छत्रपती संभाजीनगर येथे फुलंब्रीचे नवनिर्वाचित जि.प. सदस्य गोपाल वाघ यांचा गौरव : छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्य मंदिरात ‘दिव्य मराठी’ आणि डॉ. जीवन राजपूत यांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात फुलंब्री तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य गोपाल वाघ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. या सोहळ्याला राज्याचे मंत्री ना. अतुल सावे, पालकमंत्री ना. संजय शिरसाठ, खासदार संदीपान भुमरे, आमदार संतोष दानवे, महापौर समीर राजुरकर यांच्यासह जिल्ह्यातील इतर नवनिर्वाचित सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात गोपाल वाघ यांनी सत्कार स्वीकारत आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच फुलंब्री तालुक्याच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- खुलताबाद-पळसवाडी जवळ धावत्या एसटी बसला आग; ४८ प्रवाशांचा थरार, सर्वजण बचावले1
- सिल्लोड पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीवरून सुनील मिरकर नाराज असल्याचे दिसून आले त्यांनी लगेच फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल केली व आपली नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की...1
- 👉 तुम्हालाही पार्सल पाठवायचे आहे का? विश्वासार्ह कुरिअर सेवेसाठी आजच आम्हाला कॉल करा! 95457899661
- छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे पाटील यांनी घेतले शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे दर्शन नाथ षष्ठीच्या पावन पर्वावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज श्री क्षेत्र पैठण येथे भेट देऊन शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पैठण नगरीत भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मनोज जरांगे यांचं विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने समाजाचे प्रश्न सुटावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा दर्शन सोहळा पार पडला.1
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- सिटी चौक परिसरात दुकानफोडी; CCTV फुटेजवरून तपास सुरू छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्याने एका साडीच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानफोडी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील माल व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. तसेच परिसरातील इतर CCTV फुटेजही तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, सिटी चौक परिसरात वाढत्या दुकानफोडीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 📰1