logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तळपत्या उन्हाचा फटका व्यापाऱ्यांना; दुपारी १ ते ४ गिऱ्हाईक गायब मे महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेने तीव्र रूप धारण केल्याने उरण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने बाजारपेठांवर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे. नेहमी गजबजलेल्या उरणमधील मुख्य बाजारपेठा दुपारी १ ते ४ या वेळेत अक्षरशः ओस पडत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तापलेल्या उन्हामुळे नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडत नसल्याने किरकोळ व्यापारी, फेरीवाले तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दुपारच्या वेळेत ग्राहकांची संख्या अचानक घटत असल्याने अनेक दुकानदारांनी दुकानांचा वेळ बदलण्यास सुरुवात केली आहे. काही व्यापारी दुपारी काही तास दुकाने बंद ठेवून सायंकाळी पुन्हा व्यवसाय सुरू करत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. उरण बाजारपेठ, चिरनेर रोड, कोटनाका परिसर तसेच ग्रामीण भागातील आठवडी बाजारांमध्येही दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवत आहे. पूर्वी दुपारच्या वेळेतही खरेदीसाठी गर्दी असणाऱ्या ठिकाणी आता मोजकेच नागरिक दिसत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, उष्णतेमुळे ग्राहक घराबाहेर पडत नसल्याने विक्रीत मोठी घट झाली आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक ऑनलाइन व्यवहार किंवा सायंकाळच्या वेळेत खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. परिणामी दुपारच्या वेळेत दुकानात बसूनही ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची भावना अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, उष्णतेमुळे थंड पेये, फळांचे रस, आईस्क्रीम, उसाचा रस तसेच नारळपाण्याच्या विक्रीत मात्र मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेत या व्यवसायांवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. डॉक्टरांनीही नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय दुपारी बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून, यामुळे व्यापारी वर्गासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये पुन्हा चैतन्य येण्यासाठी आता सायंकाळच्या वेळेवरच व्यापाऱ्यांची भिस्त असल्याचे दिसून येत आहे.

5 hrs ago
user_विरेश मधुकर मोडखरकर
विरेश मधुकर मोडखरकर
उरण, रायगड, महाराष्ट्र•
5 hrs ago
936571ef-f828-460e-b976-6c761fee139d

तळपत्या उन्हाचा फटका व्यापाऱ्यांना; दुपारी १ ते ४ गिऱ्हाईक गायब मे महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेने तीव्र रूप धारण केल्याने उरण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने बाजारपेठांवर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे. नेहमी गजबजलेल्या उरणमधील मुख्य बाजारपेठा दुपारी १ ते ४ या वेळेत अक्षरशः ओस पडत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तापलेल्या उन्हामुळे नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडत नसल्याने किरकोळ व्यापारी, फेरीवाले तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दुपारच्या वेळेत ग्राहकांची संख्या अचानक घटत असल्याने अनेक दुकानदारांनी दुकानांचा वेळ बदलण्यास सुरुवात केली आहे. काही व्यापारी दुपारी काही तास दुकाने बंद ठेवून सायंकाळी पुन्हा व्यवसाय सुरू करत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. उरण बाजारपेठ, चिरनेर रोड, कोटनाका परिसर तसेच ग्रामीण भागातील आठवडी बाजारांमध्येही दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवत आहे. पूर्वी दुपारच्या वेळेतही खरेदीसाठी गर्दी असणाऱ्या ठिकाणी आता मोजकेच नागरिक

