तालुका पत्रकार परिषदेच्या वतीने एस.एम. देशमुख यांचा सत्कार मालेगाव ता :18 --- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार आज ता 18 रोजी मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदे तर्फे करण्यात आला पत्रकारितेच्या क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक उदगीर शहरात १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, वाशिम जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. राज्यातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी, पत्रकार संरक्षण कायद्यासाठी आणि पेन्शन योजनेसाठी सातत्याने लढा देणारे नेतृत्व म्हणून एस. एम. देशमुख यांची ओळख आहे. उदगीर येथील अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मालेगाव तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे यांनी पुढाकार घेतला. यावेळी प्रा. गाभणे यांनी देशमुख यांच्याशी संवाद साधत मालेगाव तालुक्यातील पत्रकारांच्या कार्याची माहिती दिली. तालुक्यातील पत्रकारांची लक्षणीय उपस्थिती या सत्कार सोहळ्याप्रसंगी मालेगाव तालुका पत्रकार परिषदेचे पदाधिकारी व सक्रिय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शिवकुमार घुगे अजिंक्य मेडशीकर नवाज़िश मुखतार शेखविठ्ठल भागवत कपिल भालेराव यांनी एस. एम. देशमुख यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मालेगाव येथील पत्रकारांच्या संघटन कौशल्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. उदगीर येथील या दोन दिवसीय ४४ व्या अधिवेशनात 'बदलत्या काळातील पत्रकारिता' आणि 'पत्रकारांसमोरची आव्हाने' या विषयावर राज्यभरातून आलेल्या पत्रकारांमध्ये मंथन होत आहे. या मोठ्या व्यासपीठावर मालेगाव तालुका पत्रकार परिषदेने आपली उपस्थिती नोंदवत, संघटनेची ताकद अधोरेखित केली आहे. "अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची सर्वात मोठी आणि जुनी मातृसंस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे प्रतिपादन यावेळी मा. एस. एम. देशमुख यांनी केले. या सोहळ्यामुळे वाशिम जिल्ह्यातील पत्रकार वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात तालुक्यातील पत्रकारांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी प्रा. अरविंद गाभणे यांनी व्यक्त केला.
तालुका पत्रकार परिषदेच्या वतीने एस.एम. देशमुख यांचा सत्कार मालेगाव ता :18 --- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार आज ता 18 रोजी मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदे तर्फे करण्यात आला पत्रकारितेच्या क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक उदगीर शहरात १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, वाशिम जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. राज्यातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी, पत्रकार संरक्षण कायद्यासाठी आणि पेन्शन योजनेसाठी सातत्याने लढा देणारे नेतृत्व म्हणून एस. एम. देशमुख यांची ओळख आहे. उदगीर येथील अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मालेगाव तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे यांनी पुढाकार घेतला. यावेळी प्रा. गाभणे यांनी देशमुख
यांच्याशी संवाद साधत मालेगाव तालुक्यातील पत्रकारांच्या कार्याची माहिती दिली. तालुक्यातील पत्रकारांची लक्षणीय उपस्थिती या सत्कार सोहळ्याप्रसंगी मालेगाव तालुका पत्रकार परिषदेचे पदाधिकारी व सक्रिय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शिवकुमार घुगे अजिंक्य मेडशीकर नवाज़िश मुखतार शेखविठ्ठल भागवत कपिल भालेराव यांनी एस. एम. देशमुख यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मालेगाव येथील पत्रकारांच्या संघटन कौशल्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. उदगीर येथील या दोन दिवसीय ४४ व्या अधिवेशनात 'बदलत्या काळातील पत्रकारिता' आणि 'पत्रकारांसमोरची आव्हाने' या विषयावर राज्यभरातून आलेल्या पत्रकारांमध्ये मंथन होत आहे. या मोठ्या व्यासपीठावर मालेगाव तालुका पत्रकार परिषदेने आपली उपस्थिती नोंदवत, संघटनेची ताकद अधोरेखित केली आहे. "अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची सर्वात मोठी आणि जुनी मातृसंस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे प्रतिपादन यावेळी मा. एस. एम. देशमुख यांनी केले. या सोहळ्यामुळे वाशिम जिल्ह्यातील पत्रकार वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात तालुक्यातील पत्रकारांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी प्रा. अरविंद गाभणे यांनी व्यक्त केला.
- Post by Sharad Dayedar1
- मेडशी :- अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.4
- Post by Amravati News Update1
- Post by Sachin Ganeshrao patil3
- Post by विदर्भ शासन न्यूज..1
- क्रिकेट,कबड्डी, कुस्ती ,जिम, और अन्य स्पोर्ट्स पर्सन को स्पोर्ट्स मसाज,कपिंग थेरेपी,बॉडी मसाज, ग्रॅस्टोन थेरेपी की जाती है कॉल करें डॉ.रोहित कल्याणे 7219435468 आपके घर ,रूम,होटल,ओर जिम,अखाड़ा,तालीम में जगह पर सर्विस उपलब्ध हैं कॉल करे बहुत अच्छा है और अनेक फायदे है1
- Post by Purn borse1
- Post by Amravati News Update1