logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*कंधारच्या 'नागदरवाडी'चा सन्मान: जलदूत हनुमंतराव केंद्रे यांचा केंद्र सरकारकडून गौरव; पोस्टाचे तिकीट प्रकाशित शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक १३ मार्च कंधार (लोहा): जिद्द, चिकाटी आणि लोकसहभागाच्या जोरावर दुष्काळी गावाला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या एका तरुणाची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आहे. नांदेड जिल्ह्याच्या कंधार-लोहा तालुक्यातील नागदरवाडी येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते श्री. हनुमंतराव केंद्रे यांच्या कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारने त्यांच्या छायाचित्रासह विशेष पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले आहे. या बहुमानामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पाणीदार चळवळीचा राष्ट्रीय स्तरावर डंका एकेकाळी पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या नागदरवाडी गावाला पाणीदार बनवण्यासाठी हनुमंतराव केंद्रे यांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांची भक्कम साथ आणि आमिर खान यांच्या 'सत्यमेव जयते' तसेच 'पाणी फाउंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी जलसंधारणाची मोठी चळवळ उभारली. त्यांच्या या कार्यामुळे केवळ गावच नाही, तर तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. कष्टाचे फळ आणि गावकरी मंडळींचा अभिमान 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' या उक्तीप्रमाणे हनुमंतराव यांनी राबवलेल्या जलजागृती मोहिमेची दखल घेत केंद्र सरकारने त्यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढले आहे. एखाद्या जिवंत व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन अशा प्रकारे तिकीट प्रकाशित होणे ही दुर्मिळ आणि अभिमानास्पद बाब मानली जात आहे. या यशाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले जात असून, हनुमंतराव केंद्रे आणि नागदरवाडीच्या समस्त ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या गौरवामुळे ग्रामीण भागातील इतर तरुणांनाही समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हनुमंतराव केंद्रे आणि त्यांच्या टीमचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल दैनिक लढणारा कलमवीर मराठी वृत्तपत्र समूहाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!

on 13 March
user_Shivkumar kale Press reporter
Shivkumar kale Press reporter
Nanded, Maharashtra•
on 13 March
187a3fb2-db10-46a1-9751-ee4ad2f46254

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    18 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बालविवाह लावणाऱ्यांसह सहभागी सर्वांवरच गुन्हे दाखल करण्यात येणार - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
    1
    बालविवाह लावणाऱ्यांसह सहभागी सर्वांवरच गुन्हे दाखल करण्यात येणार - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. “परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श
    1
    परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
“परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • 🚩 धार्मिक उत्साहाची पर्वणी – सर्वांचे आग्रहाचे निमंत्रण! 🚩 हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी दक्षिणामुखी हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या पवित्र धार्मिक कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि उत्सवाची शोभा वाढवा! सर्व भाविकांना सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण 🙏 #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona ReligiousEvent Bhakti Maharashtra Trending
    1
    🚩 धार्मिक उत्साहाची पर्वणी – सर्वांचे आग्रहाचे निमंत्रण! 🚩
हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी दक्षिणामुखी हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघणार आहे.
या पवित्र धार्मिक कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि उत्सवाची शोभा वाढवा! सर्व भाविकांना सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण 🙏
#JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona ReligiousEvent Bhakti Maharashtra Trending
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    20 hrs ago
  • मराठी शाळा वाचवा! शिक्षक सेनेचे ढोलबजाव आंदोलन
    1
    मराठी शाळा वाचवा! शिक्षक सेनेचे ढोलबजाव आंदोलन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.