logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महावितरणचा भोंगळ कारभार गंगापूरमध्ये पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाच्या घरात अद्याप मीटर बसवले नसतानाही त्याला महावितरणकडून चक्क चार वीजबिले पाठवण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

3 hrs ago
user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
3 hrs ago

महावितरणचा भोंगळ कारभार गंगापूरमध्ये पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाच्या घरात अद्याप मीटर बसवले नसतानाही त्याला महावितरणकडून चक्क चार वीजबिले पाठवण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अप्पर तहसील यादीत सेवलीला डावलल्याच्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने धरणे व निदर्शने आंदोलनाचे आयोजन केले आहे.
    1
    अप्पर तहसील यादीत सेवलीला डावलल्याच्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने धरणे व निदर्शने आंदोलनाचे आयोजन केले आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून आणि युवा नेते अविष्कार भाऊ भुसे यांच्या सहकार्याने, दिनांक १५ जून २०२६ रोजी द्याने येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता, आणि कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या प्रवेशोत्सवासाठी महिला व बालकल्याण समिती सदस्या तसेच नगरसेविका सौ. राजश्रीताई शरद पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शरदभाऊ पाटील, शिवसैनिक उप महानगर प्रमुख अमोल दादा चौधरी, मुख्यध्यापक प्रदीप सूर्यवंशी, सुनील जाधव, प्रशांत वाघ, कुमूद पाटील, सुनंदा शिंदे, सुलभा ठाकरे, स्मिता ठाकरे, भीमराव मगरे, आणि चंद्रसिंग सोळंके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 'प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे' हा महत्त्वपूर्ण संदेश देत नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली.
    1
    शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून आणि युवा नेते अविष्कार भाऊ भुसे यांच्या सहकार्याने, दिनांक १५ जून २०२६ रोजी द्याने येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता, आणि कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

या प्रवेशोत्सवासाठी महिला व बालकल्याण समिती सदस्या तसेच नगरसेविका सौ. राजश्रीताई शरद पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शरदभाऊ पाटील, शिवसैनिक उप महानगर प्रमुख अमोल दादा चौधरी, मुख्यध्यापक प्रदीप सूर्यवंशी, सुनील जाधव, प्रशांत वाघ, कुमूद पाटील, सुनंदा शिंदे, सुलभा ठाकरे, स्मिता ठाकरे, भीमराव मगरे, आणि चंद्रसिंग सोळंके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 'प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे' हा महत्त्वपूर्ण संदेश देत नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • गेल्या काही दिवसांपासून भोकरदन शहराला अत्यंत अशुद्ध, गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शहरातील जागरूक सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आज एकत्र येत स्थानिक जलशुद्धीकरण केंद्राला (वॉटर फिल्टर प्लांट) अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली, जिथे त्यांना फिल्टर प्लांटची दुरवस्था आणि पाण्याचा निकृष्ट दर्जा पाहून तीव्र संताप व्यक्त केला. भोकरदन नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून नळांना येणारे पाणी पिवळसर, दुर्गंधीयुक्त आणि गाळमिश्रित असल्याचे नागरिक सातत्याने सांगत होते. पावसाळा सुरू होत असतानाच अशा दूषित पाणीपुरवठ्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांना उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो आणि कावीळ यांसारख्या जलजन्य साथीच्या आजारांची लागण होण्याची भीती वाढली आहे. अनेक नागरिक पाणी उकळून आणि गाळून पीत असले तरी, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष होता. नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जलशुद्धीकरण केंद्राला कोणतीही पूर्वकल्पना न देता भेट दिल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले. केंद्राच्या आवारात आणि टाक्यांच्या आसपास मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली होती, तसेच पाणी गाळण्याची यंत्रणा जुनाट आणि निकामी झाल्याचे दिसून आले. साठवणूक टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला होता आणि पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या तुरटीच्या वड्या (Alum blocks) आणि जंतुनाशक प्रक्रिया योग्य प्रमाणात होत नसल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांकडे पाणी शुद्धीकरणाच्या दैनंदिन नोंदी आणि नियोजनाचाही अभाव होता, ज्यामुळे संतप्त नगरसेवकांनी जबाबदार अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. फिल्टर प्लांटची पाहणी केल्यानंतर, सर्व नगरसेवकांनी तात्काळ भोकरदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांची भेट घेतली. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर जलशुद्धीकरण केंद्रातील गंभीर त्रुटींचा पाढा वाचत, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहरात साथीचा आजार पसरल्यास नगरपरिषद प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशारा दिला. नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राची तात्काळ दुरुस्ती व स्वच्छता, पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक रसायनांचा व तुरटीचा पुरेसा वापर आणि प्रत्येक प्रभागात पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची प्रयोगशाळा तपासणी करून अहवाल जाहीर करण्याची मागणी केली. मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी नगरसेवकांच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि पाणी प्रश्न व नागरिकांचे आरोग्य हे आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. त्यांनी फिल्टर प्लांटवरील त्रुटी दूर करण्यासाठी तांत्रिक पथकाला तात्काळ आदेश देण्याचे आणि येत्या दोन ते तीन दिवसांत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल याची खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक दीपक मोरे, राजू सहाणे, शंकर सपकाळ, रवी देशमुख, सुमित थारेवाल, रमेश जाधव, जहीर कुरेशी, प्रवीण देशपांडे, रमेश बिरसोने यांच्यासह अनेक प्रमुख नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना पाणीपुरवठ्याचा दर्जा सुधारण्यासाठी ठराविक वेळेची मुदत दिली असून, येत्या ४८ तासांत स्वच्छ पाणी न मिळाल्यास नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषदेसमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक भूमिकेमुळे नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून, फिल्टर प्लांटवर कामांना वेग आला आहे. प्रशासन दिलेल्या आश्वासनानुसार युद्धपातळीवर उपाययोजना करते की शहरवासीयांना पुन्हा दूषित पाण्याचा सामना करावा लागतो, याकडे आता संपूर्ण भोकरदन शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
    1
    गेल्या काही दिवसांपासून भोकरदन शहराला अत्यंत अशुद्ध, गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शहरातील जागरूक सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आज एकत्र येत स्थानिक जलशुद्धीकरण केंद्राला (वॉटर फिल्टर प्लांट) अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली, जिथे त्यांना फिल्टर प्लांटची दुरवस्था आणि पाण्याचा निकृष्ट दर्जा पाहून तीव्र संताप व्यक्त केला.

