पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून दीड वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला ठाणे :पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीच्या हल्ल्यात दीड वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा येथील शांतीनगर भागात २२ वर्षीय तक्रारदार हे त्यांची पत्नी चार वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाच्या मुलासोबत वास्तव्यास आहेत. याच भागात त्यांची मेव्हणी देखील वास्तव्यास आहे. रविवारी रात्री परिसरात राहणाऱ्या विकी डॅनियल नावाच्या व्यक्तीसोबत त्यांच्या मेव्हणीचे वाद झाले होते. याची माहिती तक्रारदार यांना मिळाल्यानंतर ते पत्नीसोबत मेव्हणीच्या घरी गेले. तेथे डॅनियल याची पत्नी आणि तक्रारदार यांच्या मेव्हणीमध्ये वाद सुरु होते. तक्रारदार पोहचताच डॅनियल याच्या पत्नीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. डॅनियल याने स्वत:च्या हाताने स्वत:वर ब्लेडने वार केले. तक्रारदार यांनी तात्काळ ११२ या पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. कळवा पोलीस आल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार, तक्रारदार हे त्यांची पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलासह दुचाकीने पोलीस ठाण्यात गेले. सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास ते पोलीस ठाण्यात तक्रार देऊन परतत असताना कळवा पूर्व येथील रिक्षा थांब्याजवळ डॅनियल हा एका हातात कोयता आणि दुसऱ्या हातात सुरा घेऊन उभा होता. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे डॅनियल याने तक्रारदार यांच्या दिशेने धाव घेत त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार तक्रारदार यांनी चुकविल्याने तो त्यांच्या दीड वर्षांच्या मुलाला लागला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर डॅनियल याने पुन्हा एकदा तक्रारदार यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु तक्रारदार यांनी दुचाकी वेगाने नेत तेथून पळ काढला. तसेच मुलाला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- राज्यसभेची जागा शरद पवार यांना दिल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात अंतर्गत वाद सुरू झाले असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत हा वाद उफाळून आला आहे1
- अंबरनाथ प्रशासन नगरपालिका शिव मंदिर1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- प्रेसिडेंट कप इंडिया 2026 का उद्घाटन करने पहुंचे बॉलीवुड के भाईजान सलमान खान BNN NEWS1
- मुंब्रा के मतदाता हो जाएं सतर्क , 1 अप्रैल से S I R की प्रक्रिया शुरू , जितेंद्र आव्हाड | Breaking Bytes1
- Post by RNN CHANNEL1
- 8 घंटे में खुली मर्डर मिस्ट्री: दोस्तों ने ही उतारा मौत के घाट, पहचान छुपाने के लिए काटा सिर न्यूज़: नालासोपारा के पेल्हार इलाके में सिर कटी लाश मिलने के सनसनीखेज मामले को पुलिस ने महज 8 घंटे में सुलझा लिया। जांच में सामने आया कि पैसों के लेन-देन के विवाद में दो दोस्तों ने मिलकर अपने ही साथी की बेरहमी से हत्या कर दी। मृतक की पहचान अशोक सिंह राजपूत (32) निवासी राजस्थान के रूप में हुई है। पुलिस ने आरोपी दिनेश प्रजापति (27) और संदीप तिवारी (35) को गिरफ्तार कर लिया है। दोनों आरोपियों ने किराना व्यवसाय में लेन-देन के विवाद के चलते हत्या की और पहचान छुपाने के लिए शव का सिर अलग कर दिया। पुलिस ने CCTV फुटेज, तकनीकी जांच और मुखबिरों की मदद से आरोपियों तक पहुंच बनाई। उनकी निशानदेही पर तानसा नदी के पास से मृतक का सिर और अन्य अहम सबूत बरामद किए गए। पूरी कार्रवाई वरिष्ठ पुलिस निरीक्षक सचिन कांबले के नेतृत्व में की गई। फिलहाल दोनों आरोपियों को 10 अप्रैल तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है। #Nalasopara #MurderMystery #CrimeNews #MumbaiCrime #Pelhar #PoliceInvestigation #BreakingNews #HeadlessBody #CrimeStory #ViralNews #MumbaiPolice #Justice #CCTVFootage #MurderCase #NalasoparaNews1
- अंबड तालुक्यातील महाकाळा परिसरात आज सायंकाळी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडाचा आश्रय घेतलेल्या तीन युवकांवर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत दोन तरुण जागीच मृत्युमुखी पडले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपशील: आज सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती परिसरात ही घटना घडली. अचानक आलेल्या वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी तीन तरुणांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. याच दरम्यान झाडावर जोरदार वीज कोसळली. यामध्ये: १. गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१ वर्षे) – जागीच मृत्यू. २. आदित्य दगडू बेद्रे (वय २० वर्षे) – जागीच मृत्यू. या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यवाही: घटनेची माहिती मिळताच तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्याची प्रक्रिया सुरू असून, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना तातडीने घटनास्थळाचा पंचनामा व सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन स्तरावरून मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.1