e2262837-5899-461c-b60a-82134ff668d3

दिसत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, उष्णतेमुळे ग्राहक घराबाहेर पडत नसल्याने विक्रीत मोठी घट झाली आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक ऑनलाइन व्यवहार किंवा सायंकाळच्या वेळेत खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. परिणामी दुपारच्या वेळेत दुकानात बसूनही ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची भावना अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, उष्णतेमुळे थंड पेये, फळांचे रस, आईस्क्रीम, उसाचा रस तसेच नारळपाण्याच्या विक्रीत मात्र मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेत या व्यवसायांवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. डॉक्टरांनीही नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय दुपारी बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून, यामुळे व्यापारी वर्गासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये पुन्हा चैतन्य येण्यासाठी आता सायंकाळच्या वेळेवरच व्यापाऱ्यांची भिस्त असल्याचे दिसून येत आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • Atul Londhe Questions PM Modi Over Petroleum Crisis | 300 Car Rally Sends Big Message | Wah Jawab Nahin! Atul Londhe Questions PM Modi Over Petroleum Crisis | 300 Car Rally Sends Big Message | Wah Jawab Nahin! Congress leader Atul Londhe strongly questioned PM Modi and the Central Government over the rising petroleum crisis and fuel-related issues. A massive 300-car rally was organized to raise public awareness and send a strong political message. Why is the government silent on petroleum prices and fuel concerns? Watch the full report and public reaction in this special coverage. 📍 Massive Car Rally 📍 Petroleum Crisis Debate 📍 Political Reactions 📍 Public Anger Over Fuel Issues Stay connected with INDDIV for the latest political updates, ground reports, and breaking news from Maharashtra and across India. #AtulLondhe #PMModi #PetroleumCrisis #FuelPriceHike #300CarRally #PoliticalNews #BreakingNews #INDDIV #PetrolDieselPrice #ModiGovernment #Congress #MaharashtraNews #IndiaNews #ViralNews #YouTubeShorts
    1
    Atul Londhe Questions PM Modi Over Petroleum Crisis | 300 Car Rally Sends Big Message | Wah Jawab Nahin!
Atul Londhe Questions PM Modi Over Petroleum Crisis | 300 Car Rally Sends Big Message | Wah Jawab Nahin!
Congress leader Atul Londhe strongly questioned PM Modi and the Central Government over the rising petroleum crisis and fuel-related issues. A massive 300-car rally was organized to raise public awareness and send a strong political message.
Why is the government silent on petroleum prices and fuel concerns?
Watch the full report and public reaction in this special coverage.
📍 Massive Car Rally
📍 Petroleum Crisis Debate
📍 Political Reactions
📍 Public Anger Over Fuel Issues
Stay connected with INDDIV for the latest political updates, ground reports, and breaking news from Maharashtra and across India.
#AtulLondhe #PMModi #PetroleumCrisis #FuelPriceHike #300CarRally #PoliticalNews #BreakingNews #INDDIV #PetrolDieselPrice #ModiGovernment #Congress #MaharashtraNews #IndiaNews #ViralNews #YouTubeShorts
    user_INDDIV
    INDDIV
    Mumbai, Maharashtra•
    2 hrs ago
  • विजयच्या शपथविधी सोहळ्यात अभिनेत्री त्रिशाची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तिच्या अचानक आलेल्या हजेरीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
    1
    विजयच्या शपथविधी सोहळ्यात अभिनेत्री त्रिशाची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तिच्या अचानक आलेल्या हजेरीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पश्चिम भांडुप, मुंबई येथे नगरसेविका जागृती पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने पालिका वनक्षेत्रातील गांजाची शेती उद्ध्वस्त केली. जंगली डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या सुरक्षा चिंतेतून ही लागवड उघडकीस आली, ज्यात दाट जंगलात ड्रग्जच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले. सर्व गांजाची झाडे जप्त करून नशेखोरांचे अड्डे पाडण्यात आले, ज्यामुळे नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित झाली.
    1
    पश्चिम भांडुप, मुंबई येथे नगरसेविका जागृती पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने पालिका वनक्षेत्रातील गांजाची शेती उद्ध्वस्त केली. जंगली डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या सुरक्षा चिंतेतून ही लागवड उघडकीस आली, ज्यात दाट जंगलात ड्रग्जच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले. सर्व गांजाची झाडे जप्त करून नशेखोरांचे अड्डे पाडण्यात आले, ज्यामुळे नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित झाली.
    user_अमर ज्योति न्यूज़
    अमर ज्योति न्यूज़
    पत्रकार Kurla, Mumbai Suburban•
    10 hrs ago
  • मुंबई उपनगरमधील अंधेरी परिसरात एका रिकाम्या प्लॉटमध्ये मातीच्या आत एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतक गोविंद मूळचा मध्य प्रदेशचा असून, तो आपल्या मामासोबत येथे राहत होता. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून ही हत्या आहे की आणखी काही, याचा तपास सुरू केला आहे.
    1
    मुंबई उपनगरमधील अंधेरी परिसरात एका रिकाम्या प्लॉटमध्ये मातीच्या आत एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतक गोविंद मूळचा मध्य प्रदेशचा असून, तो आपल्या मामासोबत येथे राहत होता. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून ही हत्या आहे की आणखी काही, याचा तपास सुरू केला आहे.
    user_Aatish Tiwari - Crime Search
    Aatish Tiwari - Crime Search
    News Anchor अंधेरी, मुंबई उपनगर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • एक नवी कविता 'BHADVA RANI' समोर आली आहे. या कवितेने मुंबईत लक्ष वेधले असून ती चर्चेचा विषय ठरत आहे.
    1
    एक नवी कविता 'BHADVA RANI' समोर आली आहे. या कवितेने मुंबईत लक्ष वेधले असून ती चर्चेचा विषय ठरत आहे.
    user_Shyam pokra
    Shyam pokra
    Mumbai, Maharashtra•
    16 hrs ago
  • मुंबईच्या माळात एका शाळेत ७०० हून अधिक लोकांचे कथितरित्या धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू होता. हिंदू कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच, त्यांनी विरोध केला आणि पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
    1
    मुंबईच्या माळात एका शाळेत ७०० हून अधिक लोकांचे कथितरित्या धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू होता. हिंदू कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच, त्यांनी विरोध केला आणि पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
    user_Ashish singh
    Ashish singh
    News Anchor अंधेरी, मुंबई उपनगर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • मुंबईच्या विनोबा भावे नगर परिसरातील गरीब नवाज इमारतीजवळ रेशनिंग विभागाने अचानक धाड टाकली. या कारवाईमुळे अन्नधान्याच्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    1
    मुंबईच्या विनोबा भावे नगर परिसरातील गरीब नवाज इमारतीजवळ रेशनिंग विभागाने अचानक धाड टाकली. या कारवाईमुळे अन्नधान्याच्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    user_News24mumbai
    News24mumbai
    Advertising agency Mumbai, Maharashtra•
    19 hrs ago
  • मुंबईतील दहिसर पूर्व येथे मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते रायगड सहकारी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना आता नव्या बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.
    1
    मुंबईतील दहिसर पूर्व येथे मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते रायगड सहकारी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना आता नव्या बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.
    user_Amit Omprakash tiwari
    Amit Omprakash tiwari
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.