भोकरदन नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून नळांना येणारे पाणी पिवळसर, दुर्गंधीयुक्त आणि गाळमिश्रित असल्याचे नागरिक सातत्याने सांगत होते. पावसाळा सुरू होत असतानाच अशा दूषित पाणीपुरवठ्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांना उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो आणि कावीळ यांसारख्या जलजन्य साथीच्या आजारांची लागण होण्याची भीती वाढली आहे. अनेक नागरिक पाणी उकळून आणि गाळून पीत असले तरी, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष होता.

नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जलशुद्धीकरण केंद्राला कोणतीही पूर्वकल्पना न देता भेट दिल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले. केंद्राच्या आवारात आणि टाक्यांच्या आसपास मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली होती, तसेच पाणी गाळण्याची यंत्रणा जुनाट आणि निकामी झाल्याचे दिसून आले. साठवणूक टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला होता आणि पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या तुरटीच्या वड्या (Alum blocks) आणि जंतुनाशक प्रक्रिया योग्य प्रमाणात होत नसल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांकडे पाणी शुद्धीकरणाच्या दैनंदिन नोंदी आणि नियोजनाचाही अभाव होता, ज्यामुळे संतप्त नगरसेवकांनी जबाबदार अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

फिल्टर प्लांटची पाहणी केल्यानंतर, सर्व नगरसेवकांनी तात्काळ भोकरदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांची भेट घेतली. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर जलशुद्धीकरण केंद्रातील गंभीर त्रुटींचा पाढा वाचत, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहरात साथीचा आजार पसरल्यास नगरपरिषद प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशारा दिला. नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राची तात्काळ दुरुस्ती व स्वच्छता, पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक रसायनांचा व तुरटीचा पुरेसा वापर आणि प्रत्येक प्रभागात पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची प्रयोगशाळा तपासणी करून अहवाल जाहीर करण्याची मागणी केली.

मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी नगरसेवकांच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि पाणी प्रश्न व नागरिकांचे आरोग्य हे आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. त्यांनी फिल्टर प्लांटवरील त्रुटी दूर करण्यासाठी तांत्रिक पथकाला तात्काळ आदेश देण्याचे आणि येत्या दोन ते तीन दिवसांत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल याची खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक दीपक मोरे, राजू सहाणे, शंकर सपकाळ, रवी देशमुख, सुमित थारेवाल, रमेश जाधव, जहीर कुरेशी, प्रवीण देशपांडे, रमेश बिरसोने यांच्यासह अनेक प्रमुख नगरसेवक उपस्थित होते.

नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना पाणीपुरवठ्याचा दर्जा सुधारण्यासाठी ठराविक वेळेची मुदत दिली असून, येत्या ४८ तासांत स्वच्छ पाणी न मिळाल्यास नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषदेसमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक भूमिकेमुळे नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून, फिल्टर प्लांटवर कामांना वेग आला आहे. प्रशासन दिलेल्या आश्वासनानुसार युद्धपातळीवर उपाययोजना करते की शहरवासीयांना पुन्हा दूषित पाण्याचा सामना करावा लागतो, याकडे आता संपूर्ण भोकरदन शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • खतांच्या नव्या मोबाईल प्रणालीविरोधात काँग्रेसने एक भव्य रस्ता रोको आंदोलन केले. पक्षाने स्पष्ट केले आहे की, शेतकरी बांधवांना न्याय मिळेपर्यंत त्यांचा हा लढा अखंडपणे सुरूच राहील.
    2
    खतांच्या नव्या मोबाईल प्रणालीविरोधात काँग्रेसने एक भव्य रस्ता रोको आंदोलन केले. पक्षाने स्पष्ट केले आहे की, शेतकरी बांधवांना न्याय मिळेपर्यंत त्यांचा हा लढा अखंडपणे सुरूच राहील.
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बीड येथील न्यायालय परिसरात विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी एका चर्चित प्रकरणाच्या सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुनावणीतील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देताना सांगितले की, न्यायालयाने आरोपी पक्षाच्या वतीने करण्यात आलेली मागणी स्वीकारली नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध बाबींचा विचार करून न्यायालयाने ही मागणी फेटाळल्याचे ॲड. निकम यांनी स्पष्ट केले. ॲड. निकम यांनी न्यायालयीन प्रक्रिया पुरावे, कायदेशीर मुद्दे आणि वस्तुस्थितीच्या आधारेच पुढे जात असल्याचे नमूद केले. त्यामुळे कोणत्याही निर्णयाबाबत अनावश्यक तर्कवितर्क न करता न्यायालयावर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन कार्यवाही कायद्याच्या चौकटीत सुरू असून, सत्य आणि न्याय यांनाच प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. सदर प्रकरणाकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने आरोपी पक्षाची मागणी नाकारल्यानंतर पुढील सुनावणीबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार प्रकरणाची सुनावणी पुढे सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
    1
    बीड येथील न्यायालय परिसरात विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी एका चर्चित प्रकरणाच्या सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुनावणीतील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देताना सांगितले की, न्यायालयाने आरोपी पक्षाच्या वतीने करण्यात आलेली मागणी स्वीकारली नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध बाबींचा विचार करून न्यायालयाने ही मागणी फेटाळल्याचे ॲड. निकम यांनी स्पष्ट केले.

ॲड. निकम यांनी न्यायालयीन प्रक्रिया पुरावे, कायदेशीर मुद्दे आणि वस्तुस्थितीच्या आधारेच पुढे जात असल्याचे नमूद केले. त्यामुळे कोणत्याही निर्णयाबाबत अनावश्यक तर्कवितर्क न करता न्यायालयावर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन कार्यवाही कायद्याच्या चौकटीत सुरू असून, सत्य आणि न्याय यांनाच प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सदर प्रकरणाकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने आरोपी पक्षाची मागणी नाकारल्यानंतर पुढील सुनावणीबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार प्रकरणाची सुनावणी पुढे सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    17 min ago
  • रोहित पवार यांनी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. त्यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    रोहित पवार यांनी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. त्यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • अभिनेते प्रविण दरडे 'देऊळ बंद' या चित्रपटाच्या निमित्ताने मालेगावात आले होते. त्यांनी 'देऊळ बंद' चित्रपटाला मालेगावकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
    1
    अभिनेते प्रविण दरडे 'देऊळ बंद' या चित्रपटाच्या निमित्ताने मालेगावात आले होते. त्यांनी 'देऊळ बंद' चित्रपटाला मालेगावकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • रविवारी पंढरपूरहून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला, ज्यात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक दुर्घटना पिकअप वाहन एका विहिरीत कोसळल्याने घडली. या अपघातात एका निष्पाप चिमुकल्याचाही बळी गेला असून, घटनेचे व्हिडिओ आणि फोटो मन हेलावून टाकणारे आहेत. श्रद्धेच्या प्रवासात काळाने घातलेल्या या घातामुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    रविवारी पंढरपूरहून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला, ज्यात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक दुर्घटना पिकअप वाहन एका विहिरीत कोसळल्याने घडली.

या अपघातात एका निष्पाप चिमुकल्याचाही बळी गेला असून, घटनेचे व्हिडिओ आणि फोटो मन हेलावून टाकणारे आहेत. श्रद्धेच्या प्रवासात काळाने घातलेल्या या घातामुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.