logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अमळनेरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची थरारक सुटका अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून भाळेराव नगर येथील गुरुकृपा कॉलनीत नाल्याला आलेल्या अचानक पुरामुळे एका घरात पाणी शिरले. परिणामी, अवघ्या एका महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब घरात अडकून पडले. घरात झपाट्याने पाणी शिरत असल्याने कुटुंबीयांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या तातडीच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाचे निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे रोख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक ठरत होते. मात्र, दोर, लाइफ जॅकेट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या साहाय्याने पथकाने तब्बल दोन तास अथक प्रयत्न करत पाण्यात अडकलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांची सुखरूप सुटका केली. या बचाव मोहिमेतील सर्वात भावनिक क्षण म्हणजे अवघ्या एका महिन्याच्या चिमुकल्याला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बाळासह सर्व कुटुंबीयांना जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरक्षित हलविण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संकटाच्या काळात धाडस, तत्परता आणि सेवाभावाचे दर्शन घडवत आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या पथकाने एका कुटुंबाचे प्राण वाचविल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. या धाडसी बचावकार्यातून अमळनेरच्या आपत्कालीन यंत्रणेने पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यदक्षतेची आणि तत्परतेची प्रचिती दिली आहे.

10 hrs ago
user_Police chaufer news
Police chaufer news
मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
10 hrs ago
40aff481-c160-414c-be30-5010a3700ddf

अमळनेरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची थरारक सुटका अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून भाळेराव नगर येथील गुरुकृपा कॉलनीत नाल्याला आलेल्या अचानक पुरामुळे एका घरात पाणी शिरले. परिणामी, अवघ्या एका महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब घरात अडकून पडले. घरात झपाट्याने पाणी शिरत असल्याने कुटुंबीयांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या तातडीच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाचे निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे रोख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक ठरत होते. मात्र, दोर, लाइफ जॅकेट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या साहाय्याने पथकाने तब्बल दोन तास अथक प्रयत्न करत पाण्यात अडकलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांची सुखरूप सुटका केली. या बचाव मोहिमेतील सर्वात भावनिक क्षण म्हणजे अवघ्या एका महिन्याच्या चिमुकल्याला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बाळासह सर्व कुटुंबीयांना जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरक्षित हलविण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संकटाच्या काळात धाडस, तत्परता आणि सेवाभावाचे दर्शन घडवत आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या पथकाने एका कुटुंबाचे प्राण वाचविल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. या धाडसी बचावकार्यातून अमळनेरच्या आपत्कालीन यंत्रणेने पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यदक्षतेची आणि तत्परतेची प्रचिती दिली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🚨 MD ड्रग्ज जप्त! २ आरोपी जेरबंद ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आणखी एक मोठी आणि धडक कारवाई करत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात एमडी हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "नशामुक्त भारत" अभियानाअंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात एमडी अंमली पदार्थ आहे. या माहितीच्या आधारे ३१ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या इम्रान खान हयात खान, वय ३६, रा. फातेमा नगर, जळगाव याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८८ हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ, २० हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान या अंमली पदार्थाचा पुरवठा रफीक उर्फ गोल्डन, रा. मालेगाव, जिल्हा नाशिक याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने संयुक्तरित्या यशस्वीपणे पार पाडली. जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठ्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.
    1
    🚨 MD ड्रग्ज जप्त!
२ आरोपी जेरबंद ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 
जळगाव जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आणखी एक मोठी आणि धडक कारवाई करत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात एमडी हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"नशामुक्त भारत" अभियानाअंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात एमडी अंमली पदार्थ आहे.
या माहितीच्या आधारे ३१ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या इम्रान खान हयात खान, वय ३६, रा. फातेमा नगर, जळगाव याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८८ हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ, २० हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासादरम्यान या अंमली पदार्थाचा पुरवठा रफीक उर्फ गोल्डन, रा. मालेगाव, जिल्हा नाशिक याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने संयुक्तरित्या यशस्वीपणे पार पाडली.
जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठ्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.
    user_Police chaufer news
    Police chaufer news
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    1
    संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    News Anchor Jalgaon, Maharashtra•
    15 hrs ago
  • Muslim colony Khadka ward kramank 3
    1
    Muslim colony Khadka ward kramank 3
    user_Juber Khan Karim Khan
    Juber Khan Karim Khan
    Bhusawal, Jalgaon•
    23 hrs ago
  • जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी* जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    1
    जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप*
*जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप*
*"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी*
जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे.
यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    user_KRUSHNA RAJPUT
    KRUSHNA RAJPUT
    जामनेर, जळगाव, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नशिराबाद जवळील बोगद्यात पाणी... नागरिक आक्रमक टोलवसुली बंद! जळगाव शहरापासून नशिराबादजवळील पोलीस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करून टोलवसुली सुरूच ठेवण्यात आल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नशिराबाद टोल नाका गाठत काही काळासाठी टोलवसुली बंद पाडली. आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरता पुढे सोडण्यात आले. बोगद्यातील पाणी तातडीने काढून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. टोल कंपनी नियमित शुल्क आकारते, मात्र पावसाळ्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, "प्रथम सुरक्षित रस्ता आणि नंतर टोल" अशी भूमिका नागरिकांनी स्पष्ट करत हायवे प्रशासनाला इशारा दिला.
    1
    नशिराबाद जवळील बोगद्यात पाणी... नागरिक आक्रमक टोलवसुली बंद!
जळगाव शहरापासून नशिराबादजवळील पोलीस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करून टोलवसुली सुरूच ठेवण्यात आल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नशिराबाद टोल नाका गाठत काही काळासाठी टोलवसुली बंद पाडली.
आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरता पुढे सोडण्यात आले. बोगद्यातील पाणी तातडीने काढून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. टोल कंपनी नियमित शुल्क आकारते, मात्र पावसाळ्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, "प्रथम सुरक्षित रस्ता आणि नंतर टोल" अशी भूमिका नागरिकांनी स्पष्ट करत हायवे प्रशासनाला इशारा दिला.
    user_Police chaufer news
    Police chaufer news
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ममुराबाद येथील श्री गुरु गोरक्षनाथ गोशाळेसह परिसर जलमय; गोशाळेत पाणी शिरल्याने चारा भिजला, उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा फटका ममुराबाद (प्रतिनिधी): सततच्या पावसामुळे ममुराबाद येथील श्री कृष्णावतारी गुरु गोरक्षनाथ गोशाळा परिसरात चारही बाजूंनी पाणी साचले असून गोशाळेतही पाणी शिरले आहे. त्यामुळे गोशाळेत साठवून ठेवलेला जनावरांचा चारा भिजून खराब झाला असून जनावरांच्या देखभालीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. भाविक व गोसेवकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच व सदस्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याचप्रमाणे गावातील उर्दू शाळा व पटेल वाडा परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी गोशाळा, उर्दू शाळा व परिसरातील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून स्वच्छतेची उपाययोजना करावी, तसेच कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारावी, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
    3
    ममुराबाद येथील श्री गुरु गोरक्षनाथ गोशाळेसह परिसर जलमय; गोशाळेत पाणी शिरल्याने चारा भिजला, उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा फटका
ममुराबाद (प्रतिनिधी):
सततच्या पावसामुळे ममुराबाद येथील श्री कृष्णावतारी गुरु गोरक्षनाथ गोशाळा परिसरात चारही बाजूंनी पाणी साचले असून गोशाळेतही पाणी शिरले आहे. त्यामुळे गोशाळेत साठवून ठेवलेला जनावरांचा चारा भिजून खराब झाला असून जनावरांच्या देखभालीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. भाविक व गोसेवकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच व सदस्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याचप्रमाणे गावातील उर्दू शाळा व पटेल वाडा परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी गोशाळा, उर्दू शाळा व परिसरातील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून स्वच्छतेची उपाययोजना करावी, तसेच कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारावी, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.