेण्यासाठी आले. 2.30 वाजता आमच्या सर्वांसाठी राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या आई जगताप आजी वय साधारण 75 वर्षे असुन सुध्दा त्यांनी सर्वांसाठी गरम पाणी, डेटॉल हैंड वॉश, गरमा गरम चहा, बुंदी लाडू, बिस्कीटची व्यवस्था जिव्हाळ्याने केली1
- Devgad, Sindhudurg 8 july 20241
- Nhavankond न्हाव्हनकोंड धबधबा waterfall, तळवडे, देवगड,1
- खेकडे आणि मासे दोन्ही पकडले|टेंबवली देवगड|kokan|crab and fish catching in kokanDipeshMithbavkar1
- भास्करगिरी महाराज देवगड🙏🙏1
- Title Song | एकदा येवा तरी | देवगड एंटरटेनमेंट1
- |कोकण|भातशेती|लावणी|1
- Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी | Lokshahi Marathi1