logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरात अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, हॉटेलच्या स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, असून घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे.

1 hr ago
user_LokNazarNews (mukesh dhoke)
LokNazarNews (mukesh dhoke)
Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
1 hr ago

अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरात अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, हॉटेलच्या स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, असून घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे.

More news from Buldhana and nearby areas
  • आज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, 'हेचि व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास...' या संतवचनांचा जयघोष करत, टाळ-मृदंगांच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या डोलणाऱ्या सागरात, 'जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल'च्या अखंड गजरात संतनगरी शेगावातून श्री संत गजानन महाराजांची पवित्र पालखी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने मार्गस्थ झाली. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, वारकऱ्यांच्या उत्साहाने शेगाव नगरीत आध्यात्मिक ऊर्जा संचारली आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेला हा पालखी सोहळा यंदा ५७ वे वर्ष साजरा करत आहे. यामध्ये तब्बल ७०० हून अधिक वारकरी, टाळकरी, पताकाधारी आणि अश्वदल सहभागी झाले आहेत. 'गण गण गणात बोते', 'जय गजानन श्री गजानन' आणि 'जय हरी विठ्ठल'च्या अखंड नामघोषात भक्तांची पावले पंढरीच्या दिशेने पडू लागली आहेत. श्रींची पालखी पुढील ३३ दिवसांत ५७० किलोमीटरचे अंतर पायी पार करत २३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूरमध्ये २३ ते २८ जुलै या कालावधीत श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा मुक्काम राहणार असून, हजारो भाविकांना श्रींच्या दर्शनाचा लाभ मिळेल. पंढरपूरातील मुक्कामानंतर २९ जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा ५५० किलोमीटरचा मार्ग पायी पार करत, येण्या-जाण्याचा एकूण १३०० किलोमीटरचा पायी प्रवास वारकरी पूर्ण करणार आहेत. आधुनिक युगातही एवढ्या मोठ्या प्रमाणात भक्तांनी पायी वारी करणे ही संत परंपरेची आणि श्रद्धेची अद्वितीय ताकद असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. शेगावातून प्रस्थान केल्यानंतर आज दुपारी पालखी श्री क्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज संस्थानात पोहोचणार आहे. तेथे महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे पालखीचा पहिला रात्रीचा मुक्काम असेल. यानंतर २२ जून रोजी दुपारी गायगाव तर रात्री भौरद येथे मुक्काम होणार आहे. पुढे २३ व २४ जून रोजी अकोला येथे दोन दिवसांचा मुक्काम राहणार असून, निश्चित मार्गाने पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणार आहे. संतांच्या शिकवणुकीवर चालणारी ही वारी केवळ धार्मिक सोहळा नसून, सामाजिक एकात्मता, समता, सेवा आणि अध्यात्माचे विद्यापीठ मानली जाते. जाती-पाती, श्रीमंत-गरीब यांचे भेद विसरून हजारो वारकरी एकाच नामस्मरणात दंग होतात. त्यामुळेच संतनगरीतून निघालेली ही पालखी आजही लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरत आहे. 'चंद्रभागे स्नान, तुका मागे हेचि दान' या संतवचनांचा ध्यास घेऊन श्रींची पालखी आता विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने भक्तिभावाने मार्गक्रमण करत आहे. गण गण गणात बोते.
    1
    आज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, 'हेचि व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास...' या संतवचनांचा जयघोष करत, टाळ-मृदंगांच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या डोलणाऱ्या सागरात, 'जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल'च्या अखंड गजरात संतनगरी शेगावातून श्री संत गजानन महाराजांची पवित्र पालखी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने मार्गस्थ झाली. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, वारकऱ्यांच्या उत्साहाने शेगाव नगरीत आध्यात्मिक ऊर्जा संचारली आहे.

आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेला हा पालखी सोहळा यंदा ५७ वे वर्ष साजरा करत आहे. यामध्ये तब्बल ७०० हून अधिक वारकरी, टाळकरी, पताकाधारी आणि अश्वदल सहभागी झाले आहेत. 'गण गण गणात बोते', 'जय गजानन श्री गजानन' आणि 'जय हरी विठ्ठल'च्या अखंड नामघोषात भक्तांची पावले पंढरीच्या दिशेने पडू लागली आहेत. श्रींची पालखी पुढील ३३ दिवसांत ५७० किलोमीटरचे अंतर पायी पार करत २३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूरमध्ये २३ ते २८ जुलै या कालावधीत श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा मुक्काम राहणार असून, हजारो भाविकांना श्रींच्या दर्शनाचा लाभ मिळेल.

पंढरपूरातील मुक्कामानंतर २९ जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा ५५० किलोमीटरचा मार्ग पायी पार करत, येण्या-जाण्याचा एकूण १३०० किलोमीटरचा पायी प्रवास वारकरी पूर्ण करणार आहेत. आधुनिक युगातही एवढ्या मोठ्या प्रमाणात भक्तांनी पायी वारी करणे ही संत परंपरेची आणि श्रद्धेची अद्वितीय ताकद असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

शेगावातून प्रस्थान केल्यानंतर आज दुपारी पालखी श्री क्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज संस्थानात पोहोचणार आहे. तेथे महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे पालखीचा पहिला रात्रीचा मुक्काम असेल. यानंतर २२ जून रोजी दुपारी गायगाव तर रात्री भौरद येथे मुक्काम होणार आहे. पुढे २३ व २४ जून रोजी अकोला येथे दोन दिवसांचा मुक्काम राहणार असून, निश्चित मार्गाने पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

संतांच्या शिकवणुकीवर चालणारी ही वारी केवळ धार्मिक सोहळा नसून, सामाजिक एकात्मता, समता, सेवा आणि अध्यात्माचे विद्यापीठ मानली जाते. जाती-पाती, श्रीमंत-गरीब यांचे भेद विसरून हजारो वारकरी एकाच नामस्मरणात दंग होतात. त्यामुळेच संतनगरीतून निघालेली ही पालखी आजही लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरत आहे. 'चंद्रभागे स्नान, तुका मागे हेचि दान' या संतवचनांचा ध्यास घेऊन श्रींची पालखी आता विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने भक्तिभावाने मार्गक्रमण करत आहे. गण गण गणात बोते.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    20 hrs ago
  • महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संघटन मजबूत आहे. याच मजबूत संघटनामुळे वंचित बहुजन आघाडीची या भागावर सत्ता आहे, ज्याला ‘अकोला पॅटर्न’ म्हणून ओळखले जाते.
    1
    महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संघटन मजबूत आहे. याच मजबूत संघटनामुळे वंचित बहुजन आघाडीची या भागावर सत्ता आहे, ज्याला ‘अकोला पॅटर्न’ म्हणून ओळखले जाते.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • गेल्या १५ ते २० वर्षांपासून रखडलेली पेडगाव येथील नळ पाणीपुरवठा योजना अखेर मार्गी लागली असून, उद्यापासून ती प्रत्यक्ष सुरू होणार आहे. या योजनेमुळे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता गावकऱ्यांना घरपोच पिण्याचे पाणी मिळणार आहे. अनेक वर्षांपासून पेडगावमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होत असल्याने महिलांना दूरवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य कुटुंबांना पाण्यासाठी खूप धावपळ करावी लागत असे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली होती, परंतु विविध कारणांमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. गावातील या गंभीर समस्येची दखल घेत पत्रकार विश्वास कुटे यांनी पेडगावच्या पाणीप्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून नळ योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न म्हणून त्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे अखेर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत नळ योजना सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला. नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने गावातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचेल. यामुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार असून, महिलांच्या श्रमात मोठी बचत होणार आहे. या योजनेचा गावातील आरोग्य, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनावरही सकारात्मक परिणाम होईल. येत्या २२ जून रोजी सकाळी ८:३० वाजता पेडगाव येथे नळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असून, सर्व ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहून नळाचे पाणी भरून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी पत्रकार विश्वास कुटे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पेडगावच्या विकासाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात असून, पाण्याचा प्रश्न सुटल्याने गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.
    3
    गेल्या १५ ते २० वर्षांपासून रखडलेली पेडगाव येथील नळ पाणीपुरवठा योजना अखेर मार्गी लागली असून, उद्यापासून ती प्रत्यक्ष सुरू होणार आहे. या योजनेमुळे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता गावकऱ्यांना घरपोच पिण्याचे पाणी मिळणार आहे.

अनेक वर्षांपासून पेडगावमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होत असल्याने महिलांना दूरवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य कुटुंबांना पाण्यासाठी खूप धावपळ करावी लागत असे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली होती, परंतु विविध कारणांमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता.

गावातील या गंभीर समस्येची दखल घेत पत्रकार विश्वास कुटे यांनी पेडगावच्या पाणीप्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून नळ योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न म्हणून त्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे अखेर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत नळ योजना सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला.

नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने गावातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचेल. यामुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार असून, महिलांच्या श्रमात मोठी बचत होणार आहे. या योजनेचा गावातील आरोग्य, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनावरही सकारात्मक परिणाम होईल. येत्या २२ जून रोजी सकाळी ८:३० वाजता पेडगाव येथे नळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असून, सर्व ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहून नळाचे पाणी भरून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी पत्रकार विश्वास कुटे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पेडगावच्या विकासाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात असून, पाण्याचा प्रश्न सुटल्याने गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'योगातून आरोग्य आणि निरोगी जीवन' हा संदेश देत, आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), सुनगांव यांच्या वतीने स्थानिक सराई महादेव मंदिर परिसरात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात योगासनांनी झाली, जिथे योगा प्रशिक्षक सुरेश काळपांडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध योगासने आणि प्राणायामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. काळपांडे यांनी योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढण्यासोबतच मानसिक शांतता कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निमकर्डे यांनी 'योगा व आरोग्य' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे केवळ शारीरिक व्याधीच दूर होत नाहीत, तर मनावर नियंत्रण मिळवून तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. आरोग्य विभागाच्या पथकानेही ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शारदा पंडित, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, आरोग्य सेवक संदीप पोले, प्रतीक पाटील, आरोग्य सेविका सारिका इंगळे, आरती इंगळे आणि आशा सेविकांची विशेष उपस्थिती होती. सुनगांव गावातील मोठ्या संख्येने नागरिक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते, ज्यांनी सर्वांनी मिळून योगासने करत निरोगी राहण्याचा संकल्प केला.
    1
    जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'योगातून आरोग्य आणि निरोगी जीवन' हा संदेश देत, आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), सुनगांव यांच्या वतीने स्थानिक सराई महादेव मंदिर परिसरात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात योगासनांनी झाली, जिथे योगा प्रशिक्षक सुरेश काळपांडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध योगासने आणि प्राणायामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. काळपांडे यांनी योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढण्यासोबतच मानसिक शांतता कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

यावेळी आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निमकर्डे यांनी 'योगा व आरोग्य' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे केवळ शारीरिक व्याधीच दूर होत नाहीत, तर मनावर नियंत्रण मिळवून तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. आरोग्य विभागाच्या पथकानेही ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शारदा पंडित, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, आरोग्य सेवक संदीप पोले, प्रतीक पाटील, आरोग्य सेविका सारिका इंगळे, आरती इंगळे आणि आशा सेविकांची विशेष उपस्थिती होती. सुनगांव गावातील मोठ्या संख्येने नागरिक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते, ज्यांनी सर्वांनी मिळून योगासने करत निरोगी राहण्याचा संकल्प केला.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, यामध्ये ७०० हून अधिक वारकरी भगव्या पताका घेऊन सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे निघाली. शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ही पालखी ३३ दिवसांत पूर्ण करेल आणि २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन ही पालखी २८ जुलैपर्यंत पंढरपुरातच मुक्काम करणार आहे. या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण संत नगरी 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पंढरपुरातील मुक्कामानंतर, पालखी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघेल.
    4
    विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, यामध्ये ७०० हून अधिक वारकरी भगव्या पताका घेऊन सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे निघाली.

शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ही पालखी ३३ दिवसांत पूर्ण करेल आणि २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन ही पालखी २८ जुलैपर्यंत पंढरपुरातच मुक्काम करणार आहे.

या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण संत नगरी 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पंढरपुरातील मुक्कामानंतर, पालखी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघेल.
    user_गजानन कडुजी राऊत
    गजानन कडुजी राऊत
    Graphic designer मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • अमरावती शहरातील सरस्वती नगरात घडलेल्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत गुन्हा उघडकीस आणला आहे.
    1
    अमरावती शहरातील सरस्वती नगरात घडलेल्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत गुन्हा उघडकीस आणला आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    1
    राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    15 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यात अन्न व औषधी विभाग आता ॲक्शन मोडवर आला आहे. या विभागाने जिल्ह्यातील दोन प्रस्ताव मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत सादर केले आहेत.
    1
    बुलढाणा जिल्ह्यात अन्न व औषधी विभाग आता ॲक्शन मोडवर आला आहे. या विभागाने जिल्ह्यातील दोन प्रस्ताव मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत सादर केले आहेत.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • वाशिम जिल्ह्यांतर्गत असलेल्या डोंगर किणी गावामध्ये बैलाच्या कोठ्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
    1
    वाशिम जिल्ह्यांतर्गत असलेल्या डोंगर किणी गावामध्ये बैलाच्या कोठ्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.